जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Bedwetting : लहानपणी मुलं अंथरूण का ओलं करतात? यामागे काही आजार असतो का?

Bedwetting : लहानपणी मुलं अंथरूण का ओलं करतात? यामागे काही आजार असतो का?

Bedwetting : लहानपणी मुलं अंथरूण का ओलं करतात? यामागे काही आजार असतो का?

मुलांमध्ये हे का घडतं हे सर्वप्रथम समजून घेणं आवश्यक आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 4 जानेवारी : अंथरूण ओलं करणे म्हणजेच अंथरुणात लघवी करणं ही लहान मुलांमधली सर्वसामान्य समस्या आहे. ही समस्या प्रामुख्यानं 6 ते 15 वयोगटातल्या मुलांमध्ये दिसून येते. या समस्येकडे आरोग्यविषयक समस्या म्हणून पाहिलं जातं. आज ज्या पालकांची मुलं 6 ते 15 वयोगटातली आहेत आणि ती मुलं रात्री एकदा, आठवड्यातून एकदा किंवा रात्री अनेक वेळा, महिन्यातून एकदा झोपेत अंथरुणात लघवी करत असतील, तर मी त्यांच्या पालकांना सांगू इच्छितो, की हे एखाद्या आजारपणाचं लक्षण असू शकतं. हा मुलांच्या शारीरिक वाढीच्या प्रक्रियेचा एक भाग असू शकतो. त्यामुळे ही गोष्ट अशा पद्धतीनं हाताळली पाहिजे, जेणेकरून मुलांची ही सवय दूर होईल; पण ते करायचं कसं? यासाठी पालकांनी सर्वप्रथम मुलांमध्ये वयापरत्वे अंथरूण ओलं करण्याचं प्रमाण कमी होतंय की नाही हे ओळखणं महत्त्वाचं आहे. वाढत्या वयानुसार हा प्रकार कमी झाला पाहिजे. परंतु, काही वेळा याचे परिणाम प्रत्येक मुलामध्ये सारखे दिसत नाहीत. त्यामुळे अंथरूण ओलं करणाऱ्या प्रत्येक मुलाला ही सवय बरी करण्यासाठी थेरपी घेणं आवश्यक आहे. होय. मुलांचे पालक, शाळा आणि मुलांमधली ही सवय संपुष्टात आणण्यासाठीच्या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्यांना अंथरूण ओलं करणाऱ्या मुलांमधल्या समस्या ओळखाव्या लागतील. कारण ही सवय मुलांमध्ये कायम राहू नये यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अशी माहिती अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयाचे युरोलॉजिस्ट डॉ. संजय पांडे यांनी दिली.मुलांमध्ये हे का घडतं हे सर्वप्रथम समजून घेणं आवश्यक आहे. खरं तर ब्लॅडर अर्थात मूत्राशय आणि मेंदू यांच्यातला योग्य समन्वय पूर्णपणे विकसित न झाल्यामुळे असं घडतं. साधारणपणे शौचालयात जाण्याच्या प्रशिक्षणादरम्यान 3 ते 5 वर्षं वयोगटातल्या मुलांचं निरीक्षण आई करत असते. मुलाला लघवी करण्यासाठी शौचालयात कधी जावं लागेल हे ओळखण्यास आई मदत करते; पण ही गोष्ट केवळ दिवसाच होते. दिवसभरात पालकांच्या सततच्या देखरेखीमुळे मुलाला लघवी करण्यासाठी शौचालयात कधी जावं हे कळतं आणि हे त्याच्या ध्यानात कायमस्वरूपी राहतं; पण रात्री आपण सगळेच झोपतो तेव्हा असं निरीक्षण करणं शक्य नसतं. त्यामुळे या प्रशिक्षणाचा एक भाग अपूर्णच राहतो. Bedwetting : लहान मुलांच्या अंथरूण ओलं करण्याच्या सवयीकडे करू नका दुर्लक्ष; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती अशा वेळी मेंदू आणि मूत्राशय यांच्यात दिवसा होणारा समन्वय रात्रीच्या वेळी विकसित होत नाही. त्यामुळे मुलं रात्रीच्या वेळी अंथरूण ओलं करतात. अनेक पालक आणि काही वेळा मुलंदेखील अंथरूण ओलं करणं हा कलंक मानतात. 6 ते 9 किंवा 10 वर्षांची मुलं इतकी गाढ झोपतात, की त्यांना शौचालयात जाण्यासाठी अंथरुणातून उठवणंदेखील कठीण होतं. काही वेळा आई-वडीलही अशा मुलांच्या बाबतीत फारसे कठोर होत नाहीत. त्यांचे मोठे भाऊ-बहीणही हे करत असत. काही काळानंतर त्यांची ही सवय गेली त्याप्रमाणे या मुलांचीही सवय थांबेल असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते ही सवय मोडण्यासाठी मुलांना सक्ती करत नाहीत. अनेकांना या गोष्टीची वैद्यकीय बाजू फारशी माहिती नसते. यात उपचारांची फारशी भूमिका नाही, असादेखील त्यांचा समज असतो. भविष्यात ही समस्या आपोआप दूर होईल, असा समज करून घेऊन ते मौन बाळगतात. (क्रमशः)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात