चीनने नांग्या टाकल्या! पेगॉंग सरोवर परिसरातून सैन्य हटवायला सुरुवात
पेगाँग सरोवराच्या (Pangong tso lake) दक्षिण आणि उत्तर किनाऱ्याच्या भागातील दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घ्यायला (troops disengagement) सुरुवात केल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: गेल्या वर्षी मे महिन्यात भारत (India) आणि चीन (China) या दोन देशातील सैन्य आमने सामने आले होते. गलवान खोऱ्यात (Galwan Valley) दोन्ही देशातील सैन्यांत झडप (Conflict between army troops) झाली होती. यामध्ये भारताच्या 20 जवानांना आपला जीव गमवावा (Death) लागला होता. भारतीय सैन्यानेही चीनला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. या संघर्षानंतर दोन्ही देशात तणावाचं वातावरण तयार झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे पडसाद उमटले होते.
त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि दोन्ही देशांच्या लष्करातील अधिकाऱ्यांत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या होता. आता या चर्चांना यश आलं असून सीमाप्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा विचार दोन्ही देशांनी केल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता चीनने आपल्या नांग्या टाकल्या असून त्यांनी सैन माघार घ्यायला सुरुवात केली आहे. याचे अधिकृत वृत्त चीनचे सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सने दिलं आहे.
Chinese and Indian border troops on the southern and northern shores of Pangong Lake began disengagement as planned on Wednesday according to the consensus reached during the ninth round of military commander-level talks, reports Chinese media quoting Chinese Defence Ministry pic.twitter.com/J9d0iOQFWg
ग्लोबल टाइम्सने यासंबंधित यासंबंधित वृत देताना ट्विटरवर लिहिलं की, भारत आणि चीन दोन्ही देशातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या नवव्या चर्चेच्या फेरीत झालेल्या सहमतीनुसार पेगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्याच्या भागातील दोन्ही देशांच्या सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केल्याचं म्हटलं आहे. या वृत्तास चीनच्या संरक्षण मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे, असंही ग्लोबल टाइम्सने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
नवव्या फेरीत सकारात्मक चर्चा
भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासाठी सुमारे अडीच महिन्यानंतर 24 जानेवारी रोजी चर्चेची नववी फेरी पार पडली होती. या चर्चेचं उद्दिष्ट पूर्व लडाखमधील संघर्षमय ठिकाणापासून सैन्य माघार घेणं हे होतं. तसेच या बैठकीनंतर भारतीय लष्कराने एक निवेदन जारी करताना म्हटलं होतं की, चर्चेची नववी फेरी सकारात्मक, व्यावहारिक आणि विधायक पार पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सैन्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली आहे.