बंगळुरू, 26 मे : कोरोना विषाणूच्या (Corona virus) या संकट काळात सोमवारी सकाळी बंगळुरुवासियांना (Bengalureans) एक सुखद अनुभव पाहिला मिळाला. निसर्गाचा एक अनोखा अविष्कार शहरवासियांना पाहायला मिळाला. सकाळच्या वेळी येथे इंद्रधनुष्याचे (Rainbow) सुर्याभोवती कडं झालेलं पाहायला मिळालं. याचे मग लोकांनी विविध प्रकारचे आकर्षक फोटो काढले. (फोटो: Twitter/@samyuktahornad)
इंद्रधनुष्याचं हे कडं सुरुवातीला सकाळी 10:50 दरम्यान काहींना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास एक तासभर हे कडं दिसून येत होतं. स्थानिक लोकांनी याचे मग भरपूर फोटो काढले. सध्या सोशल मीडिया हे फोटो चांगलेच शेअर होत आहेत. (फोटो: Twitter/@PCMohanMP)
खरंतर असा इंद्रधनुष्याचा आकार दिसण्याचं कारण म्हणजे काही पाण्याचे बारीक कण असलेले ढग सुर्याच्या प्रकाशात येतात, तेव्हा खाली या प्रकारे इंद्रधनुष्य दिसाय लागतो. गोल दिसला हे विषेश आहे, कोणत्याही आकारात तो दिसू शकतो, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (फोटो: Twitter/@PCMohanMP)
सोशल मीडियावर इंद्रधनुष्याचं प्रभामंडळ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण म्हणाले बघा सूर्य पण सोशल डिस्टन्स ठेवत आहे. भारत सरकारच्या एका ट्विटर खात्यावरून या इंद्रधनुष्याविषयी असं म्हटलं की, या कोरोना संकटात निसर्गानं आपल्या एक सकाळ दाखवल्यानं सर्वांचाच उत्साह वाढेल. (फोटो: Twitter/@PCMohanMP)
विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीस सुद्धा असं प्रभामंडळ चंद्राच्या प्रकाशात सुद्धा तयार होऊ शकतं. गेल्या वर्षीही बंगळुरूमध्ये या प्रकारचं प्रभामंडळ, इंद्रधनुष्य दिसून आला होता. सूर्याभोवती असे निरनिराळ्या रंगाचे पट्टे तमिळनाडूच्या रामेश्वरम येथेही दिसले होते. (फोटो: Twitter/@samyuktahornad)