जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / टोमॅटो झाला बिअरपेक्षा महाग, आता आणखी एका आंबट पदार्थ फोडणार घाम

टोमॅटो झाला बिअरपेक्षा महाग, आता आणखी एका आंबट पदार्थ फोडणार घाम

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांत ही बाब वापरता येते.

  • -MIN READ Local18 Karnataka
  • Last Updated :

    सौम्या कलासा, प्रतिनिधी बंगळुरू**, 24 जुलै :** सध्या भारतातल्या घरोघरी चर्चा आहे ती टोमॅटोंच्या दरांची. टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचं बजेट गडबडलं आहे. कारण जवळपास प्रत्येक घरात टोमॅटोशिवाय स्वयंपाक होतच नाही. त्यामुळे अनेकांनी आता काटकसर करण्यासाठी टोमॅटोवर काटच मारली आहे. त्याऐवजी चिंच, लिंबू किंवा अन्य आंबट पदार्थांचा वापर वाढू लागला आहे. अगदी रस्समपासून वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्हीज, आमट्या आणि डिशेस यांमध्ये लोकांनी टोमॅटोसाठी पर्याय वापरायला सुरुवात केली आहे; मात्र सध्या मागणी वाढल्याने चिंचेनेही टोमॅटोच्या भाववाढीच्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत तुलनेने स्वस्त असलेली चिंच आता हळूहळू महाग होऊ लागली आहे. साउथ इंडियन अर्थात दाक्षिणात्य पदार्थांमध्ये चिंचेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्या पदार्थांतला चिंचेचा स्वाद खवय्यांना आवडतो. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांत चिंच वापरता येते. त्यामुळे टोमॅटो किंवा लिंबाच्या किमतीत वाढ झाली, तर चिंच हा पर्याय किफायतशीर ठरतो. काही पदार्थ असे असतात, की ज्यात चिंच वापरण्यावाचून काही पर्याय नसतो; पण काही पदार्थ असे असतात, की ज्यात अन्य पदार्थाऐवजी चिंच वापरून चवीत ट्विस्ट आणता येतो. पदार्थाला आंबटपणा तर येतो; पण चवीत वेगळेपणा असतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    या पार्श्वभूमीवर, टोमॅटोच्या किमती गगनाला भिडू लागल्या, तेव्हा अनेकांनी चिंचेचा पर्याय वापरायला सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात चिंचेचा दर प्रति किलो 80 ते 200 रुपयांच्या दरम्यान होता. आता मात्र तो 120 ते 200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागणीत वाढ आणि त्या तुलनेत पुरवठा कमी हे चिंचेच्या भाववाढीचं कारण आहे. तसंच, चिंचेच्या उत्पादनात झालेली घट हे प्रमुख कारण आहे. कर्नाटक राज्यातल्या तुमकुरू इथले चिंच उत्पादक शेतकरी मंजुनाथ नायका यांनी त्याबद्दल माहिती दिली. ‘टोमॅटो खूप महाग झाले तेव्हा चिंचेच्या मागणीत खूप मोठी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या जुलैच्या तुलनेत यंदा चिंचेच्या मागणीत 40 टक्के वाढ आम्ही अनुभवली आहे. शेजारच्या राज्यांतूनही अनेक जण मोठ्या प्रमाणावर चिंच खरेदी करण्यासाठी आमच्याकडे येत आहेत; मात्र सर्वांना पुरेसा पुरवठा होणं शक्य नाही. अशीच परिस्थिती आणखी काही आठवडे राहिली, तर चिंचेचे भाव आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचतील,’ कर्नाटक राज्याच्या फलोत्पादन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2018मध्ये राज्यात 12,173 हेक्टर क्षेत्रावर चिंचेची लागवड होती आणि त्यातून 58 हजार टन चिंचेचं उत्पादन मिळालं होतं. 2021-22मध्ये चिंचेच्या लागवडीखाली असलेलं क्षेत्र घटून 10,508 हेक्टरवर आलं. त्यातून 40,068 टन उत्पादन मिळालं. उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, पुरेशा कोल्ड स्टोअरेज सुविधांचा अभाव हेदेखील चिंचेची बाजारपेठ संतुलित नसण्यामागचं एक कारण आहे. चालू हंगामाच्या अखेरीपर्यंत चिंचेचे भाव प्रति किलो 300 रुपयांपर्यंत पोहोचतील, असा उत्पादकांचा अंदाज आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात