Home /News /lifestyle /

पोटदुखीसुद्धा Heart Attack चं कारण असू शकतं; या पद्धतीनं ओळखा लक्षणं, वेळीच घ्या खबरदारी

पोटदुखीसुद्धा Heart Attack चं कारण असू शकतं; या पद्धतीनं ओळखा लक्षणं, वेळीच घ्या खबरदारी

हृदयविकाराच्या समस्येशी संबंधित आणखी काही लक्षणं आहेत. हृदयाशी संबंधित काही गोष्टी समजून घेतल्यास होणारी मोठी दुर्घटना आधीच टाळता (heart attack and symptoms) येऊ शकते.

    नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : आजच्या काळात प्रत्येकजण धावपळीचं जीवन जगत आहे. कामाच्या तणावाखाली आपण आपल्या खाण्यापिण्याकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. असंतुलित आहारामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळेच आजकाल हृदयविकाराच्या झटक्याशी (heart attack) संबंधित अनेक समस्या उद्भवत आहेत. हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, पक्षाघात यांसारखे आजार आजच्या काळात कॉमन झाले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याची सामान्य लक्षणे म्हणजे छातीत दुखणे, मान दुखणे, धाप लागणे इ. पण तुम्हाला माहीत आहे का की हृदयविकाराच्या समस्येशी संबंधित आणखी काही लक्षणं आहेत. हृदयाशी संबंधित काही गोष्टी समजून घेतल्यास होणारी मोठी दुर्घटना आधीच टाळता (heart attack and symptoms) येऊ शकते. जेव्हा जेव्हा आपल्या शरीराच्या धमन्यांमध्ये काही प्रकारची समस्या उद्भवते तेव्हा यामुळे आपले हृदय ऑक्सिजन युक्त रक्त पुरवू शकत नाही. या समस्येमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. विशेष म्हणजे पोटदुखीशी हृदयाचाही संबंध असतो, जसे की पोटदुखी आणि गॅस इत्यादी समस्या देखील होऊ शकतात. हार्ट अटॅकचा पोटदुखीशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया- पोटाशी संबंधित लक्षणं जाणून घ्या साधारणपणे, आपल्याला श्वास घेण्यास त्रास होणे, हृदयाचे अनियमित ठोके, छातीत दुखणे ही लक्षणे हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य लक्षणे मानली जातात. याशिवाय हृदयविकाराच्या झटक्याची काही महत्त्वाची लक्षणेही आहेत. ही अशी लक्षणे आहेत, ज्याकडे अनेकजण कधीच लक्ष देत नाही. यापैकी एक म्हणजे पोटदुखी. हृदयविकाराच्या समस्येच्या वेळी, हृदय शरीराला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे करू शकत नसेल, तर पोटात अनेक प्रकारचे रासायनिक बदल घडून येण्याची लक्षणे दिसू शकतात. 1. पोटदुखी काही रुग्णांमध्ये, या समस्येदरम्यान तीव्र पोटदुखीची समस्या देखील असू शकते. पोटदुखीत तीव्र वेदना होत असतील तर त्याचा संबंध हृदयविकाराशी असू शकतो. जेव्हा तुमच्या हृदयाला योग्य रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा शरीरातील रक्त परिसंचरण थांबते आणि नंतर पोटात आम्लता वाढते, ज्यामुळे पोटदुखी होते. 2. अपचन आणि ढेकर येणे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अपचन आणि ढेकरही रुग्णाला येतात. जर तुम्हाला सतत अपचन आणि ढेकर येत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. काही रिपोर्ट्सनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी अपचन आणि ढेकर येण्याची समस्या जास्त असू शकते. इतकेच नाही तर रुग्णांना मळमळण्याची समस्या देखील असू शकते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर ते गांभीर्याने घ्या. 3. अतिसार आणि उलट्या आतड्याला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळे किंवा समस्या आल्याने तुमच्या आतड्याला रक्तपुरवठा होण्यात अडथळा येतो, त्यामुळे रुग्णाला उलट्या आणि जुलाबाचा त्रासही होतो. असे म्हटले जाते की जेव्हा आपल्या शरीरातील धमन्यांमध्ये अडथळा येतो तेव्हा पोटाचा त्रास होतो. हे वाचा - Health Budget 2022: अर्थसंकल्पातून आरोग्य विभागाला मिळाला का बूस्टर डोस? आणखी 75 हजार ग्रामीण आरोग्य केंद्रे उघडणार डॉक्टरांशी संपर्क साधा जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या झपाट्याने होत असेल तर नक्कीच ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. या समस्या कोणीही हलक्यात घेऊ नये. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, जर तुम्हाला तुमच्या पोटाशी संबंधित लक्षणांसह या समस्या येत असतील, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा- - डोके हलके वाटणे किंवा चक्कर येणे - थंड वातावरणातही भरपूर घाम येणे - थकवा आणि अशक्तपणा - उलट्या आणि मळमळांसह पोटदुखी - छातीत दुखणे आणि श्वास घेण्यात अडचण हे वाचा - तुमचं वेगात चालणं Heart फेल होण्यापासून वाचवू शकतं; या स्पीडनं चालणं आहे सर्वोत्तम हृदयविकाराचा झटका प्रतिबंधक टिप्स स्वतःला तणाव आणि चिंतांपासून दूर ठेवा -आरोग्यपूर्ण आहार आणि जीवनशैली निवडा -दारू आणि धूम्रपानाचे व्यसन टाळा -जंक फूडचे सेवन करू नका -फळे आणि भाज्यांचा आहार -रोज व्यायाम करा किंवा योगासने करा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Heart Attack, Tips for heart attack

    पुढील बातम्या