जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हीही कामाच्या ठिकाणी नेहमी बिझी असता का? मग या 7 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या

तुम्हीही कामाच्या ठिकाणी नेहमी बिझी असता का? मग या 7 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या

तुम्हीही कामाच्या ठिकाणी नेहमी बिझी असता का? मग या 7 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या

7 Ways To Feel Less Busy : ऑफिसमध्ये (Office Work) इमेल करताना होणारी घाई, कॉफी पटकन न मिळाल्याने चीडचीड, पटकन उत्तर न मिळाल्याने अस्वस्थता, इ. जर तुम्ही स्वतःमध्येही असेच अनुभव घेत असाल, तर यामुळे तुमच्या कामाची कार्यक्षमता वाढण्याऐवजी कमी होऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 05 जानेवारी : नोकरी/जॉब (Work) करणाऱ्या काहींना आपण सतत व्यग्र आहोत असे वाटते. ही आजच्या पिढीची सर्वात मोठी समस्या आहे. वास्तविक, कामाच्या ठिकाणी आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे सतत व्यग्र असल्याचा आव आणतात आणि त्यांना सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती गडबड करण्याची सवय झालेली असते. त्यांना शांतपणे बसून नाश्ता करायलाही वेळ मिळत नाही. द गार्डियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, व्यग्रता ही एखाद्या संसर्गजन्य रोगासारखी आहे. त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आणि व्यग्र वाटू लागतो. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये (Office Work) इमेल करताना होणारी घाई, कॉफी पटकन न मिळाल्याने चीडचीड, पटकन उत्तर न मिळाल्याने अस्वस्थता, इ. जर तुम्ही स्वतःमध्येही असेच अनुभव घेत असाल, तर यामुळे तुमच्या कामाची कार्यक्षमता वाढण्याऐवजी कमी होऊ शकते. तुम्हालाही काम करताना सतत व्यग्र वाटत असेल आणि तणावाचा अनुभव येत असेल तर या 7 गोष्टी समजून घेणं खूप (7 Ways To Feel Less Busy ) गरजेचं आहे. 1. स्वत:ला माणूस समजा, मशीन नाही ऑफिसमध्ये चांगला ठसा उमटवण्यासाठी आणि प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त काम करू शकता असे तुम्हाला वाटत असेल, तर समजून घ्या की, तुम्ही मशीन नाही तर माणूस आहात. यंत्रासारखे काम करणे नव्हे तर, तुमच्यासाठी चांगली रात्रीची झोप, चांगली जीवनशैली, तणावमुक्त जीवन जगणे महत्त्वाचे आहे. मोठा विचार करा किंवा जीवनात सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करा, परंतु स्वत:ला माणसाच्या कक्षेत ठेवून तसे करा. कारण तुम्ही माणूस आहात आणि माणसाच्या गरजा मशीनसारख्या नाहीत. 2. पराभव स्वीकारणे म्हणजे भ्याडपणा नाही जगातल्या काही गोष्टींचा त्याग करणे ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, हे स्वत:ला समजावून सांगा. कारण तुमच्याकडे सर्व काही असू शकत नाही. कारण वेळेची मर्यादा असताना जगात साध्य करण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. अशा परिस्थितीत काही गोष्टी सोडणे ही तुमची वैयक्तिक निवड आहे, हा तुमचा भ्याडपणा नाही. 3. कामाच्या गतीला नव्हे तर गुणवत्तेला महत्त्व द्या अनेक वेळा आपण रात्रंदिवस काम करतो, तासन्तास कॉम्प्युटरसमोर बसून डेटा कॅलक्युलेशन किंवा प्रेझेंटेशन करतो. अशा स्थितीत काही तासांच्या एकाग्रतेनंतर कामाचा दर्जा चांगला राहत नाही हे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत तुम्ही अस्वस्थ होतात आणि तुम्हाला अपराधी वाटू लागते. पण खरंतर हीच मानवाची कार्यपद्धती आहे, म्हणजेच लय आहे. दोन ते तीन तासांनंतर तुमच्या मेंदूला पुरेशी विश्रांती हवी असते. अशा स्थितीत तुमच्या कामाच्या लयीचा आदर करा आणि गुणवत्तेला महत्त्व द्या. 4. तुमचे बफर तयार ठेवा बर्‍याच वेळा तुम्ही दोन बैठकांचे नियोजन करता आणि पहिली बैठक बराच काळ चालल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. ही समस्या टाळण्यासाठी, घाई करण्याऐवजी, नेहमी दोन बैठकांमध्ये बफर वेळ ठेवा. नेहमी लक्षात ठेवा की गोष्टींना तुमच्या विचारापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. असे केल्याने तुम्ही घाबरण्यापासून वाचाल. हे वाचा -  लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात 5.पूर्वग्रह सोडा अनेक वेळा पूर्वग्रहापोटी सर्व प्रकारची कामे लवकरात लवकर करून घेण्याच्या शर्यतीत आपण इकडून तिकडे धावत राहतो. हे करणे टाळा. वास्तविक, अनेक वेळा आपण कोणतेही काम कोणत्याही चांगल्या योजनेशिवाय पार पाडतो, ज्यामुळे आपल्याला घाई किंवा उशीर होण्याच्या अनुभवाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पुढच्या वेळी पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करणे, ही चांगली गोष्ट आहे. 6.स्लो डाउन आवश्यक वेळेआधी सर्व गोष्टींचा निपटारा करणं तुम्हाला सोयीस्कर वाटत असलं तरी, यामुळे तुम्हाला अधिक तणावाचा सामना करावा लागतो. दोन कामांमध्ये कमीत कमी 10 मिनिटांचा ब्रेक घेणे चांगले होईल आणि या ब्रेकमध्ये काहीही करू नका रिलॅक्स रहा. हे वाचा -  Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र 7. एकाच वेळी जास्त काम करू नका बरेच लोक त्यांच्या टू डू लिस्टमध्ये काम वाढवत राहतात. पण, तुमचे काम पूर्ण करण्याचा हा चांगला मार्ग नाही. चांगल्या कामासाठी एकावेळी 5 पेक्षा जास्त कामे हाताळण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने, तुम्ही काम तन्मयतेने कराल, जेणेकरून तुमचे दर्जेदार काम समोर येईल. कोणतेही काम घाईने पूर्ण होत नाही हे लक्षात ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात