हरिद्वार, 21 मे : हिंदू धर्माचा पाया वैदिक आणि सांस्कृतिक संस्कारांवर आधारित आहे. हिंदू धर्मात संस्कार म्हणजेच संस्कारांना मोठे महत्व प्राप्त असून त्यांचे हिंदूंच्या जीवनातील योगदान देखील मोठे आहे. प्राचीन काळी ऋषी-मुनींनी मानवी जीवनाला उन्नत करण्यासाठी संस्कारांना महत्व दिले होते. हिंदू धर्माची प्राचीन संस्कृती ही संस्कारांवर आधारित आहेत. व्यक्तीच्या आयुष्यात एकूण 16 संस्कारांना विशेष महत्व असते. तेव्हा गर्भात असल्यापासून ते वृध्दापकाळापर्यंत आपल्यावर कोणकोणते संस्कार होत असतात हे जाणून घेऊयात. मानवी जीवनात कोणतेही काम करायचे असेल तर त्याची सुरुवात काही संस्कारांनी केले जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये 16 संस्कारांचे तपशीलवार वर्णन केले आहे. तेव्हा या १६ संस्कारां विषयी जाणून घेऊयात. 1.गर्भ संस्कार 2. पुंसवन संस्कार 3. सीमन्तोन्नयन संस्कार 4. जातकर्म संस्कार 5. नामकरण संस्कार 6. निर्गमन संस्कार 7. अन्नप्राशन संस्कार 8. मुंडण संस्कार 9. विद्यारंभ संस्कार 10. कर्णवेध संस्कार 11. यज्ञोपवीत संस्कार 12. वेदारंभ संस्कार 13. केशांत संस्कार 14. समावर्तन संस्कार 15. विवाह संस्कार 16. अंत्यसंस्कार संस्कारांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आम्ही ज्योतिषी शशांक शेखर शर्मा यांच्याशी बोललो, त्यांनी सांगितले की शास्त्रामध्ये 16 संस्कारांचे तपशीलवार वर्णन केले आहे. संस्कार केवळ आपले वैयक्तिक स्वरूप दर्शवितात. जर तुमची वागणूक इतर लोकांशी चांगली असेल तर लोक म्हणतात की तुमचे संस्कार खूप चांगले आहेत. इतरांचा आदर करण्यासाठी तुम्हाला मिळालेले संस्कार तुमच्या कुटुंबाशी जोडलेले आहेत. गर्भ संस्कार : पहिला संस्कार म्हणजे गर्भ संस्कार, ज्यामध्ये तुम्ही जन्माला यायच्या आधी, तुमच्या आईने तुम्हाला तिच्या पोटात घेतले. पुंसवन संस्कार : दुसरा संस्कार म्हणजे पुंसवन संस्कार जो गर्भधारणेच्या ३ महिन्यांनंतर होतो. यामध्ये, गर्भधारणेच्या 3 महिन्यांनंतर, जेव्हा बाळाची निर्मिती सुरू होते, तेव्हा पालक त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी वैदिक मंत्रांनी हा विधी करतात. सीमन्तोन्नयन संस्कार : तिसरा संस्कार हा सीमन्तोन्नयन संस्कार आहे. हा संस्कार गर्भावस्थेच्या सहाव्या महिन्यात केला जातो. सहाव्या महिन्यापासून आठव्या महिन्यापर्यंत गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते, म्हणूनच हा विधी केला जातो. न जन्मलेल्या मुलाचे आणि त्याच्या आईचे रक्षण करण्यासाठी हा विधी केला जातो. जातकर्म संस्कार : चौथा संस्कार हा जातकर्म संस्कार आहे जो मुलाच्या जन्मादरम्यान केला जातो. या विधीमध्ये मुलाचे वडील बोटाने मुलाच्या तोंडात तूप किंवा मध घालतात. नामकरण संस्कार : पाचवा विधी म्हणजे नामकरण. या संस्कारात मुलाचे नाव त्याच्या कुंडलीच्या आधारे ठेवले जाते. निर्गमन संस्कार : सहावा संस्कार म्हणजे निर्गमन संस्कार. यामध्ये मूल 4 ते 6 महिन्यांचे झाल्यावर त्याला घराबाहेर काढून सूर्य-चंद्राच्या प्रभावाखाली नेले जाते. अन्नप्राशन संस्कार : अन्नप्राशन संस्कार या विधीमध्ये मूल ६ महिन्यांचे झाल्यावर त्याला अन्न भरवले जाते. मुंडण संस्कार : आठवा संस्कार म्हणजे मुंडण संस्कार. या विधीमध्ये लहान मुलाचे मुंडण केले जाते. विद्यारंभ संस्कार : विद्यारंभ संस्कार म्हणजे, ज्यामध्ये मुलाला प्रथमच शिक्षणाची ओळख करून दिली जाते. यात मुलाला शाळेत शिकण्यासाठी पाठवले जाते. कर्णवेध संस्कार : कर्णवेध संस्कार याला कान टोचण्याचा संस्कार असेही म्हणतात. कान टोचल्याने मुलाचे आजार बरे होतात आणि त्याची आकलन शक्ती वाढते. यज्ञोपवीत संस्कार : यज्ञोपवीत संस्काराला उपनयन संस्कार असेही म्हणतात. या विधीमध्ये जनेऊ घातला जातो. वेदारंभ संस्कार : वेदारंभ संस्कारात मुलं वेद, उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी गुरुकुल मध्ये जाते. सध्या काळ बदलल्याने तो गुरुकुलात जाण्याऐवजी शिक्षणासाठी, अभ्यासासाठी शाळेत जातो. केशांत संस्कार : केशांत संस्कारात मुलांच्या डोक्यावरचे केस काढले जातात. जुन्या काळी गुरुकुलात शिकणाऱ्या मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर केस काढेल जायचे. समावर्तन संस्कार : सामावर्तन संस्कारात गुरुकुलातून शिक्षण घेतल्यानंतर मुलं तिथून निरोप घेते आणि समाजजीवनात जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपले सामाजिक जीवन जगतात. विवाह संस्कार : यामध्ये व्यक्ती सामाजिक जीवनातून वैवाहिक जीवनात पाऊल टाकते. याविधीमध्ये व्यक्ती लग्न करून त्यांचे वैवाहिक जीवन सुरु करतात. अंत्यसंस्कार : अंत्यसंस्कार हा शेवटचा संस्कार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर त्याच्या मृत्यूनंतर हा संस्कार केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







