नवी दिल्ली, 09 जानेवारी : सध्याच्या धावपळीच्या युगात वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे खूप लोक आपल्याला दिसतात. मात्र, अनेकजण असेही असतात ज्यांचे खूप प्रयत्न करूनही वजन वाढत नाही. जे खूप सडपातळ आहेत आणि त्यांच्या बारीकपणाला त्रासलेले आहेत. वजन वाढवण्यासाठी (Weight Gain) ते विविध गोष्टींचा आहारात समावेश करतात. जिममध्येही मेहनतही करतात. मात्र, तरीही अपेक्षित वजन वाढवण्यात त्यांना यश येत नाही. पण अशाही काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचे वजन लवकर वाढू शकते, त्यापैकी एक प्रोटीन (Protein Shakes For Weight Gain) शेक.
आज आपण 5 प्रकारच्या प्रोटीन शेकविषयी माहिती घेणार आहोत. जे तुम्हाला लवकरात लवकर वजन वाढवण्यास मदत करू शकतात. जाणून घेऊया वजन वाढवण्यासाठी रोजच्या आहारात कोणत्या प्रोटीन शेकचा समावेश करावा.
डार्क चॉकलेट बदाम बटर प्रोटीन शेक
डार्क चॉकलेट आणि बदाम बटरपासून तयार केलेला प्रोटीन शेक आहे. ज्यामुळे लवकरात लवकर वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यात भरपूर कॅलरीज, प्रथिने, कार्ब्स आणि फॅट असतात.
पीनट बटर केळी प्रोटीन शेक
पीनट बटर केळीचा शेक हा उच्च प्रथिनयुक्त शेक आहे, जो वजन वाढवण्यासाठी खूप जलद काम करतो. हा शेक तुम्ही अगदी स्वस्त साहित्यात घरी सहज तयार करू शकता.
हे वाचा - Health Tips: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे गाजर-आलं सूप; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत
एवोकॅडो चॉकलेट प्रोटीन शेक
वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात एवोकॅडो चॉकलेट प्रोटीन शेकचाही समावेश करू शकता. यामुळे तुमचे वजन वेगाने वाढण्यास मदत होऊ शकते. यामध्ये तुम्ही अॅव्होकॅडोसोबत चॉकलेट वापरू शकता.
केळी, आंबा आणि स्ट्रॉबेरी प्रोटीन शेक
केळी, आंबा आणि स्ट्रॉबेरी प्रोटीन शेक वजन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. दैनंदिन आहारात याचा समावेश केल्यास तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. हा प्रोटीन शेक बनवायलाही खूप सोपा आहे आणि तो काही मिनिटांत तयार होतो.
हे वाचा - कांदा-लसूण खाल्ल्यानंतर चार-चौघात तोंड उघडण्याची होते पंचाईत? दुर्गंधी घालवण्याचे हे आहेत उपाय
केळी आणि स्ट्रॉबेरी प्रोटीन शेक
केळी नेहमीच वजन वाढवण्यासाठी फायदेशीर मानली जातात. शेक बनवण्यासाठी केळ्यासोबत स्ट्रॉबेरीचाही वापर करू शकता. हा आंबट-गोड प्रोटीन शेक जितका आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकाच चवीलाही चांगला आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness, Lifestyle, Weight, Weight gain