जाहिरात
मराठी बातम्या / भारत-चीन / भारत-चीन सीमेवर तणाव असताना पहिल्यांदाच PM मोदी आणि शी जिनपिंग आमने-सामने येणार

भारत-चीन सीमेवर तणाव असताना पहिल्यांदाच PM मोदी आणि शी जिनपिंग आमने-सामने येणार

भारत-चीन सीमेवर तणाव असताना पहिल्यांदाच PM मोदी आणि शी जिनपिंग आमने-सामने येणार

भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या संघटनेचे सदस्य देश आहेत. 2006मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 05 ऑक्टोबर:  भारत आणि चीनदरम्यानचा सीमेवरचा तणाव अजुनही कायम आहे. लष्करी आणि मंत्रिस्तरावर चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पहिल्यांदाच एका परिषदेत सहभागी होणार आहेत. 17 नोव्हेंबरला BRICS राष्ट्रांची बैठक होणार असून त्यात सर्व देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांदरम्यानचा तणाव वाढल्यानंतर पहिल्यांदाच हे नेते आमने-सामने येणार असल्याने सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्याकडे लागणार आहे. भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या संघटनेचे सदस्य देश आहेत. 2006मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती. दरम्यान, भारत (India) आणि चीन (China)च्या सीमेवर अजुनही तणाव आहे. चीनने पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचं स्पष्ट आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘राफेल’ या अत्याधुनिक विमानांचा समावेश झाल्याने भारताची स्थिती मजबूत झाली आहे. याचा धसका पाकिस्तान आणि चीनने घेतल्याचं सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे. या तणावात अमेरिकाही भारताच्या बाजूने असून आणीबाणीच्या प्रसंगात भारताला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यताही संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. युद्धाची वेळ आलीच तर चीनला धडा शिकवणार , लष्कराचा Action Plan तयार! या पार्श्वभूमीवर हवाईदल प्रमुख एस. के. भदौरीया (Air Force chief RKS Bhadauria) यांनी मोठं वक्तव्य दिलं आहे. भारत दोन्ही आघाड्यांवर युद्धासाठी तयार असल्याचं त्यांनी सोमवारी सांगितलं. भारत कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असून शत्रूवर आम्ही विजय मिळवू असंही ते म्हणाले. आता चीनवर असणार भारताचा ‘तिसरा डोळा’, अमेरिकेकडून खरेदी करणार 30 गार्डियन ड्रोन भारत आणि चीन सीमेवर तणाव असल्याने त्याचा फायदा घेत पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढविण्याची शक्यता आहे. तसा प्रयत्नही पाकिस्तान करत आहे. त्यातच चीनही पाकिस्तानतचा वापर करून घेण्याची शक्यता आहे. ती शक्यता लक्षात घेऊन भारत पूर्ण तयारीत असल्याचंही भदौरीया यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात