जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पालक विंचरून विंचरून थकले तरी चिमुकल्याचे केस उभे ते उभेच; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण

पालक विंचरून विंचरून थकले तरी चिमुकल्याचे केस उभे ते उभेच; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण

पालक विंचरून विंचरून थकले तरी चिमुकल्याचे केस उभे ते उभेच; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण

मुलाचे केस कितीही विंचरले तरी ते खाली बसेनात म्हणून पालक त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले. वैद्यकीय तपासणीत त्याला एक विचित्र आजार असल्याचं निदान झालं.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 06 जून :  केसात कोंडा होणं, केस न वाढणं, केस गळणं, केस पांढरे होणं, केसांना फाटे फुटणं अशा केसांच्या बऱ्याच समस्या असतात (Hair problems). पण कधी कुणाचे केस उभे राहिलेले पाहिले आहेत का? फिल्ममध्ये एखाद्याला शॉक लागल्यावर किंवा हेअरस्टाइल म्हणून जेल वगैरे लावून मुद्दाम केस उभे केल्याचं तुम्ही पाहिलं असेल (Baby hair syndrome). पण कुणाचे केस नैसर्गिकरित्याच गवत किंवा तारेसारेख ताठ उभे असे असल्याचं पाहिलं आहे का? असेच उभे केस असलेल्या एक चिमुकला सोशल मीडियावर चर्चेत आहे  (Baby hair uncombable). अमेरिकेच्या जॉर्जियात राहणारा दोन वर्षांचा लॉकलॅन सॅम्पल्स (Locklan Samples). ज्याचे डोक्यावरील केस उभे आहेत. सामान्यपणे केस उभे असतील तर ते विंचरून, त्याला तेल किंवा जेल वगैरे लावून ते खाली बसवता येतात. पण या चिमुकल्याचे केस कितीही विंचरले तरी उभेच राहतात. त्याचे पालकही केस विंचरून विंचरून थकले. अखेर त्यांनी डॉक्टरांकडून याबाबत माहिती मिळवली आणि त्यांना धक्काच बसला (rare syndrome in which hair are uncombable). लॉकलॅनचे केस असे उभेच राहत होते, याचं कारण होतं त्याला असलेला एका विचित्र आजार (rare syndrome in which hair are uncombable). त्याला अनकॉम्बेबल हेअर सिंड्रोम आहे (Uncombable Hair Syndrome). ज्यात केस उभे राहतात आणि ते कधीच सरळ होत नाहीत. हे वाचा -  VIDEO - फक्त महिलांनाच जमतंय पुरुषांना नाही; पाहा तुम्ही पूर्ण करू शकता का हे चॅलेंज लॉकलॅन दहा महिन्यांचा होता तेव्हा त्याची आई केटलिनने इन्स्टाग्राम त्याचा एक फोटो शेअर केल होता. त्या फोटोवर कमेंट करताना एका व्यक्तीने लॉकलॅनला तो सिंड्रोम आहे का, असं विचारलंही होतं. पण तेव्हा केटलिननलाही याबाबत माहिती नव्हतं. तेव्हा तिने रुग्णालयातून याबाबत माहिती मिळवली. सिंड्रोमचं नाव ऐकून डॉक्टरही हैराण झाले. त्यांनी या आजाराचं नाव याआधी ऐकलं नव्हतं. तेव्हा त्या डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टरांना विचारायला सांगितलं. ज्यांनी लॉकलॅनची टेस्ट केली आणि त्याला तोच सिंड्रोम असल्याचं सांगितलं.

जाहिरात

हा सिंड्रोम सामान्यपणे 3 ते 12 वयोगटातील मुलांना होतो. यात केस उभे राहण्यासोबत पांढरेही होतात. या सिंड्रोमची फक्त 100 प्रकरणंच समोर आली आहे. हे वाचा -  OMG! चक्क श्वानाने बनवले Cookies; विश्वास बसत नाही तर पाहा हा Chef Dog चा Video जेव्हा लॉकलॅनच्या पालकांनी या सिंड्रोमबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा त्यांना याबाबत फार माहिती मिळाली नाही. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाचं इन्स्टाग्राम अकाऊंट बनवून त्या माध्यमातून जगाला या सिंड्रोमची अधिकाधिक माहिती देण्याचं ठरवलं. या सिंड्रोममुळे तसा जीवाला कोणताच धोका नाही. लॉकलॅनही तसा पूर्णपणे निरोगी आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात