अंबाला वायुसेना अड्ड्यावर आयोजित कार्यक्रमात पांच राफेल विमानांना भारतीय वायुसेनेत सामील करण्यात आलं आहे. (Pic- ANI)
वायुसेनेत राफेल विमानांना सामील करताना विमानंनी हवाई प्रदर्शन केलं आणि पारंपरिक ‘सर्व धर्म पूजा’ करण्यात आली. (Pic- ANI)
राफेल विमानोंना 17व्या स्क्वॉड्रनमध्ये सामील करण्यापूर्वी त्यांच्यावर पाणीच्या फवाऱ्याने पारंपरिक सलामी देण्यात आली. (Pic- ANI)
rafaleकार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, वायुसेना प्रमुख आरकेएस भदौरिया आणि रक्षा सचिव अजय कुमार सामील झाले. (Pic- ANI)
rafaleसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की राफेलला जगभरात सर्वात श्रेष्ठ मानले जाते. राफेलचा करार भारताच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या सीमेवर असलेली परिस्थिती पाहता राफेल विमानं सामील करणं अत्यंत गरजेचं होतं. (Pic- ANI)
rafaleराफेल विमानांची निर्मिती फ्रान्समधील दसॉल्ट एविएशन या कंपनीने केली आहे. 29 जुलै रोजी पहिल्या खेपेअंतर्गत पाच राफेल विमानं भारतात आणण्यात आले होते. भारताने तब्बल चार वर्षांपूर्वी फ्रान्सकडून 59,000 कोटी रुपयांमध्ये 36 राफेल विमानं खरेदी करण्याचा करार केला होता. (Pic- ANI)
rafaleवायु सेना प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी सांगितले की सध्याची सुरक्षेची तयारी पाहता राफेलला वायुसेनेत सामील करण्याचा याहून उपयुक्त वेळ असू शकत नाही. अंबालामध्ये राफेलला दलात सामील करणं महत्त्वाचे आहे, कारण वायु सेनेच्या या अड्ड्यांपासून महत्त्वपूर्ण सर्व क्षेत्रात सहज पोहोचता येऊ शकते. Pic- ANI)