मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Desi Jugaad : 10 रुपयात AC सारखी हवा? पठ्ठ्याचा जुगाड पाहून म्हणाले, पहिल्यांदा पाहिला असा जुगाड!

Desi Jugaad : 10 रुपयात AC सारखी हवा? पठ्ठ्याचा जुगाड पाहून म्हणाले, पहिल्यांदा पाहिला असा जुगाड!

देशी जुगाडात भारतीयांचा हात जगात कोणीही धरू शकत नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जुगाड अर्थात युक्तीचे इंटरनेटवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

देशी जुगाडात भारतीयांचा हात जगात कोणीही धरू शकत नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जुगाड अर्थात युक्तीचे इंटरनेटवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

देशी जुगाडात भारतीयांचा हात जगात कोणीही धरू शकत नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जुगाड अर्थात युक्तीचे इंटरनेटवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

  नवी दिल्ली, 25 मे : सध्या तीव्र उन्हाळा जाणवत आहे. वाढत्या उष्म्यामुळे लोक हैराण झाले आहेत. उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी घरोघरी किंवा ऑफिसेसमध्ये पंखे, कूलर, एअर कंडिशनरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. पण उन्हाळा तीव्र असल्याने या वस्तुदेखील कुचकामी ठरत आहेत. सध्या इंटरनेटवर एका देशी जुगाडाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर एसी, कूलर खरेदी करणं प्रत्येकाला परवडतं असं नाही. पण भर उन्हात घरात गारवा राहावा यासाठी बहुतांश लोक कूलर खरेदी करतात. इंटरनेटवरील व्हायरल व्हिडिओत कूलरमधून एसीसारखी थंड हवा कशी मिळवायची या विषयी एक जुगाड दाखवण्यात आला आहे. मातीच्या माठाचा वापर कूलरमधून एसीसारखा गारवा मिळवण्यासाठी केला गेला आहे. अतिशय कमी किमतीत केलेला हा जुगाड नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. या व्हायरल व्हिडिओतील जुगाड नेमका कसा आहे, ते सविस्तर जाणून घेऊया. `नवभारत टाइम्स`ने याविषयी माहिती दिली आहे.

  देशी जुगाडात भारतीयांचा हात जगात कोणीही धरू शकत नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जुगाड अर्थात युक्तीचे इंटरनेटवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या उन्हाळा तीव्र आहे. त्यामुळे कूलरमधूनही एसीप्रमाणे थंड हवा मिळावी, असं प्रत्येकाला वाटत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत अनेक व्यक्तींनी इंजिनिअरिंगची स्कील्स वापरून वेगवेगळे प्रयोग केले आहेत. अशाच एका व्यक्तीने केलेल्या जुगाडाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्यक्तीने कूलरमधून एसीप्रमाणे थंड हवा मिळवण्यासाठी एक जुगाड केलाय. या साठी केवळ 10 रुपये खर्च येतो. त्यामुळे कोणीही व्यक्ती हा जुगाड वापरून कूलरमधून एसीप्रमाणे थंड हवा मिळवू शकते.

  या देशी जुगाडचा व्हिडिओ इंजिनिअर जस्वीर (jasvir_engineer_offical) नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून 20 मे रोजी पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फक्त 10 रुपयांत घरी बनवलेला एसी असं म्हटलं आहे. आतापर्यंत या रिलला दोन कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर 8 लाख 48 हजार लाइक्स मिळालेले आहेत. याशिवाय शेकडो नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.

  जुना कुलर देईल महाबळेश्वरसारखी थंडी; आजच करा हे छोटे बदल, AC देखील होईल फेल!

  व्हायरल झालेल्या इन्स्टाग्राम रिलमध्ये, एक व्यक्ती सर्वप्रथम छोटा माठ खालच्या बाजून फोडून त्याला एक मोठं छिद्र पाडत आहे. कूलरमधील पाण्याची मोटार त्यातून बाहेर जावी, एवढा या छिद्राचा आकार आहे. त्यानंतर तो माठ कूलरच्या आतमध्ये ठेवून त्यात पाण्याची मोटार सेट करतो आणि काही मातीच्या भांड्याचे तुकडे कुलरच्या टँकमध्ये चोहीकडे पसरुन त्यात पाणी भरतो. शेवटी ही व्यक्ती कूलर सुरू करताना दिसत आहे. या जुगाडामुळे खरोखरच गार हवा मिळते की नाही हे जुगाड करूनच पाहावं लागेल.

  या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. तसंच काही नेटकऱ्यांनी या जुगाडावर काही प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. ``10 रुपयांत मातीचं भांडं किंवा माठ कुठेच मिळत नाही...म्हणजे काहीही``, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. दुसऱ्या एका युजरने यावर विनोद करत ``अरे, कूलर बंद कर थंडी वाजायला लागली,`` अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका युजरने ``गारव्याविषयी माहिती नाही; पण याचा सुंगध मात्र खूप छान असेल,`` अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  हेही वाचा - बारावीच्या रिजल्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

  First published:
  top videos

   Tags: Ac, Air conditioner, Summer, Summer season, Viral videos