Home /News /lifestyle /

82 व्या वर्षी जडला अनोखा छंद, आजीबाईंची कोरला रापचिक Tatoo

82 व्या वर्षी जडला अनोखा छंद, आजीबाईंची कोरला रापचिक Tatoo

एका 82 वर्षांच्या आजाबाईंना आता (82 year old woman gets her first tatto) टॅटू गोंदवण्याचा छंद जडला असून नुकताच त्यांनी एक अनोखा टॅटू स्वतःच्या शरीरावर गोंदवला आहे.

    लंडन, 4 नोव्हेंबर: एका 82 वर्षांच्या आजाबाईंना आता (82 year old woman gets her first tatto) टॅटू गोंदवण्याचा छंद जडला असून नुकताच त्यांनी एक अनोखा टॅटू स्वतःच्या शरीरावर गोंदवला आहे. हौसेला मोल नसतं असं म्हणतात. पण हौसेला वयदेखील नसतं, हे या (grandmother gets tatoo in the old age) आजीबाईंनी दाखवून दिलं आहे. माणसाला वयाच्या बंधनात न अढकता स्वैर आणि हौशी जीवन जगण्याचा मार्गच आजीबााईंचा हा उत्साह पाहून येत असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना वाटतं. जडला टॅटूचा छंद ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 82 वर्षांच्या जुडी डेडे यांना टॅटूचं फार आकर्षण वाटू लागलं होतं. त्यांनी घरात बसल्या बसल्या याविषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. मासिकातून, वर्तमानपत्रातून आणि गुगलवरून याबाबत अऩेक ठिकाणी वाचलं आणि टॅटू गोंदवून घेण्याचा आपला निर्णय पक्का केला. त्यांनी हा निर्णय सर्वप्रथम सांगितला तो आपल्या नातींना. मग नातींनाही उत्साह चढला आणि सर्वांनी मिळून आजीला टॅटू काढण्याची तारीख नक्की केली. सहकुटुंब टॅटू सेंटरवर जुडी यांच्यासोबत त्यांचं पूर्ण कुटूंब टॅटू गोंदवून घेण्यासाठी टॅटू सेंटरवर गेलं. आता टॅटू काढायचा, हे नक्की झालं होतं. मात्र नेमका कुठलं डिझाईन काढायचं, हे काही ठरलं नव्हतं. तिथं गेल्यावर जुडी यांच्या हातात अनेक डिझाईनचे पर्याय असणारा कागद देण्यात आला. तो कागद पाहून जुडी यांच्या गोंधळात भरच पडली. त्यातील अऩेक डिझाईन्स त्यांना आवडले आणि नेमका कुठला निवडावा, हे कळेना. नातींनी केली मदत या कामात अखेर त्यांच्या नातींनी त्यांना मदत केली. पुनर्जन्माशी निगडीत असणारा एक टॅटू आजीनं काढावा, असं त्यांच्या नातीनं सुचवलं. ही कल्पना जुडी यांना आवडली आणि टॅटूचं डिझाईन निश्चित झालं. हे वाचा- लवकरच तुमची कार धावेल 60 रुपये प्रतिलिटर दरात, मोदी सरकारचा नवा प्लॅन जुडींची सहनशक्ती तरुण वयात त्वचेवर टॅटू काढणं हे तुलनेनं सोपं असतं. मात्र वार्धक्यात शरीराला सुरकुत्या पडलेल्या असताना टॅटू काढणं हे मोठं आव्हान असतं. वार्धक्यात शारीरिक सहनशक्तीदेखील कमी झालेली असते. त्यामुळे टॅटूची जखम भरून येऊन त्यातून सावरायला काहीसा वेळ जातो. मात्र जुडी यांनी हे सगळं अगदी सहजपणे आणि आनंदानं केलं. त्यांनी टॅटू काढून घेतला आणि आनंदानं त्या घरी आल्या.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Britain, Lifestyle, Old woman

    पुढील बातम्या