Milk Before Bad Benefits : काही वर्षांपूर्वीचे हिंदी सिनेमे पाहिले, तर त्यात एक दृश्य हमखास दिसायचं, ते म्हणजे नायिका नायकाला किंवा आपल्या मुलांना रात्री झोपण्यापूर्वी दुधाचा ग्लास देत असे. मोठ्या माणसांनी रात्री दूध पिण्याचा सल्लाही अनेकांना दिला असेल; पण रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणं खरंच उपयुक्त ठरतं का? त्याबद्दल जाणून घेऊ या. रोज दूध पिणं शरीरासाठी चांगलं असल्याचं आपल्याला माहितीच आहे. दुधामुळे आरोग्य चांगलं राहतं, हाडं मजबूत होतात. तसंच थकवा दूर होऊन शांत, गाढ झोप लागण्यासदी दुधामुळे मदत होते. दुधात असलेल्या पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर संतुलित राहण्यास मदत होते. तसंच पोट बराच काळ भरलेलं राहत असल्यामुळे लवकर भूक लागत नाही. रात्री भूक लागली, तर ती शमवण्यासाठी दूध हा एक चांगला पर्याय आहे. रात्री झोपण्याआधी गरम दूध पिणं खूप उपयुक्त ठरतं. दुधात असलेल्या कॅल्शियम आणि प्रोटीनच्या मात्रेमुळे फॅट बर्निंग प्रोसेस वेगवान होते आणि फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच अंशी मदत मिळते. दुधात असलेले कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक ब्लड प्रेशर नियंत्रित राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या समस्येते दिलासा मिळतो. मन शांत असतं, तेव्हा झोपही चांगली लागते. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अॅसिड असतं. त्यामुळे झोपेच्या हॉर्मोनची पातळी वाढवण्यास मदत मिळते. त्यामुळे डोकं शांत होतं आणि झोप येण्यास मदत होते. रात्री झोपण्याच्या एक तास आधी दूध प्यायल्यास झोप चांगली लागते. मॉर्निंग वॉक करताना तुम्हीही करता या 5 चुका? फायद्याऐवजी होईल नुकसान गरम दुधाचे उपयोग : दुधात कॅसिन ट्रिप्टिक हायड्रोलायजेट (सीटीएच) हे पेप्टाइड्सचं मिश्रण असतं. हे मिश्रण तणाव दूर करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असतं. त्यामुळे चांगली झोप लागण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं. एवढंच नव्हे, तर सीटीएचमध्ये असलेली काही खास पेप्टाइड्स अलीकडेच शोधून काढण्यात आली आहेत. त्यांचा उपयोग आगामी काळात झोप न येण्याच्या समस्येवर उपचारांसाठी केला जाऊ शकतो. अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ‘जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूड केमिस्ट्री’मध्ये या संदर्भातल्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या सगळ्याचा विचार करता रात्री झोपताना गरम दूध पिणं श्रेयस्कर आहे. अर्थात, प्रत्येकाने आपले डाएटिशियन किंवा आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून मग याची सुरुवात करणं केव्हाही चांगलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.