चीनला घेराव! आपात्कालिन पॉवरचा वापर करुन फ्रान्सकडून मागवली घातक मिसाइल्स

चीनला घेराव! आपात्कालिन पॉवरचा वापर करुन फ्रान्सकडून मागवली घातक मिसाइल्स

चीनला घेराव घालण्यासाठी भारताकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जुलै : चीनसोबत सुरू असलेल्या सीमा विवादादरम्यान मोदी सरकारने Emergency Powers चा वापर करीत फ्रान्सच्या हॅमर मिसाइल मागविल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मिसाइल्स 29 जुलै रोजी भारतात पोहोचतील. या मिसाइल्सनां राफेल विमानांमध्ये लावण्यात येतील. जगातील सर्वात चांगल्या लढाऊ विमानांपैकी राफेलची मारक क्षमता हॅमर मिसाइल्ससह अधिक घातक होईल. हे मिसाइल्स 60 ते 70 किमी लांबपर्यंत निशाणा साधू शकतात.

वृत्तसंस्था एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. त्यानुसार हॅमर मिसाइल्स भारतात आल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या बंकरवर निशाणा लावण्याची क्षमता अधिक वाढेल. हॅमर HAMMER (Highly Agile Modular Munition Extended Range) एक मध्यम अंतरावर हल्ला करणारी मिसाइल आहे. जी फ्रान्स एअरफोर्स आणि नेव्हीसाठी तयार करण्यात आली आहे.

हे वाचा-चीन ऐकतचं नाही! कोर कमांडर बैठकीच्या एक आठवड्यानंतरही माघार नाहीच

यापूर्वी आलेल्या बातमीनुसार आता पूर्व लडाख बॉर्डरवर सैन्य इस्त्राइलकडून हेरॉव सर्विलान्स ड्रोन आणि स्पाइक एन्टी टँक गाइडेड मिसाइल्स खरेदी करणार आहेत. अन्मॅन्ड एरियल व्हिकलचा वापर तीनही भारतीय सैन्यांकडून केला गेला आहे.

दरम्यान भारतीय वायुसेनाने सोमवारी राफेल विमानाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. वायुसेनाने सांगितले की – 5 राफेल विमानं जुलै 2020 पर्यंत भारतात येणं अपेक्षित आहे. ही विमानं 29 जुलै रोजी वातावरणाच्या बदलानुसार वायु सेना स्टेशन अंबालामध्ये सहभागी केलं जाईल.

फायन इंडक्शन कार्यक्रम 20 ऑगस्ट रोजी दुपारी होईल. भारतीय वायु सेनेकडून सांगितले गेले आहे की वायुसेनाचे एअरक्रुझ आणि ग्राऊंड क्रु यांना अधिकतर शस्त्रे प्रणालीसह प्रशिक्षण दिलं आहे. आता पुर्णपणे ते उड्डाण करण्यास सक्षम आहे. वायुसेनाने सांगितले की आगमनानंतर विमानाच्या परिचालनावर लवकरात लवकर लक्ष केंद्रीत केलं जाईल.

Published by: Meenal Gangurde
First published: July 23, 2020, 5:58 PM IST

ताज्या बातम्या