अचानक दुखू लागलं पोट; घरगुती उपायांनी काही मिनिटांतच मिळवा आराम

अचानक दुखू लागलं पोट; घरगुती उपायांनी काही मिनिटांतच मिळवा आराम

पोटदुखीवर (stomach pain) वेळीच उपचार न केल्यास गंभीर परिणाम उद्भवू शकतात.

  • Last Updated: Nov 4, 2020 11:27 PM IST
  • Share this:

अनियमित आणि चुकीचं खाणं यामुळे अनेकदा पोट अस्वस्थ होतं. कधीकधी परिस्थिती इतकी गंभीर होते की अतिसार, उलट्या होणे, गॅस होणं, छातीत जळजळ आणि चक्कर येणं यासारख्या समस्या होऊ लागतात. ज्यांना वारंवार पोट अस्वस्थ होण्यासारख्या समस्या उद्भवतात, त्यांची पचनप्रणाली कमकुवत असू शकते. जर दुर्लक्ष केलं तर त्या व्यक्तीला अल्सर होण्याची भीती असू शकते.

पोटदुखी कधीकधी अगदी घरगुती उपायांनीदेखील बरी होते. अशाच काही उपचाराबद्दल जाणून घेऊया

पुदिना

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, पुदिना थंड आहे शिवाय त्यात बरेच नैसर्गिक गुणधर्म आहेत, जे पोटदुखी आणि पोटाशी संबंधित कोणत्याही समस्यांना दूर करण्यास उपयुक्त आहेत. जर मळमळ किंवा उलट्यांचा त्रास असेल तर पुदिन्याचा रस वापरणं खूप फायदेशीर आहे. तुम्ही पुदिन्याचा चहा बनवून पिऊ शकता.

अॅपल सिडर व्हिनेगर

ज्या लोकांना सहसा अ‍ॅसिडिटीची समस्या असते त्यांच्यासाठी अॅपल सिडर व्हिनेगर हे एक उत्तम औषध आहे. कारण हे अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या दूर करण्यात मदत करतं. एक चमचा व्हिनेगर घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण थोडं थोडं घेत रहा. या व्हिनेगरमुळे पचनप्रणाली मजबूत होते. त्यात बरेच असे घटक आणि गुणधर्म आहेत, जे पोटातील हानीकारक जीवाणू काढून टाकण्यास उपयुक्त ठरतात.

आल्याचा रस

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, आलं हे आरोग्यासाठी आयुर्वेदिक औषध आहे. आल्यामध्ये असे गुणधर्म आहेत जे पोटाच्या समस्या दूर करण्यात मदत करतात. जर मळमळ किंवा पोटाच्या आम्लतेसारखी समस्या असेल तर आल्याच्या रसात मध घालून घ्या. या व्यतिरिक्त आल्याचा चहादेखील पिऊ शकता. पण आलं गरम आहे, त्यामुळे तो कमी प्रमाणातच खाणं चांगलं नाहीतर पोटातील उष्णता वाढू शकते.

कॅमोमाइल चहा

ज्या लोकांना वारंवार पोटदुखीचा त्रास होतो अशा लोकांसाठी कॅमोमाइल चहा खूप फायदेशीर आहे. दररोज कॅमोमाइल चहा प्यायल्यास ते पोटातील स्नायूंना आराम मिळेल. पोटदुखी पोटात गोळा येणं किंवा पोट खराब होणं यासारख्या समस्यांवर हा चहा उपयुक्त आहे. कॅमोमाइल चहामध्ये बरेच जीवाणू विरोधक गुणधर्म देखील असतात, जे पोटाशी संबंधित विकार दूर करण्यास मदत करतात. ज्या लोकांना पोटदुखी संबंधित समस्या आहेत त्यांनी जास्त चरबीयुक्त आहार घेऊ नये.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - पोट आणि पचनाशी, संबंधित विकार ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: November 4, 2020, 11:27 PM IST

ताज्या बातम्या