Home /News /india-china /

Explainer : चीनचा मोठा प्लान; भूतानशी सीमा वाद, मात्र भारत लक्ष्य

Explainer : चीनचा मोठा प्लान; भूतानशी सीमा वाद, मात्र भारत लक्ष्य

भारताला अस्वस्थ करण्यासाठी चीनकडून वारंवार प्रयत्न केले जात आहे. यामागे चीनची मोठी रणनीती असल्याचे दिसून येत आहे

    नवी दिल्ली, 7 जुलै : सध्या आतंरराष्ट्रीय राजकारणात चीनवरुन बरीच चर्चा सुरू आहे. चीनचा सध्या भूतानशीही वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या सैन्याने गलवान खोऱ्यात गोंधळ घातला होता. यामुळे 20 भारतीय जवान शहीद झाले होते. भूतानशी सीमा विवाद सुरू असताना चीनचे मुख्य लक्ष्य हे भारत असल्याचे त्यांच्या कारवाईंवरुन दिसून येत आहे. जागतिक पर्यावरण संरक्षण परिषदेच्या (GEF) बैठकीत 2-3 जून रोजी भूतानने चीनकडे सक्तेंग वन्यजीव अभयारण्यासाठी निधी मागितला. मात्र चीनने यावर आक्षेप वर्तवला. चीनचा आक्षेप पाहून भूतानला मोठा धक्का बसला. कारण भूतान ज्या क्षेत्रासाठी निधीची मागणी करत होता तो एक वादग्रस्त क्षेत्र असल्याचा आक्षेप चीनने घेतला होता. भारत, बांगलादेश, भूतान, मालदीव आणि श्रीलंका यांसारख्या सदस्य देशांच्या समितीने केलेल्या विनंतीवरून भूतानने हा दावा फेटाळला. या बैठकीत भूतानच्या वतीने सांगण्यात आले की चीनने केलेला दावा भूतान कौन्सिल पूर्णपणे नाकारते. सक्तेंग वन्यजीव अभयारण्य हा भूतानचा अविभाज्य आणि सार्वभौम प्रदेश आहे आणि भूतान आणि चीन यांच्यातील सीमा चर्चेदरम्यान याचा काही अर्थ नाही. चीनचा हा दावा भारतासाठी तितकाच धोकादायक ठरू शकतो. कारण भूतानच्या पूर्वेकडील सीमेवरील ट्रॅशीगैंग जिल्ह्यात 650 चौरस किलोमीटरचे वन्यजीव अभयारण्य आहे, हे चीनने 2014 च्या नकाशामध्ये दर्शविले होते. हा परिसर अरुणाचल प्रदेशला लागूनच आहे. विशेष म्हणजे 2014 च्या त्याच नकाशामध्ये चीनने दक्षिण चीन समुद्रात प्रादेशिक महत्वाकांक्षा देखील दाखविल्या. त्यामध्ये सक्तेंग वन्यजीव अभयारण्य भूतानमध्ये असल्याने ट्रॅशीगैंगचे सीमांकन केले गेले होते. चीन आणि भूतान दरम्यानच्या सीमेचा पूर्व भाग कधीही विवादात आला नाही. वाद हा पश्चिम आणि मध्य क्षेत्रातील आहे. दोन्ही देश 1984 मध्ये सीमांच्या मुद्द्यावरुन चर्चा करीत होते आणि चीननेही कधी अभयारण्यावर दावा केला नाही. त्यांनीही हे ही सांगितले की ही पहिली वेळ नाही की अभयारण्यासाठी निधी मागण्यात आली. यापूर्वी चीनने यावर कधीच विरोध दर्शविला नाही. इतकच नाही तर जून 2020 पर्यंत चीनने कोणताच विरोध दर्शविला नाही. जीईएफच्या बैठकीत चीनने या प्रकल्पावर आक्षेप घेत संशोधनाचा प्रस्ताव दिला. चीनच्या वतीने, 'प्रोजेक्ट आयडी 10561 मध्ये म्हटले आहे की, सक्तेंग वन्यजीव अभयारण्य चीन-भूतानच्या विवादित भागात आहे, जे चीन-भूतान सीमा वाटाघाटीच्या अजेंडावर आहे. चीन यास विरोध करीत आहे. जूनमध्येच चीनने भारतातील गलवान खोऱ्यात सार्वभौमत्वाचा गावा करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 1962 नंतर कधी दावा केला नव्हता. चीनच्या या दाव्यांवर विदेश मंत्रालयाला 17-18 जूनच्या मध्य रात्री 12.45 वाजता खंडन जारी करण्यासाठी प्रवृत्त केलं. ज्यामध्ये प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी चीनच्या दाव्यांना अतिशयोक्ती आणि अमान्य म्हणत फेटाळले. यानंतर भारताने चीनच्या गलवान खोऱ्यातील दाव्यावर आणखी तीन खंडन जारी केले. 20 जून रोजी एमईएम यांनी सांगितले की गलवान खोऱ्यातील भागासंबंधित परिस्थिती यापूर्वीच स्पष्ट झाली आहे. चीनकडून वास्तविक नियंत्रण रेषाबाबत सुरू असलेले प्रयत्न अतिशयोक्ती आहेत. हे दावे स्वीकाहार्य नाही. WMCC च्या बैठकीत भारताने जारी केली विरोध 24 जून रोजी वर्किंग मॅकेनिज्म फॉर कन्सल्टेशन अंड कोअर्डिनेशनअंतर्गत जॉईंट सेक्रेटरी स्तरावरील वर्च्युअल मीटिंगमध्ये भारताने सांगितले की – भारतीय पक्षाने पूर्व लडाखमध्ये सध्याच्या घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. ज्यामध्ये 15 जून रोजी गलवान खोऱ्यात हिंसक चकमकीत झाली. एक दिवसानंतर भारताने सांगितले की – भारतीय सैनिक भारत-चीन सीमा क्षेत्रातील सर्व नियमांचे पालन करतात. ते बराच काळापासून एलएसीसह गलवान खोऱ्यात तैनात आहेत. चीन आपल्या प्रांतीय सार्वभौमत्वाची रक्षा तसेच शांततेसाठी तयार सीमेवर खास प्रतिनिधींमधील फोन कॉल्स, एनएसए अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात 5 जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर एलएसीवरील तीन ठिकाणांबाबत झालेल्या चर्चेनंतर चीन अद्यापही गॅलवान खोऱ्याचा दावा करीत असल्याचे दिसून येत आहे.  एका निवेदनात चीनने म्हटले आहे की- 'अलीकडेच भारत-चीन सीमेच्या पश्चिमेतील गलवान व्हॅलीमध्ये काय चूक आणि बरोहर घडले ते स्पष्ट दिसत आहे. चीन आपल्या क्षेत्राच्या सार्वभौमत्वाची रक्षा करण्यासह शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात आहे. तसेच भूतानमध्येही चीनने आपला दावा कायम ठेवला आहे. १ जुलै रोजी राष्ट्रीय दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताला उत्तर देताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की- 'पूर्व, मध्य आणि पश्चिमी भाग  बर्‍याच काळापासून वादात आहेत आणि हे नवीन विवादित क्षेत्र नाहीत'. चीनच्या वक्तव्यावरून असे दिसते की सत्केंग वन्यजीव अभयारण्यावर नेहमीच वाद सुरू होता. हा दावा केवळ भूताननेच नाकारला नाही, परंतु ज्यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती होती त्यांनी सांगितले की थिंपूने (भूतानची राजधानी) दिल्ली येथील दूतावासातून आपल्या दूतावासाच्या माध्यमातून भारतात चिनी दूतावासाला आपल्या क्षेत्रीय दाव्याबाबत माहिती देत आक्षेप पत्र जारी केलं होतं. केंद्रीय तिब्बती प्रशासक लोबसांग सांगे यांच्या अध्यक्षांनी सीएनएन-न्यूज 18 कडे अलीकडेच चीनची क्षेत्रीय महत्वाकांक्षा उघड केली होती. ते म्हणाले की 60 वर्षांपासून ते भारताला चीनच्या तिबेट रणनीतीबाबत इशारा देत आहेत. "जेव्हा तिबेट ताब्यात घेण्यात आला होता तेव्हा माओत्से तुंग आणि इतर चिनी नेते म्हणाले – तिबेटला आपण ताब्यात घ्यायचे आहे. त्यांच्यासाठी पाच महत्त्वाची ठिकाण आहे. त्यात पहिलं लडाख. आणि  इतर चार नेपाळ, भूतान, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश आहेत. गॅलवान खोरं आणि भूतानमधील अरुणाचलच्या सीमेवर एकाचवेळी केलेला दावा या रणनीतीस अनुकूल आहे आणि यामुळे नवी दिल्ली नक्कीच अस्वस्थ होईल.    
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: India china border

    पुढील बातम्या