Home /News /lifestyle /

या 16 वर्षांच्या तरुणीनं फेरारी शर्यतीत रचला इतिहास

या 16 वर्षांच्या तरुणीनं फेरारी शर्यतीत रचला इतिहास

समाज पुरुषप्रधान असला तरी स्त्रियांनी ठरवल्यास त्या काहीही करू शकतात. माया वेगनं हेच सिद्ध केलं आहे.

    माद्रिद, 27 जानेवारी : स्पेनच्या (Spain) माया वेग (Maya Weug) हिनं फेरारीच्या शर्यतीत (Ferrari race) चमकदार यश मिळवलं आहे. यातून तिला एक मोठा सन्मानही मिळाला आहे. माया वेग केवळ 16 वर्षांची असून सध्या स्पेनमध्ये (Spain) राहते. तिला नुकताच पहिली महिला अकादमी ड्रायव्हर (first woman academy driver) बनण्याचा मान मिळाला आहे. माया यावर्षी फॉर्म्युला 4 च्या (formula 4) शर्यतीत सहभागी होणार आहे. माया इटालियन टीमच्या मारानेलो मुख्यालय आणि फियोरानो परीक्षण ट्रॅकमध्ये पाच दिवसीय स्काऊटिंग शिबिराची विजेती आहे. फॉर्म्युला वन टीमची (formula 1 team) प्रमुख मॅटिया बिनोटो हिच्या मते, 'या अकॅडमीच्या इतिहासात मायाचं दाखल होणं अतिशय अभिमानास्पद आहे. टीनएजर (Teenager) माया इथवर पोचली याचं खूप कौतुक वाटतं. यातून हेच लक्षात येतं, की या पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांनी ठरवलं तर त्या खूप प्रगती करू शकतात. मायाचे वडील डच आणि आई बेल्जीयन आहे. मायानं फेरारीची पहिली महिला अकादमी ड्रायव्हर बनण्यासाठी चार स्पर्धकांना हरवलं. यात फ्रान्सची डोरियन पिन, अँटोनेला बासानी आणि ब्राजीलची ज्युलिया अयुब यांचा समावेश आहे. मायावर ज्या लोकांनी विश्वास दाखवला त्या सर्वांचा विश्वास तिला पुढेही टिकवून ठेवायचा आहे. FIA चे अध्यक्ष जीन टॉड यांच्या मते हा मायाच्या जीवनातला अत्यंत खास क्षण आहे. सोबतच मायानं फायनलपर्यंत पोचणाऱ्या इतर चार स्पर्धकांचंही अभिनंदन केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Spain, Success story, Woman Driver

    पुढील बातम्या