जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / लाइफस्टाइल / So expensive! 5 घटकांसमोर मौल्यवान सोनं, हिरेही कवडीमोल; किंमत वाचूनच थक्क व्हाल

So expensive! 5 घटकांसमोर मौल्यवान सोनं, हिरेही कवडीमोल; किंमत वाचूनच थक्क व्हाल

मौल्यवान वस्तूंच्या (expensive elements) यादीत आपल्या लेखी पहिलं नाव असतं ते सोन्याचं (gold). त्याहून अधिक मौल्यवान म्हणजे हिरे (diamond). प्लॅटिनम (platinum) या महाग धातूबद्दलही सर्वसामान्यांना अलीकडेच माहिती होऊ लागली आहे. पण हिरे किंवा सोनं अगदी कवडीमोल ठरेल एवढी महाग असलेली मूलद्रव्यंही पृथ्वीच्या पाठीवर आहेत.

01
News18 Lokmat

चीनवर अवलंबून न राहण्याचा प्रयत्न भारत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने अर्जेंटिनातल्या एका कंपनीशी लिथियमच्या (Lithium) आयातीसंदर्भात करार केला. रिचार्जेबल बॅटरीनिर्मितीमध्ये (Rechargeable Lithium) लिथियमची नितांत गरज असते आणि लिथियमसाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, 2019मध्ये भारताने लिथियम बॅटरीजची तिप्पट आयात केली होती. लिथियमपेक्षाही महाग असलेली अनेक द्रव्ये आहेत.

जाहिरात
02
News18 Lokmat

फ्रॅनशियम (Fransium) : फ्रॅनशियमची किंमत प्रति ग्रॅम एक अब्ज डॉलर एवढी आहे. हे मूलद्रव्य इतकं महाग का आहे, असा विचार तुमच्या मनात आला असेल. फ्रॅनशियम केवळ 22 मिनिटांपर्यंतच वातावरणात राहू शकतं. त्यानंतर ते गायब होतं. म्हणूनच फ्रॅनशियमचे प्रति ग्रॅम सैद्धांतिक आहे. एवढ्या प्रमाणातही ते वातावरणात राहू शकत नाही. फ्रॅनशियम कशातही वापर केला जात नाही. त्यामुळे त्याची निर्मिती होत नाही.

जाहिरात
03
News18 Lokmat

कॅलिफोर्नियम (Californium) : कॅलिफोर्नियमची प्रति ग्रॅम किंमत 25 मिलियन डॉलर एवढी असते. हा घटक 1950 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात तयार करण्यात आला होता. क्युरियम आणि अल्फा पार्टिकल यांच्या संयोगातून कॅलिफोर्नियम बनवण्यात आलं होतं. आतापर्यंत अगदीच थोड्या प्रमाणात याची निर्मिती करण्यात आली आहे. याची निर्मिती एका वेळी जास्तीत जास्त अर्धा ग्रॅम इतक्या प्रमाणातच केली जाते. सोन्यासारखी अन्य मूलद्रव्यं शोधण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

जाहिरात
04
News18 Lokmat

कार्बन (Carbon) : याची किंमत 65 हजार डॉलर असते. कार्बनचा जीवसृष्टीशी महत्त्वाचा संबंध आहे. कार्बनच्या प्रकारानुसार त्याची किंमत ठरते. कार्बनपासून कोळसा बनतो, तो जास्त महाग नसतो; पण कार्बनपासून हिराही बनतो आण तो करोडो रुपयांचाही असू शकतो.

जाहिरात
05
News18 Lokmat

प्लुटोनियम (Plutonium): अण्वस्त्र (Nuclear Weapon) आणि अणुभट्ट्या (Nuclear Reactor) आदींच्या निर्मितीसाठी प्लूटोनियमचा वापर होतो. हे किरणोत्सारी (Radioactive) मूलद्रव्यं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जीवनात त्याचा वापर होत नाही. त्याचा वापर करण्यासाठी लायसेन्सची आवश्यकता असते. त्याचा दर प्रति ग्रॅमला चार हजार डॉलर एवढा असतो.

जाहिरात
06
News18 Lokmat

स्कँडियम (Scandium) : पृथ्वीवर फारच कमी प्रमाणात आढळणाऱ्या या धातूचा शोध 1970मध्ये लागला होता. मिश्रधातूंच्या निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो. त्याची किंमत 270 डॉलर प्रति ग्रॅम एवढी असते. ही किंमत कमी वाटते; मात्र त्याचा वापर जिथे करावा लागतो, तिथे मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यामुळे त्याचं मूल्य वाढतं. जगभरात याचा व्यापार सुमारे 10 मिलियन ग्रॅमचा होतो, त्याची किंमत 2.7 अब्ज डॉलर एवढी होते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    So expensive! 5 घटकांसमोर मौल्यवान सोनं, हिरेही कवडीमोल; किंमत वाचूनच थक्क व्हाल

    चीनवर अवलंबून न राहण्याचा प्रयत्न भारत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने अर्जेंटिनातल्या एका कंपनीशी लिथियमच्या (Lithium) आयातीसंदर्भात करार केला. रिचार्जेबल बॅटरीनिर्मितीमध्ये (Rechargeable Lithium) लिथियमची नितांत गरज असते आणि लिथियमसाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, 2019मध्ये भारताने लिथियम बॅटरीजची तिप्पट आयात केली होती. लिथियमपेक्षाही महाग असलेली अनेक द्रव्ये आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    So expensive! 5 घटकांसमोर मौल्यवान सोनं, हिरेही कवडीमोल; किंमत वाचूनच थक्क व्हाल

    फ्रॅनशियम (Fransium) : फ्रॅनशियमची किंमत प्रति ग्रॅम एक अब्ज डॉलर एवढी आहे. हे मूलद्रव्य इतकं महाग का आहे, असा विचार तुमच्या मनात आला असेल. फ्रॅनशियम केवळ 22 मिनिटांपर्यंतच वातावरणात राहू शकतं. त्यानंतर ते गायब होतं. म्हणूनच फ्रॅनशियमचे प्रति ग्रॅम सैद्धांतिक आहे. एवढ्या प्रमाणातही ते वातावरणात राहू शकत नाही. फ्रॅनशियम कशातही वापर केला जात नाही. त्यामुळे त्याची निर्मिती होत नाही.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    So expensive! 5 घटकांसमोर मौल्यवान सोनं, हिरेही कवडीमोल; किंमत वाचूनच थक्क व्हाल

    कॅलिफोर्नियम (Californium) : कॅलिफोर्नियमची प्रति ग्रॅम किंमत 25 मिलियन डॉलर एवढी असते. हा घटक 1950 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात तयार करण्यात आला होता. क्युरियम आणि अल्फा पार्टिकल यांच्या संयोगातून कॅलिफोर्नियम बनवण्यात आलं होतं. आतापर्यंत अगदीच थोड्या प्रमाणात याची निर्मिती करण्यात आली आहे. याची निर्मिती एका वेळी जास्तीत जास्त अर्धा ग्रॅम इतक्या प्रमाणातच केली जाते. सोन्यासारखी अन्य मूलद्रव्यं शोधण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    So expensive! 5 घटकांसमोर मौल्यवान सोनं, हिरेही कवडीमोल; किंमत वाचूनच थक्क व्हाल

    कार्बन (Carbon) : याची किंमत 65 हजार डॉलर असते. कार्बनचा जीवसृष्टीशी महत्त्वाचा संबंध आहे. कार्बनच्या प्रकारानुसार त्याची किंमत ठरते. कार्बनपासून कोळसा बनतो, तो जास्त महाग नसतो; पण कार्बनपासून हिराही बनतो आण तो करोडो रुपयांचाही असू शकतो.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    So expensive! 5 घटकांसमोर मौल्यवान सोनं, हिरेही कवडीमोल; किंमत वाचूनच थक्क व्हाल

    प्लुटोनियम (Plutonium): अण्वस्त्र (Nuclear Weapon) आणि अणुभट्ट्या (Nuclear Reactor) आदींच्या निर्मितीसाठी प्लूटोनियमचा वापर होतो. हे किरणोत्सारी (Radioactive) मूलद्रव्यं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जीवनात त्याचा वापर होत नाही. त्याचा वापर करण्यासाठी लायसेन्सची आवश्यकता असते. त्याचा दर प्रति ग्रॅमला चार हजार डॉलर एवढा असतो.

    MORE
    GALLERIES

  • 06 06