Home /News /lifestyle /

चष्म्याचा नंबर वाढतंच जातोय; डोंट वरी या 5 Therapy ने वाढवा डोळ्यांची दृष्टी

चष्म्याचा नंबर वाढतंच जातोय; डोंट वरी या 5 Therapy ने वाढवा डोळ्यांची दृष्टी

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

चष्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी या थेरेपी नक्कीच उपयुक्त ठरतील.

मुंबई, 24 नोव्हेंबर :  सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये (Corona lockdown) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच स्क्रीनशी संबंध येतोच. ऑनलाईन स्कूल (Online school), वर्क फ्रॉम होम (Work from home) यामुळे जास्तीत जास्त वेळ मोबाईल (Mobile), लॅपटॉप (Laptop) याच्यासमोरच जातो. त्यामुळे डोळ्यांवर ताण पडतो (Eye health) परिणामी डोळ्यांची दृष्टी कमजोर होते (Eye problem) आणि मग नीट दिसण्यासाठी चष्मा लावण्याशिवाय पर्याय नसतो (Eye sight problem). अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत बऱ्याच जणांना अकाली चष्मा (Eyeglasses) लागत आहे. सतत अनेक तास काम करणं आणि बदलत्या जीवनशैलीमुळे चष्मा लागतो आणि चष्म्याचा नंबर (Eyeglass number) वाढतही जातो. दृष्टीची क्षमता वाढवण्यासाठी विशेष असं औषध नाही; पण अशा अनेक थेरपी आहेत, की ज्यांच्या साह्याने चष्म्याचा नंबर नक्कीच कमी केला जाऊ शकतो (Tips to decrese eyeglass number). अशाच काही थेरपीजची माहिती घेऊ या. शिरोधारा थेरपी (Shirodhara Therapy) : ही अनेक बाबींसाठी फायदेशीर आहे. या थेरपीमध्ये रुग्णाला टेबलावर झोपवलं जातं. त्यानंतर व्यक्तीच्या कपाळावर सुमारे 45 मिनिटं औषधी तेल ओतलं जातं. निद्रानाश, मानसिक तणाव, झोप न लागणे, डोळेदुखी या सर्व समस्या कमी करण्यास शिरोधारा थेरपी मदत करते. काही जणांना मात्र ही थेरपी धोकादायक वाटते. तर्पण थेरपी (Tharpana Therapy) : या थेरपीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. नेत्रआरोग्यासाठी ही थेरपी उपयुक्त ठरते. या थेरपीमध्ये डोळ्यांभोवती पिठाचा गोळा लावला जातो. डोळ्यांभवती बनलेल्या या खळग्यात औषधी वनस्पतींपासून तयार केलेलं तूप ओतलं जातं. यामुळे डोळ्यांच्या पेशींना पोषण मिळतं. यामुळे दृष्टी वाढण्यास मदत होते. तसंच डोळ्यांचा थकवाही दूर होतो. हे वाचा - फक्त एका फोटोवरून ओळखा तुमचे डोळे किती निरोगी? घरच्या घरी करा ही सोपी EYE TEST आश्चोतन थेरपी (Aschyotana Therapy) : सकस आहार घेऊन आणि व्यायाम करूनही चष्म्याचा नंबर कमी होत नसेल तर आश्चोतन थेरपी खूप उपयुक्त ठरते. आश्चोतन थेरपीमध्ये औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधाचे 8-10 थेंब नाकाच्या कँथसवर टाकले जातात. यामुळे डोळ्यांच्या पेशी साफ होण्यास मदत होते.  नेत्रधारा थेरपी (Netradhara Therapy) : चष्म्याचा नंबर सतत वाढत असेल तर नेत्रधारा थेरपी उपयुक्त ठरू शकते. ही थेरपी करताना आडवं झोपवून नाकाच्या कँथसवर 5-6 इंच उंचीवरून 2 ते 3 मिनिटं तेलाची पातळ धार सोडली जाते. यामुळे डोळ्याची स्रोतसं स्वच्छ होतात. ही थेरपी डिटॉक्सिफिकेशनसाठीदेखील कार्य करते. डोळ्यांतली विषारी द्रव्यं बाहेर या थेरपीमधून बाहेर पडतात.  अंजन थेरपी (Anjana Therapy) : चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी अंजन थेरपी फायदेशीर ठरते. खनिजं, धातू आणि औषधी वनस्पतींच्या मिश्रणाने बनवलेली औषधं या थेरपीमध्ये वापरण्यात येतात. या सर्व गोष्टी मिक्स करून पेस्ट बनवायची असते आणि नंतर ती डोळ्यांना लावायची असते. त्यामुळे डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते. हे वाचा - चष्म्यापासून लवकर मुक्तता हवी; आहारात समाविष्ट करा फक्त हे 5 पदार्थ या थेरपी केल्यास दृष्टीमध्ये स्पष्टता आणता येते आणि यामुळे चष्म्याचा नंबरदेखील कमी होऊ शकतो. यासोबतच आहारावरही लक्ष केंद्रित करावं. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि शरीरासाठी आरोग्यदायी अशा गोष्टी करणं गरजेचं असतं. (सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
First published:

Tags: Eyes damage, Health, Lifestyle

पुढील बातम्या