राज्यभरातील मंदिरे आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू झालेली असताना कोल्हापूरचे प्रसिद्ध अंबाबाई मंदिर अचानक बंद करण्याची वेळ आली. दुपारच्या सुमारास पोलिसांना आलेल्या एका फोननंतर सतर्कता म्हणून देवीचे दर्शन थांबवण्याच्या (Kolhapur Ambabai Mandir) निर्णय घेण्यात आला. (संग्रहित छायाचित्र)
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा पणजी (गोवा) कंट्रोल रूमला एका अज्ञाताने फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने तत्काळ बंद केलं. बॉम्ब शोध पथकाकडून मंदिर परिसराची तपासणी करून सर्व गोष्टींची तपासणी करण्यात आली. (संग्रहित छायाचित्र)
कित्येक महिन्यांनी आणि ऐन नवरात्र काळात अंबाबाईचे दर्शन सुरू झाल्याने भाविकांनी रांग लावली होती. घटस्थापनेदिवशीच दर्शन सुरू झाल्याने भाविकांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण होते. पण अचानक मंदिर बंद केल्याने भाविकांचा चांगलाच हिरमोड झाला. (संग्रहित छायाचित्र)
घातपात करण्याचा निनावी फोन आल्यानं पोलिसांनी तातडीने दर्शनाची रांग थांबविली. यानंतर ताबडतोब मंदिराला वेढा घालत श्वान आणि बॉम्बशोधक पथकांना मंदिर परिसरात पाचारण करण्यात आले. आता पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. (संग्रहित छायाचित्र)
नवरात्र काळात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भक्तीमय वातावरण असतं. राज्यभरासह विविध राज्यांमधून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्याच्या सूचना असल्याने गेले कित्येक महिने अंबाबाई मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. (संग्रहित छायाचित्र)