जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोकडून अश्लील डान्सचा तमाशा; चीनमधील धक्कादायक परंपरा

नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोकडून अश्लील डान्सचा तमाशा; चीनमधील धक्कादायक परंपरा

नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोकडून अश्लील डान्सचा तमाशा; चीनमधील धक्कादायक परंपरा

सर्वात दुःखाच्या क्षणी अशी विचित्र परंपरा निभावली जाते.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीजिंग, 14 सप्टेंबर : एखाद्याचा मृत्यू (Death) होणं म्हणजे सर्वात दुःखाचा क्षण असतो. संबंधित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो. संपूर्ण कुटुंब शोकात असतं, त्यांच्या पोटात अन्नाचा कण जात नाही की पाण्याचा घोट त्यांना घ्यावासा वाटत नाही. असं असताना चीनमध्ये (Weird ritual in china) एखाद्याच्या मृत्यूनंतर चक्क अश्लील डान्सचा शो होतो (Strip dance during funeral). व्यक्तीला अंतिम निरोप देण्याच्या, अंत्यसंस्काराच्या (Funeral) वेगवेगळ्या परंपरा-प्रथा असतात  (Weird ritual). काही अंत्ययात्रा वाजतगाजत नेल्या जात असल्याचंही तुम्ही पाहिलं असेल. पण चीनमधील (China) ही परंपरा तर धक्कादायकच आहे. सर्वात दुःखाच्या क्षणी अशी विचित्र परंपरा निभावली जाते. एखाद्याचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कारावेळी अश्लील डान्स करणाऱ्या तरुणींना बोलावलं जातं. चीनच्या ग्रामीण भागातील ही खूप जुनी परंपरा आहे, पण आजही काही भागात ही परंपरा निभावली जाते. बदलत्या काळानुसार या परंपरेत थोडा बदल झाला आहे. अगदी बायकोसुद्धा आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर स्ट्रिप डान्सर्सना बोलावते. हे वाचा -   धक्कादायक! चिनी लोक गर्भनाळही सोडत नाहीत; बाळाला जन्म देताच आईसुद्धा पिते Placenta सूप अंत्यसंस्कारावेळी या स्ट्रिप डान्सर्स अश्ली डान्स करतात आणि रडण्याचं नाटक करतात. आता ही अशी विचित्र परंपरा का त्यातून काय साध्य होतं, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. अंत्यसंस्कारावेळी मृत व्यक्तीला चांगल्या प्रकारे शेवटचा निरोप मिळावा, या हेतूने ही परंपार निभावली जात असल्याचं सांगितलं जातं. तसंत अंत्यसंस्कारावेळी जास्तीत जास्त लोक जमा व्हावेत हासुद्धा यामागील उद्देश आहे, असं म्हटलं जातं. डान्सर बोलावल्याने जास्तीत जास्त लोक येतात. अंत्यसंस्कारात जितके जास्त लोक तितकं मृताच्या आत्माला जास्त शांती मिळते, असं मानलं जातं. हे वाचा -  Yuck! चिनी लोक चक्क लघवीत उकडतात अंडी; आवडीने खातात Virgin egg डिश रिपोर्ट नुसार चीनी सरकारने या विचित्र परंपरेवर निर्बंध घातले आहेत. तरी काही ग्रामीण भागात ही परंपरा अद्यापही कायम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात