जाहिरात
मराठी बातम्या / भारत-चीन / गलवानमध्ये भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या कमांडरच्या हाती बिजिंग ऑलिम्पिकची मशाल, चीनच्या उद्दामपणानंतर भारताचा बहिष्कार

गलवानमध्ये भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या कमांडरच्या हाती बिजिंग ऑलिम्पिकची मशाल, चीनच्या उद्दामपणानंतर भारताचा बहिष्कार

गलवानमध्ये भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या कमांडरच्या हाती बिजिंग ऑलिम्पिकची मशाल, चीनच्या उद्दामपणानंतर भारताचा बहिष्कार

गलवान खोऱ्यातील भारतीय सैनिकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कमांडरचा बहुमान करण्याचा निर्णय घेऊन चीननं भारताला डिवचलं आहे. याचं प्रत्युत्तर म्हणून हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांवर भारतानं बहिष्कार घातला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी: भारताने (India) बिजिंगमध्ये (Beijing) होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक (Winter Olympic) स्पर्धेच्या उद्घाटन आणि समारोप समारंभावर (Opening and closing ceremony) बहिष्कार (Boycott) घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या सैनिकी संघर्षात भारतीय जवानांचे प्राण घेणाऱ्या कमांडरचा चीन सरकारने गौरव केला असून या स्पर्धेची मशाल हाती घेऊन धावण्याचा बहुमान या सैनिकाला देण्याची घोषणा केली आहे. चीनकडून गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेचं राजकारण सुरू झालं असून या प्रकाराचा निषेध करत ऑलिम्पक स्पर्धेचं उद्घाटन आणि समारोपावर बहिष्कार घालत असल्याची घोषणा भारताच्या परराष्ट्र खात्याकडून करण्यात आली आहे.   काय आहे प्रकरण? 15 जून 2020 या दिवशी गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक आणि चिनी सैनिक यांच्यात संघर्ष झाला होता. भारताच्या हद्दीत घुसखोरी करून आलेल्या चिनी सैनिकांनी 20 भारतीय जवानांचा बळी घेतला होता. भारतीय सैनिक बेसावध असताना अचानक त्यांच्यावर छुपा वार केल्यामुळे भारताच्या सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. काही महिन्यांनंतर चीननेदेखील हा संघर्ष झाल्याचं मान्य करत आपले पाच जवान ठार झाल्याचं सांगितलं होतं. प्रत्यक्षात हा आकडा जास्त असेल, असा अंदाज होता. चीनकडून कुरापत दोन्ही देशात तणाव निर्माण कऱणाऱ्या या घटनेचं चीनकडून उदात्तीकरण होत असल्याचं या घटनेतून सिद्ध झालं आहे. गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेत चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून ज्या कमांडरनं नेतृत्व केलं होतं, त्याचा सत्कार बिजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या स्टेजवर केला जाणार आहे. भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून बिजिंग ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याला आणि समारोप सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी हजर राहणार नाहीत, असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.   हे वाचा -

अमेरिका, युरोपचाही बहिष्कार भारताच्या अगोदरच अमेरिका आणि युरोपीयन युनीयनसह अनेक देशांनी बिजिंग ऑलिम्पिकच्या उद्घाटनाला न येण्याचा निर्णय घेतला आहे. उघूरमध्ये झालेल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनेमुळेच आपण हा निर्णय घेतल्याचं या देशांनी जाहीर केलं आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र बिजिंगसाठी प्रयाण केलं असून चार दिवस ते चीनमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: army , china , india , olympic
  • First Published :
जाहिरात
जाहिरात