जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जेव्हा रोगप्रतिकारक शक्तीच शरीरावर हल्ला करते; उद्भवतात या समस्या

जेव्हा रोगप्रतिकारक शक्तीच शरीरावर हल्ला करते; उद्भवतात या समस्या

जेव्हा रोगप्रतिकारक शक्तीच शरीरावर हल्ला करते; उद्भवतात या समस्या

रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील निरोगी पेशींना हानी पोहोचवायला लागल्यावर काही लक्षणं दिसू लागतात.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    मल्टीपल स्केलेरोसिस, टाइप 1 मधुमेह, रुमेटाइड संधिवात या सर्व आजारांमधील एक समान गोष्ट म्हणजे ते सर्व स्वयंप्रतिकारक आहेत. हे आजार होणे म्हणजे गंभीर परिस्थिती असते. myupchar.com च्या डॉ. अनुराग शुक्ला सांगतात की, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकारक क्षमता असते. याचे मुख्य काम संसर्ग आणि आजारांपासून वाचवणे आहे. ही प्रतिकारशक्ती आपल्या शरीरातील विषारी पदार्थ, विषाणू, जीवाणू यासारख्या बाहेरून शिरणाऱ्या गोष्टी शोधून काढते. जर अशी रोगप्रतिकारक शक्ती नसेल तर हे सगळे विषाणू, जीवाणू शरीरात सहज प्रवेश करतील. काही परिस्थितीमध्ये रोगप्रतिकारशक्ती काम करेनाशी होते आणि या परिस्थितीला स्वयं प्रतिकारक रोग असे म्हटले जाते. त्याने पेशींची हानी होते, त्याची अनेक लक्षणे आहेत. इथे 8 लक्षणांची माहिती देत आहोत ती आढळल्यास आपण डॉक्टरांकडे जरूर जायला हवे. वेदना : स्वयं प्रतिकारक रोगांमुळे सूज येते. याचा अर्थ असा की स्वयंप्रतिकारक रोग असलेल्या व्यक्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात, रक्त वाहिन्यांमध्ये, त्वचेवर सूज येते आणि वेदना होतात. प्रत्येक वेळा ही सूज स्वयंप्रतिकारक रोग असेलच असे नाही पण असे लक्षण दिसले तर मात्र डॉक्टरकडे जरूर जा. सांध्यांमध्ये विकृती : रुमेटाइड आर्थराइटिस हे संधिवाताचा प्रकार आहे. त्याला स्वयं प्रतिकारक रोग मानले जाते. याचे कारण म्हणजे सांध्यांच्या आसपासच्या पेशी क्षतिग्रस्त झाल्याने हे होते. myupchar.com चे एम्स मधील डॉ. केएम नाधिर यांच्या मते, रुमेटाइड आर्थराइटिस सांध्यांच्या थरांना नुकसान पोहचवते. त्यामुळे वेदना होतात आणि सूज येते. शेवटी हाडे घासली जातात, आणि सांध्यांमध्ये विकृती निर्माण होते. अशी काही विकृती सांध्यांमध्ये दिसली तर डॉक्टरकडे जायला हवे. श्वास घेताना त्रास होत असेल : स्वयं प्रतिकारक रोग फुफ्फुसांना पण होतो. यात स्वयं प्रतिकाराकता फुफ्फुसांच्या उतींना हानी पोहोचवतात. त्यामुळे श्वास घायला त्रास होतो. पल्मनरी सिंड्रोमही होऊ शकतो, किडनीच्या रक्तवाहिन्यांना जखमा होऊन फुफ्फुसात रक्तस्त्रावही होऊ शकतो. श्वासासंबंधी आजारांना नेहमी गंभीरतेने घ्यायला हवे. थकवा : स्वयं प्रतिकारक रोग एकापेक्षा अधिक अवयावर सूज येण्यास कारणीभूत असतात, त्यामुळे थकवा येतो. हे लक्षण सामान्यपणे कधीही दिसू शकते, त्यामुळे शंका आली की डॉक्टरकडे जायला हवे. छातीचे दुखणे : अनेक आजारात छातीत दुखणे हे लक्षण दिसून येते. सारकॉइडोसिस स्वयं प्रतिकारक रोगांपैकी एक आहे, ज्यात हे लक्षण दिसून येते. छातीतील दुखण्याला कधीच दुर्लक्षून चालणार नाही. असा अनुभव आला तर लगेच डॉक्टर कडे जा. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख -  आरोग्याच्या सामान्य समस्या न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात