ह्सुस्टनमध्ये चिनी दूतावास बंद झाल्यानंतर अमेरिकेतील संघीय एजंट आणि कायदेशीर प्रवर्तन एजंन्सीचे अधिकारी परिसरात दाखल झाले. चीन व अमेरिकेतील तणाव वाढत असताना अमेरिकेने ही कारवाई केली आहे. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनने या आठवड्यात तणाव वाढत असताना ह्युस्टनमधील वाणिज्य दूतावास बंद करण्याचा आदेश दिला होता. यांच्याविरोधात आर्थिक हेरगिरी सुरू असल्याचा आरोप लावण्यात आला होता.
चिनी वाणिज्य दूतावास ह्युस्टनमधील मॉन्टरॉस बॉउलवॉर्ड पहिसरात 40 वर्षांपासून स्थित आहे. शुक्रवारी सायंकाळी हा दूतावास बंद करण्यात आला. शुक्रवारी इमारतीवरुन चीनचा झेंडा आणि राजकीय चिन्ह हटविण्यात आले. यानंतर वाणिज्य दूतावासच्या कर्मचाऱ्यांना इमारतीतून आपलं सामान बाहेर काढताना पाहण्यात आले.
सीएनएनच्या बातमीनुसार चिनी दूतावार रिकामी करण्याचा आदेश दिल्यानंतर इमारतीजवळ काळ्या रंगाची एसयूव्ही कार, ट्रक, दोन सफेन वँन परिसरात दाखल झाली. या दरम्यान वाणिज्य दूतावासाबाहेर तब्बल 30 आंदोलकांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला.