S M L

'फ्लिपकार्ट'-'अमेझॉन'मध्ये पुन्हा सेलवाॅर, ग्राहकांना मिळणार शानदार आॅफर्स

ग्राहकांना तब्बल 80% फायदा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Samruddha Bhambure | Updated On: May 11, 2017 10:20 AM IST

'फ्लिपकार्ट'-'अमेझॉन'मध्ये पुन्हा सेलवाॅर, ग्राहकांना मिळणार शानदार आॅफर्स

11 मे : ऑनलाईन सेवा देणारी देशातील सर्वात बलाढ्य बेवसाईट 'अमेझॉन' आणि 'फ्लिपकार्ट'मध्ये पुन्हा एकदा काट्याची टक्कर होणार आहे. कारण दोन्ही कंपन्या पुन्हा एकदा मोठे डिस्टाऊंट आॅफर्स घेऊन घेऊन ग्राहकांच्या भेटीला येत आहेत. यात ग्राहकांना तब्बल 80% फायदा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

'अमेझॉन'चा बहुचर्चीत ‘ग्रेट इंडिया सेल’ आजपासून (11 मे) सुरू होत आहे. तर, दशकपुर्ती निमीत्ताने 'फ्लिपकार्ट'ने सुद्धा 'बिग10' नावाने 14 मे पासून ऑनलाईन सेल घेऊन येत आहे. एकाच वेळी दोन बलाढ्य कंपन्या मार्केटमध्ये सेल घेऊन उतरत असल्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा रंगणार हे वेगळं सांगायलाच नको. पण या स्पर्धेचा फायदा अर्थातच ग्राहकाला होणार आहे.

ग्राहकांसाठी 'अमेझॉन' आणि  'फ्लिपकार्ट'ने डिस्काऊंट ऑफरची धमाकेदार योजना आखली आहे. याची सुरूवात 'अमेझॉन'च्या ‘ग्रेट इंडिया सेल’पासून सुरूवात होणार आहे.'अमेझॉन इंडिया'वर हा सेल 11 मे म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. कंपनीच्या वतीने ‘ग्रेट इंडिया सेल’मध्ये 10 कोटी प्रोडॉक्टवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. यात स्मार्टफोन, टीव्ही, कन्ज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि एक्सेसरीजवर सर्वाधीक डिस्काऊंट असणार आहे. तसंच, अनेक प्रॉक्टवर कंपनी 80 टक्क्यांपर्यंतही सूट देणार आहे. तर 'फ्लिपकार्ट'च्या या  'बिग10' सेलच्या माध्यमातून ग्राहकांना इतरही 10 मोठे फायदे मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 10:20 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close