मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Best Time To Drink Milk: आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी या वेळी प्या दूध, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य पद्धत

Best Time To Drink Milk: आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी या वेळी प्या दूध, जाणून घ्या दूध पिण्याची योग्य पद्धत

थंड दूध

पोटातील गॅसची समस्या दूर करण्यासाठीही थंड दूध उपयुक्त ठरू शकतं. रोज सकाळी एक ग्लास थंड दूध घेतल्यानं गॅसपासून आराम मिळतो तसेच छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येणं यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. यासोबतच शरीराला पोषक घटक आणि ऊर्जाही मिळते.

थंड दूध पोटातील गॅसची समस्या दूर करण्यासाठीही थंड दूध उपयुक्त ठरू शकतं. रोज सकाळी एक ग्लास थंड दूध घेतल्यानं गॅसपासून आराम मिळतो तसेच छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येणं यासारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. यासोबतच शरीराला पोषक घटक आणि ऊर्जाही मिळते.

Right Time To Drink Milk: केवळ लहान मुलांनीच नाही तर, प्रौढांनीही मर्यादित प्रमाणात दूध प्यावं. शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूध प्यायल्यानं भरून निघते. दूध पिण्यामुळं हाडं मजबूत होतात आणि स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 नोव्हेंबर : लहानपणापासूनच पालक मुलांनी दूध प्यावं यासाठी आग्रह करत असतात. दूध प्यायल्यानं मुलं कुशाग्र आणि हुशार बनतात हे बऱ्याच अंशी सत्य आहे. यामुळंच मुलांच्या विकासासाठी त्यांनी दुधाचं सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ लहान मुलांनीच नाही तर, प्रौढांनीही मर्यादित प्रमाणात दूध प्यावं. शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूध प्यायल्यानं भरून निघते. दूध पिण्यामुळं हाडं मजबूत होतात आणि स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. भूक लागल्यावर लोक अनेकदा दूध पितात.

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी1, बी2, बी12, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे अनेक आवश्यक घटक दुधामध्ये आढळतात. पण दूध पिण्याची योग्य वेळ काय आहे, हे माहीत असणं आवश्यक आहे. केव्हाही दूध प्यायल्यानं त्याचा शरीरावर योग्य परिणाम होत नाही. तर, जाणून घेऊ कोणत्या वेळी दूध प्यायल्यानं शरीराला (Right Time To Drink Milk) फायदा होतो.

दूध पिण्याची ही योग्य पद्धत (Best Way To Drink Milk)

आयुर्वेदानुसार लिंबूवर्गीय फळांसह दुधाचं सेवन कधीही करू नये. यामुळंच आयुर्वेदात मिल्क शेक पिण्यास मनाई करण्यात आली आहे. आयुर्वेदानुसार आंबा, केळी, खरबूज आणि इतर लिंबूवर्गीय फळांसोबत दूध किंवा दही सेवन करू नये.

आयुर्वेदानुसार केळीचे सेवन दुधासोबत करू नये. जेव्हा केळं दुधात मिसळतं, तेव्हा त्यात गॅस्ट्रिक अॅसिड तयार होऊ लागतं, जे आतड्यांमध्ये जाऊन समस्या निर्माण करू शकतं. दुधासोबत केळीचं सेवन केल्यास सर्दी, खोकला, अ‌ॅलर्जी होऊ शकते. तसंच, शरीरावर लाल चट्टे येण्याची शक्यता असते.

दूध पिण्याची योग्य वेळ (Best Time To Drink Milk)

आयुर्वेदानुसार, जर तुम्हाला तुमचे स्नायू मजबूत करायचे असतील तर तुम्ही सकाळी दुधाचे सेवन केले पाहिजे.झोप येण्यात अडचण येत असेल तर, रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधासोबत दूध घ्या. आयुर्वेदानुसार यामुळं स्मरणशक्ती वाढते आणि झोप चांगली लागते.

हे वाचा - या मराठमोळ्या अभिनेत्रीचं थाटात पार पडलं डोहाळे जेवण; VIDEO शेअर करत दिली आनंदाची बातमी

आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्तीनं दूध प्यावं. मात्र, तुम्हाला दुधाची अॅलर्जी असेल तर, त्याचं सेवन करू नका. आयुर्वेदानुसार रात्री जेवल्यानंतर आणि झोपण्याच्या अर्धा तास आधी दूध प्या. यामुळं शरीर निरोगी राहतं.

ज्या लोकांना दूध प्यायला आवडत नाही त्यांनी सकाळी कधीही दूध पिऊ नये. सकाळी दूध प्यायल्यानं ते पचण्यास त्रास होऊ शकतो. असं केल्यानं दिवसभर सुस्तपणा जाणवू शकतो आणि शरीर थकलेलं राहू शकते.

आयुर्वेदानुसार, 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी दूध पिऊ नये. कारण, त्यामुळं अ‌ॅसिडिटी होऊ शकते. याशिवाय, खारट पदार्थांसह चुकूनही दुधाचं सेवन करू नका.

हे वाचा - गर्लफ्रेंड निघाली पक्की जासूस, बेडवरच्या केसावरून लावला दुसऱ्या गर्लफ्रेंडचा शोध

रात्री दूध पिण्याचे फायदे (Milk Drink at Night Benefits)

आयुर्वेदात दूध पिण्याची उत्तम वेळ म्हणजे रात्री. आयुर्वेदानुसार शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी रात्री जेवण केल्यानंतर आणि झोपण्याच्या अर्धा तास आधी दुधाचं सेवन करावं. वास्तविक, झोपताना तुमची पचनसंस्था जलद काम करते. ज्यामुळं दूध योग्य प्रकारे पचण्यास मदत होते. दुधामध्ये असे घटक आढळतात, जे चांगल्या झोपेसाठी देखील फायदेशीर ठरतात. रात्री दूध प्यायल्याने शरीरात कॅल्शियम अधिक चांगल्या प्रकारे साठवता येतं. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात थोडी हळद मिसळून प्या. याच्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचन सुधारते.

First published:

Tags: Dangerous milk combinations, Health Tips