मातीचे अनेक प्रकार आहेत. काळी, लाल, पिवळी, गाळाची माती, जांभी माती. या माती वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येतात आणि त्यांचे सर्वांचे गुण वेगवेगळे आहेत. काळ्या मातीचा विचार केला तर ती सगळ्यात जास्त उपजाऊ असते. काळी माती माळव्याच्या पठारावर सगळ्यात जास्त आढळून येते. काळ्या मातीला रेगुर माती, चिकण माती, कापसाची माती अथवा लावा माती पण म्हटलं जातं. सोबतच काळ्या मातीत औषधी गुण भरपूर प्रमाणात आहेत. myupchar.com च्या डॉ. अप्रतीम गोयल यांनी सांगितलं, पूर्वीपासून या मातीचा उपयोग नैसर्गिक उपचारासाठी केला जातो आहे. अनेक तत्वांनी समृद्ध आहे काळी माती आयुर्वेदामध्ये अनेक आजारांवर मातीचा लेप लावून उपचार केले जातात. आपलं शरीर पंचतत्वांनी बनलं आहे, असं मानलं जातं. त्यापैकी एक तत्व म्हणजे माती आहे. मातीमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे धान्याच्या रूपांनी आपल्या शरीरात जातात आणि आपले शरीर निर्माण करण्यात सहाय्य करतात. म्हणूनच काळ्या मातीला आयुर्वेदात आरोग्यासाठी लाभदायक मानलं गेलं आहे. काळ्या मातीत लोह अधिक असतं काळ्या मातीचा रंग काळा आहे याचं मुख्य कारण त्यात लोहाचं प्रमाण अधिक असतं. याशिवाय काळ्या मातीत टिटेनिफेरस मॅग्नेटाइड हे द्रव्यपण असतं. शरीरात रक्त निर्माण करण्यात लोह मुख्य भूमिका निभावतं. त्यामुळे ज्याच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते त्यांच्यासाठी काळ्या मातीचा उपचार लाभदायक ठरतो. स्वास्थ्य आणि सौंदर्य वाढवते काळी माती काळ्या मातीनं शरीरातील अनेक व्याधी दूर केल्या जाऊ शकतात. काळी माती शरीरातील घाण शोषून घेते आणि शरीराला थंड ठेवण्याचं काम करते. त्यातली द्रव्ये शरीराच्या त्वचेसाठी लाभदायक असतात. डोळ्यांची जळजळ दूर होते डोळ्यात जर जळजळ होत असेल तर ती दूर करण्यासाठी काळी माती लाभदायक आहे. काळ्या मातीला स्वच्छ पाण्यासोबत काही काळ डोळ्यांवर लावा. त्यानंतर धुवून टाका. त्याने डोळ्यात होणारी जळजळ दूर होते आणि डोळ्यांना थंडावा मिळतो. खूप ताप असेल तर असा वापर करा जर खूप ताप असेल तर रुग्णाच्या पोटावर ओली पट्टी बांधावी आणि तिला वारंवार बदलत राहावं. पण जर रुग्ण थंडीनं थरथरत असेल तर मात्र काळ्या मातीच्या पट्टीचा उपयोग अजिबात करायला नको. हगवण, अतिसार काळ्या मातीचा उपयोग पोटाचे आजार जसं हगवण, पोटदुखी, अतिसार झाला तर केला जाऊ शकतो. यात ओटीपोटावर काळ्या मातीची पट्टी बांधल्याने लाभ होतो. संधिवातात पण अशी पट्टी बांधणं लाभदायक आहे. मासिक पाळीतील वेदनांवर उपचार मासिक पाळीत होणाऱ्या वेदना देखील यानं कमी होतात. गर्भाशया संबंधी सगळ्या दोषांचं निवारण काळ्या मातीची पट्टी बांधल्यानं दूर होते. पण गर्भवती महिलांनी कधीही ओटीपोटावर काळ्या मातीची पट्टी बांधू नये. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – घरगुती उपाय_,_ नैसर्गिक उपचार न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







