लंडन, 28 जून : वाढत्या वजनाचा आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतो (Obese man died in UK). लठ्ठपणामुळे अनेक समस्या बळावतात आणि हाच लठ्ठपणा मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकतो. अशाच एका लठ्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 37 व्या वयात ही व्यक्ती तब्बल 370 किलोची झाली. हळूहळू या व्यक्तीच्या अवयवांनी काम करणं बंद केलं आणि आता त्याचा जीव गेला आहे (Fattest 350 kg weighed man died).
यूकेतील सर्वात लठ्ठ व्यक्ती मॅथ्यू क्रॉफोर्डने (Matthew Crawford) जगाचा निरोप घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचं वजन 350 किलो होतं. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याच्या शरीराच्या आकारामुळे डॉक्टरांना त्याच्यावर उपचार करण्यातही समस्या येत होत्या.
आज तकने द मिररच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसर मॅथ्यू कित्येक वर्षांपासून आजारी होता. त्याच्या अवयवांनी काम करणं बंद केलं होतं.
हे वाचा - Slim Body Tips: पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे एक ड्रिंक आहे फायदेशीर; आश्चर्यकारक आहेत परिणाम
2018 साली मॅथ्यू आपल्या वजनामुळे चर्चेत आला होता. रुग्णालयात नेताना रस्ता ब्लॉक झाला होता. जेव्हा त्याला रुग्णालयात आणलं तेव्हा शरीराच्या आकारामुळे तो वॉर्डमध्ये घुसूही शकत नव्हता. इतकंच नव्हे त्याला झोपवण्यासाठी चार बेड लागले. त्याला लागलेल्या सुविधांमुळे त्याचं एका आठवड्याचं बिल जवळपास सात लाख रुपये झालं होतं. महिन्याचं बिल जवळपास 39 लाख रुपये होतं.
त्याने बेडवर झोपून शॅम्पेन बॉटलसह आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. नर्सवर हल्ला केल्याचा आरोपही त्याच्यावर होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं तेव्हा मॅथ्यूला अति वजनामुळे कोर्टात आणता येऊ शकत नाही, असं कारण देण्यात आलं तेव्हा त्याला शिक्षा म्हणून नुकसान भरपाई द्यायला लावली.
गेल्या वर्षी झालं होतं 412 किलो वजनाच्या व्यक्तीचं निधन
याआधी 52 वर्षीय बॅरी ऑस्टिन ब्रिटनमधील सर्वात लठ्ठ होता. त्याचं वजन जवळपास 412 किलो होतं. 2021 साली त्याचा मृत्यू झाला. ऑस्टिन दरदिवसाला 29 हजार कॅलरीज खात असे. म्हणजेच दहा सामान्य लोकं दिवसाला जेवढं अन्न खातात, तेवढं अन्न एकट्या ऑस्टिनला लागत असे. त्याचबरोबर तो दिवसाला 12 लिटर कोल्डींक्सही पित असे. एका समोसेमध्ये साधारणतः 252 कॅलरीज असतात, याची तुलना जर आपण ऑस्टिनच्या जेवनाशी केली तर तो दरदिवशी 115 समोसे खात असे.
हे वाचा - Health Tips : जिम सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? पाहा काय सांगतात फिटनेस ट्रेनर
सर्वात जास्त खादाड असल्यानं ब्रिटनमधील अनेक टीव्ही कार्यक्रमात त्याने हजेरी लावली होती. तसेच त्यांनी ब्रिटनमधील 'द फॅटेस्ट मॅन इन ब्रिटन' नावाच्या एका कार्यक्रमात सहभागही घेतला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.