मराठी बातम्या /बातम्या /india-china /'एक इंचही जमीन गेली नाही', भारत-चीन वादावर लष्करप्रमुखांची स्पष्टोक्ती

'एक इंचही जमीन गेली नाही', भारत-चीन वादावर लष्करप्रमुखांची स्पष्टोक्ती

भारत-चीन (India vs China) यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये आपली एक इंचही जमीन गेली नसल्याचं भारतीय लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे (Army Chief Genral MM Narvane) म्हणाले आहेत.

नवी दिल्ली, 30 मार्च : भारत-चीन (India vs China) यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये आपली एक इंचही जमीन गेली नसल्याचं भारतीय लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे (Army Chief Genral MM Narvane) म्हणाले आहेत. चीनसोबतच्या वादाआधी ज्या भागांवर भारताचा अधिकार होता, तो भाग अजूनही भारताच्या ताब्यात असल्याचं नरवणे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. चीनसोबत झालेल्या समझोत्यानंतर पूर्व लडाखच्या पेंगॉंग लेक भागात सैनिक हटल्यानंतरही भारतासाठीचा धोका कमी झाला आहे, पण संपलेला नाही, असं नरवणे म्हणाले.

भारताच्या नियंत्रणात असलेल्या भागामध्ये अजूनही चीनचं लष्कर आहे, हे म्हणणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रियाही नरवणे यांनी दिली. मागच्यावर्षी मे महिन्यापासून लडाखमध्ये भारत-चीन यांच्यात तणाव निर्माण झाला होता.

या भागामध्ये अजूनही गस्त घालायला सुरूवात झालेली नाही, कारण तणाव अजूनही कायम आहे. आणखी काही क्षेत्रांबाबत अजूनही चर्चा करणं बाकी आहे, पण आम्ही आमचा उद्देश साध्य करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास नरवणे यांनी व्यक्त केला.

चीनी सैन्य अजूनही त्या भागात आहे का जिकडे एप्रिल 2020 आधी भारताचं नियंत्रण होतं? असा प्रश्नही नरवणे यांना विचारण्यात आला. तेव्हा हे वक्तव्य चुकीचं असल्याची प्रतिक्रिया नरवणे यांनी दिली.

मागच्या वर्षी 5 मे रोजी भारत आणि चीन यांच्या सैन्यामध्ये पँगाँग लेक भागात हाणामारी झाली, यानंतर गलवान खोऱ्यातलं वातावरण तापलं. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी या सीमेवर सैन्य वाढवलं. यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये बैठका झाल्या आणि हळू हळू सैन्य कमी करण्यात आलं.

First published:

Tags: India, India china