जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / छोट्या छोट्या गोष्टीही विसरणं; विसराळू स्वभाव नाही तर मेंदूचा गंभीर आजार

छोट्या छोट्या गोष्टीही विसरणं; विसराळू स्वभाव नाही तर मेंदूचा गंभीर आजार

छोट्या छोट्या गोष्टीही विसरणं; विसराळू स्वभाव नाही तर मेंदूचा गंभीर आजार

प्रत्येक व्यक्ती काही ना काही विसरतो. मात्र असं वारंवार होत असेल आणि अगदी क्षुल्लक गोष्टीही ती व्यक्ती विसर असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    अल्झायमर मेंदूशी संबंधित आजार आहे. त्यात रुग्णाची विचार करण्याची आणि स्मरणात ठेवण्याची क्षमता प्रभावित होते. हे इतके गंभीर होतं की त्यामुळे दैनिक कार्येसुद्धा प्रभावित होतात. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं, हा आजार वेगाने निर्णय घेण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीला हानी पोहचवणारा आहे. या आजाराने फक्त रुग्णाचंच नाही तर त्याच्या पूर्ण कुटुंबाचं आयुष्य प्रभावित होतं, त्यांच्यावर परिणाम होतो. अल्झायमर रोग का होतो यावर अनेक शोध करण्यात आले आहेत. हा रोग आनुवंशिकपण असू शकतो. जाणून घेऊ या आजाराची लक्षणं आणि उपचार. अल्झायमर झाला आहे खूप हळूहळू कळतं अल्झायमरची लक्षणं हळूहळू कळतात आणि कालानुरूप त्यात बदलही होतात. कुणीही व्यक्ती या लक्षणांना नियंत्रित करू शकत नाही. काही उपचारांनी बरं व्हायला मदत मिळते पण या आजारापासून कायमची मुक्तता मिळत नाही. अल्झायमरच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणं, नुकत्याच घडलेल्या घटना न आठवणं, वेळ आणि जागा विसरणं, नवीन माहिती लक्षात ठेवायला त्रास होणं, वाहन चालवताना, औषध घेताना, स्वयंपाक करताना, कपडे घालताना, आंघोळ करताना त्रास होणं यांचा समावेश होतो. अल्झायमरच्या रुग्णांना व्यक्ती ओळखायला देखील त्रास होतो. अल्झायमरची तपासणी अल्झायमर रुग्णांची तपासणी करण्यासाठी सिटी स्कॅन, एमआरआय अथवा पीईटी स्कॅनसारखी परीक्षणं केली जातात. स्मरणशक्ती कमी होण्याचा पॅटर्न आणि त्यात होणारे बदल याविषयी रुग्ण किती जागरूक आहे याचे निरीक्षण डॉक्टर करतात. डॉक्टर काही सामान्य प्रश्न विचारून देखील रुग्णाची मानसिक स्थिती तपासतात. इतर काही सामान्य मेडिकल टेस्टपण केल्या जातात. 65 वर्षानंतर अल्झायमरचा धोका जास्त अल्झायमर आजार बहुधा 65 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये दिसून येतो. हा रोग आनुवांशिक असतो, पण काहीवेळा एखाद्या अपघातात मेंदूला दुखापत झाली तर अल्झायमर होऊ शकतो. अधिक धूम्रपान करणारे, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि मधुमेही रुग्णांना पण अल्झायमर होण्याचा धोका असतो. अल्झायमरचा उपचार अल्झायमरच्या खऱ्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसंही अल्झायमर बरा होणं खूप कठीण आहे. पण आजकाल अल्झायमरच्या उपचारासाठी काही थेरेपी आणि फार्माकोलॉजिक ट्रिटमेंट दिल्या जात आहेत. त्याने अल्झायमरच्या रुग्णाच्या मेंदूच्या पेशी नष्ट होण्यापासून वाचवता येतील. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणाले, आहारावर लक्ष देवून अल्झायमरचा धोका कमी केला जाऊ शकतो. त्यात हिरव्या पालेभाज्या, ग्रीन टी, दालचिनी, हिरव्या पालेभाज्या, ग्रीन टी, दालचिनी, साल्मन मासा, हळद यांचा उपयोग केला जाऊ शकतो. सोबतच नारळाचं तेल आणि ऑलिव्ह तेल यांचा वापर करायला हवा. याशिवाय अल्झायमरच्या रुग्णाची व्यवस्थित देखभाल केली पाहिजे. त्यांना कुठल्या न कुठल्या कामात सहभागी करून घेतलं पाहिजे, त्याने त्यांची मानसिक अवस्था सुधारेल. त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांना मदत करायला हवं जेणेकरून त्यांना एकटं वाटणार नाही. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख -  अल्झायमर: लक्षणे, कारणे, उपचार… न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात