व्यस्त जीवनात लोक केवळ अनेक शारीरिक समस्यांपासून ग्रस्त नसतात तर त्यांचे विवाहित जीवनही वाईट रीतीने प्रभावित होत असते. शारीरिक समस्यांमुळे एखादी व्यक्ती आपल्या विवाहित जीवनात लैंगिक संबंधांचा आनंद घेऊ शकत नाही. लैंगिक जीवन सुधारण्यासाठी शारीरिकदृष्ट्या निरोगी असणं आवश्यक आहे. चला अशा काही व्यायामांबद्दल जाणून घेऊया जे शारीरिक संबंध बनवण्यासाठी शरीरक्षमता वाढवतात. या व्यायामामुळे शीघ्रपतन होत नाही केगल व्यायामामुळे नाभीच्या खालपासून ते जननेंद्रियापर्यंतचे स्नायू मजबूत होतात. हा व्यायाम शीघ्रपतनआणि नपुंसकत्व सारख्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मदत करतो. इरेक्टाइल डिसफन्क्शन ही एक समस्या आहे ज्यामध्ये लैंगिक संभोगासाठी पुरुषाचे जननेंद्रिय पुरेसं उत्तेजित होत नाही. साधारणपणे 5 ते 6 आठवड्यांपर्यंत हा व्यायाम नियमित केल्याने तुम्हाला एक चांगला बदल दिसेल. यासाठी प्रथम चटईवर पाठ टेकून झोपा. यानंतर गुडघे वाकवून जवळ घ्या. दोन्ही पायांदरम्यान अंतर ठेवा. यानंतर कमरेचा खालचा भाग वरच्या दिशेने उचला. त्याने ओटीपोटाच्या स्नायूवर ताण येऊ द्या आणि नंतर काही सेकंदांनी पूर्वस्थितीत या. दिवसातून कमीतकमी 2 ते 3 वेळा हा व्यायाम केला जाऊ शकतो. कुंभकासन (प्लँक पोझ) व्यायामामुळे लैंगिक सामर्थ्य वाढेल myupchar.com च्या मते प्लॅंक पोज (कुंभकासन योग) व्यायामामुळे लैंगिक शक्ती वाढवण्यात मदत होते. यामुळे अंतर्गत स्नायू मजबूत होतात. या व्यायामाने शरीरसंबंध दीर्घ काळ करण्याची क्षमता येते. या व्यायामात चटईवर पोटाच्या आधारे झोपा. मग मनगटाच्या जोरावर उठून पाय वरच्या बाजूस वर करा. 1-2 मिनिटांसाठी ही स्थिती धरा. ही वेळ हळूहळू वाढवली जाऊ शकते. स्क्वॅट्स या व्यायामाने वाढतात आनंद वाढवणारे संप्रेरक स्क्वाट्सचा अभ्यास केल्याने टेस्टोस्टेरॉन संप्रेरकांची पातळी वाढते. याव्यतिरिक्त ओटीपोटाच्या तळाजवळील स्नायूंमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो. जर आपण हा व्यायाम नियमितपणे करत असाल तर शारीरिक शक्ती देखील वाढते आणि यामुळे शरीरात आनंद देणारे संप्रेरकदेखील वाढतात. यासाठी प्रथम चटईवर सरळ उभे रहा आणि दोन्ही हात समोरच्या करा. मग आपले गुडघे वाकवून खुर्चीवर बसल्यासारख्या स्थितीत या. हा व्यायाम करत असताना दोन्ही पायांच्या मध्ये समान अंतर असले पाहिजे. पुश****अप व्यायामामुळे शरीर मजबूत होते myupchar.com च्या नुसार हा व्यायाम केल्याने शरीराचा वरचा बांधा मजबूत होतो. याचा अभ्यास शरीरातील सर्व स्नायूंना सामर्थ्य देते आणि सतत पुशअप व्यायाम केल्याने संभोगादरम्यान थकवा जाणवत नाही. पुशअप करणं खूप सोपं आहे. हे करण्यासाठी चटईवर पोटाच्या आधारे झोपा. मग तळव्यांच्या सामर्थ्याने थांबा आणि शरीराच्या आधारे उठा. मग पाय अंगठ्यासह वर घेण्याचा प्रयत्न करा. मग परत खाली या. थकवा येईपर्यंत वर आणि खाली ही प्रक्रिया करत रहा. उदराच्या व्यायामांनी पाठीच्या खालचे स्नायू अधिक मजबूत होतील लैंगिक संबंध स्थापित करण्या दरम्यान शरीराचा खालील भाग मजबूत असणे महत्वाचे आहे. जर खालचा भाग अशक्त राहिला तर आपण लैंगिक जीवनाचा आनंद घेऊ शकणार नाही. शारिराच्या खालील भागाच्या मजबूती साठी उदराशी संबंधित व्यायाम अत्यंत उपयुक्त आहेत. उदराशी संबंधित व्यायाम (एब वर्कआऊट) करण्यासाठी पाठीच्या आधारे जमिनीवर झोपा. नंतर चिकटून आपले दोन्ही पाय सरळ करा. यानंतर, हात डोक्याच्या मागे न्हेऊन एकमेकांना चिकटवा. यानंतर, कूल्हयांच्या बाजूने जोर लाऊन ढकलताना दोन्ही पाय जमिनीपासून वर खेचत न्ह्या. यानंतर हात सरळ ठेऊन कंबरेपासून वळाण्याचा प्रयत्न करा. मग, कूल्हयावर पडताना पाय सरळ ठेवून हातांना स्पर्श करा. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - लैंगिक आरोग्य न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.