ऑस्टिन, 11 जून : अनेकांना रात्री लवकर झोप (sleep) लागत नाही. किती तरी वेळ ते बेडवर असेच पडून असतात, झोपण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हालादेखील अशीच समस्या असेल तर त्यावर मार्ग म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करणं. एका अभ्यासानुसार झोपण्याआधी योग्य तापमान (temperature) असलेल्या पाण्याने योग्य वेळेत अंघोळ (bath) केली, तर चांगली आणि शांत झोप लागते. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासच्या संशोधकांनी पाण्यामुळे शरीराच्या तापमानावर होणा-या परिणामाचा झोपेच्या समस्येवर काय परिणाम होतो याबाबत झालेल्या संशोधनाचा अभ्यास केला. स्लीप मेडिसीनमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. हे वाचा - Sleep talking : काही व्यक्ती झोपेत का बडबडतात? हेल्थलाईन च्या रिपोर्टनुसार, या अभ्यासात असं संशोधकांनी चांगली झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी 1 ते 2 तास आधी अंघोळ करावी. अंघोळीसाठी असलेल्या पाण्याचं तापमान 40 ते 43°C इतकं असावं, असं साांगितलं. शास्त्रज्ञांच्या मते, झोप आणि शरीराचं तापमान हे सिक्रेडियन क्लॉकनुसार असतं. त्यामुळे शरीराच्या तापमानामुळेही झोपेवर परिणाम होतो. हे वाचा - रात्री झोपताना BRA घालणं योग्य नाही; होऊ शकतात असे दुष्परिणाम सामान्यपणे रात्री शरीराचं तापमान कमी होतं. मध्यरात्री ते आणखी कमी होतं आणि त्यानंतर ते हळूहळू वाढू लागतं. जे शरीराचं नैसर्गिक अलार्म म्हणून काम करतं आणि आपल्याला झोपेतून उठण्याचे संकेत देतं. त्यामुळे नीट झोप लागण्यासाठी शरीराचं हे तापमान नीट नियंत्रित करणं गरजेचं आहे. गरम पाण्याचा शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. रक्ताभिसरण वाढतं आणि शरीरातील उष्णता बाहेर पडून शरीराचं तापमान कमी होतं. ज्यामुळे लवकर आणि शांत झोप लागण्यास मदत होते. संकलन, संपादन- प्रिया लाड हे वाचा - गरम की थंड; कोणत्या पाण्याने करावी अंघोळ?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.