जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / टेस्टी आणि हेल्दी; तोंडाला चव देणाऱ्या 8 चटण्या आहेत आरोग्यदायी

टेस्टी आणि हेल्दी; तोंडाला चव देणाऱ्या 8 चटण्या आहेत आरोग्यदायी

टेस्टी आणि हेल्दी; तोंडाला चव देणाऱ्या 8 चटण्या आहेत आरोग्यदायी

चवीला म्हणून चटणी (chutneys) आपण तोंडी लावायला घेतो, पण ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? असा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडतो.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    डोसा, पराठा, पुलाव किंवा नान या पैकी काहीही खात असलात तरी, त्यासोबत जर चटणी असेल तर खाण्याची मजा अधिक वाढते. चटणी भारतातल्या कानाकोपऱ्यातील घरामध्ये जेवणाच्या थाळीचा अविभाज्य भाग आहे. भारतातल्या निरनिराळ्या प्रदेशांच्या खाद्यसंस्कृती मध्ये इतकी विविधता आहे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. पण अनेकदा हा प्रश्न मनात निर्माण होतो कि चटण्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत का? तर याचे साधे सरळ उत्तर हो आहे. जर तुम्ही घरी बनवलेली कमी साखर , मीठ आणि प्रिझार्वेटीव असलेल्या चटण्या खात असाल तर ती तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. जर्नल ऑफ फूड सायन्स आणि टेक्नोलॉजीमध्ये 2018 साली हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला. घरी बनवण्यात आलेल्या ताज्या चटण्या त्यातील घटक पदार्थांमध्ये असलेल्या पोषक द्रव्यांनी समृद्ध असतात जे पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. चला तर कोणत्या चटणीचे काय फायदे आहेत ते पाहुयात. पुदिना-कोथिंबीर चटणी इतर सर्व वनस्पतीप्रमाणेच पुदिना आणि कोथींबीर जीवनसत्वे, क्षार आणि अँन्टीऑक्सिडंट यांनी समृद्ध असतात. त्याच बरोबर त्यात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं आणि तंतुमय पदार्थ चांगल्या प्रमाणात असतात. त्यात लसूण आणि हिरवी मिरची घातली तर त्यांचे गुण अजून वाढतात. कैरीची चटणी कैरीमध्ये जीवनसत्व अ, क आणि ई असतात, सोबत त्यात क्षार आणि अँन्टीऑक्सिडंट यांचं प्रमाण उत्तम असतं. जरी ते फक्त उन्हाळ्यात मिळतात तरी ते खूप पौष्टिक असतात आणि त्यापासून आंबटगोड अशी लज्जतदार चटणी बनवली जाते. या चटणीमध्ये पांढरी साखर घालणं टाळा. त्याऐवजी गूळ किंवा, ब्राऊन शुगर घालून त्याच्या गोडव्यात भर घाला. लसणाची चटणी अँन्टीऑक्सिडंट या शोध मासिकात 2020 मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार लसणामध्ये अनेक पोषक मूल्यं आहेत आणि अनेक आजारांना प्रतिबंध करणारे औषधी गुण आहेत. रोज लसूण खाल्ल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कॉलेस्ट्रोल आणि हृद्य विकार होण्याचा धोका कमी होतो. शेंगदाणे , खोबरे, आणि लाल मिरची, तिखट घालून लसणाची चटणी बनवली जाते. त्यामुळे त्यातील अँन्टीऑक्सिडंटचं प्रमाणही वाढतं आणि ती अधिक चविष्टही होतं. टोमॅटो चटणी टोमॅटो क, ब, आणि ई जीवनसत्वाने समृद्ध आहेत. सोबतच त्यात पोटॅशिमयम यासारखे क्षार पण भरपूर प्रमाणात असतात. शिवाय त्यात जैव क्रिया वाढवणारे लायकोपेन नावाचं संयुगही असतं. लायकोपेनमुळे शरीरातील पेशींची हानी टाळता येते आणि म्हणून ते रोगप्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच रोज टोमॅटो चटणी रोज खाणं उत्तम आहे फक्त त्यात साखर घालू नका. त्याऐवजी त्यात गूळ किंवा खजूर घालावं ते आरोग्यास फायदेशीर तर आहेच. त्याने त्या चटणीच्या चविष्टपणाचं संतुलन साधलं जातं. नारळाची/ खोबऱ्याची चटणी नारळ फॅटी पदार्थांनीयुक्त असल्याचं मानलं जातं. नारळामध्ये उच्च प्रमाणात, तंतुमय पदार्थ, तांबे, मँगनीज, लोह, सेलेनियम आणि फॉस्फरस असतं. जरी त्यात खूप जास्त प्रमाणात जीवनसत्वे नसली तरी ते पोषक असतात आणि चटणी बनवण्यास उत्तम असतात. शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्यामध्ये उच्च प्रमाणात कॅलरी असतात पण त्यात कार्बोदकांचं प्रमाण कमी असतं. त्यात वनस्पतीजन्य प्रथिनं, जीवनसत्वं, क्षार आणि अँन्टीऑक्सिडंट यांचं प्रमाण उत्तम असतं. शेंगदाण्याच्या चटणीमध्ये टोमॅटो, कांदा, लसूण यांचा वापरही अनेकदा केला जातो त्याने त्याचे पोषणमूल्य वाढतं. चिंचेची चटणी या आंबट फळामध्ये अतिशय अधिक प्रमाणात बी 1, बी 2, बी 3 आणि बी 5 ही जीवनसत्वे असतात. तसंच त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे क्षारही असतात. चिंच फ्लेवोनोईडनं समृद्ध आहे. त्यामुळे ती आरोग्यासाठी अधिक उत्तम आहे. चिंचेच्या चटणीत सुंठ पावडर आणि हिंग यांचा उपयोग केला जातो. भांगेच्या बियांची चटणी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या प्रदेशांमध्ये भांगेच्या बियांपासून बनवलेली चटणी आवडीने खाल्ली जाते. या बियांमध्ये सर्व नऊ प्रकारचे अमिनो अॅसिड असतात. या बिया ओमेगा 3 फॅटी एसिड, तंतुमय पदार्थ, जीवनसत्व, ई आणि बी 6, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस यांनी युक्त असतात. भांगेची चटणी खाल्ल्यानं हृदय, चयापचय आणि बौद्धिक आरोग्य उत्तम होतं. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहार न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित_._ वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून_, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: food , health
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात