नवी दिल्ली, 09 सप्टेंबर: भारत आणि चीन (India China Faceoff) यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. सोमवारी (7 सप्टेंबर) चिनी घुसखोरांचे काही फोटो समोर आले आहेत. चिनी सैन्य पॅंगोगच्या दक्षिण भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फायरिंग सुरू केली होती. अशा सगळ्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांची भेट होण्याची शक्यता आहे. गुरुवारी दोन्ही नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात आले. दोन्ही देशांमधील ही बैठक शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) येथे होऊ शकते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील SCOच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियाला पोहोचले आहे. पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची भेट होईल की नाही हे दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल. अलीकडेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियामधील SCO दरम्यान मॉस्को येथे चिनी समकक्ष जनरल वेई फेन्गी यांची भेट घेतली. संरक्षणमंत्री सिंग यांना भेटण्याची विनंती चीनने केली होती. वाचा- Exclusive : चीनचं पितळ उघडं पडलं; भारतीय सीमेत शस्त्रासह घुसखोरी केल्याचे PHOTOS 2 तास सुरू होती सिंह आणि फेन्गी यांची बैठक 4 सप्टेंबर रोजी पूर्व लडाखच्या सीमेवरील तणाव कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने संरक्षणमंत्री सिंग आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेन्गी यांच्यात दोन तासांपेक्षा जास्त वेळ बैठक झाली. मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये सीमेच्या तणावानंतर दोन्ही बाजूंची ही पहिली उच्चस्तरीय बैठक होती. सूत्रांनी सांगितले की चर्चेदरम्यान सिंह यांनी पूर्व लडाखमधील स्थिती कायम राखण्यासाठी व सैन्य मागे हटविण्याचा आग्रह धरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅंगोंग लेकच्या दक्षिण किनाऱ्यावर चिनी सैन्याच्या स्थितीत बदल करण्याच्या नव्या प्रयत्नांना भारतीय प्रतिनिधींनी तीव्र आक्षेप नोंदविला वाचा- ड्रॅगनच्या कुरघोडीवर संरक्षण मंत्रालयाचा खुलासा,तर जम्मूत उतरले फायटर हेलिकॉप्टर भारतीय सीमेत शस्त्रासह चीनची घुसखोरी सोमवारी रात्री उशिरा पँगोंग त्सोवर रेषेजवळ (LAC) भारती-चिनी सैनिकांमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली होती. चीनच्या सरकारी मीडिया ‘ग्लोबल टाइम्स’ ने भारतीय सैनिकांवर पँगोंग त्सोच्या दक्षिणेकडील गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. सैनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुजोर चीनच्या बाजूने सुरुवातीला भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला, त्यानंतर जवानांनी चोख प्रत्युत्तर देत कारवाई केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला जात आहे.या छायाचित्रांमध्ये चिनी सैनिक दिसत आहेत. यावरुन चिनी सैन्याने भारतीय सीमेत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.