मराठी बातम्या /बातम्या /heatlh /टाईट फिटींग जीन्स तुम्हाला आवडतात खरं; पण त्यामुळं हा गंभीर धोका...

टाईट फिटींग जीन्स तुम्हाला आवडतात खरं; पण त्यामुळं हा गंभीर धोका...

फॅशनसह स्वतःला अपडेट ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, यासाठी आरोग्याकडं दुर्लक्ष करणं योग्य नाही. घट्ट बसणाऱ्या जीन्स तुम्हाला सुंदर लुक देऊ शकतात. परंतु, ते हानिकारक आहे.

फॅशनसह स्वतःला अपडेट ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, यासाठी आरोग्याकडं दुर्लक्ष करणं योग्य नाही. घट्ट बसणाऱ्या जीन्स तुम्हाला सुंदर लुक देऊ शकतात. परंतु, ते हानिकारक आहे.

फॅशनसह स्वतःला अपडेट ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, यासाठी आरोग्याकडं दुर्लक्ष करणं योग्य नाही. घट्ट बसणाऱ्या जीन्स तुम्हाला सुंदर लुक देऊ शकतात. परंतु, ते हानिकारक आहे.

टाईट फिटींग जीन्सचे दुष्परिणाम : आजची मुले आणि मुली टाईट आणि स्कीनी जीन्स घालणे ही एक स्टाईल मानतात.  त्यांच्या मते, स्टायलिश दिसायचे असल्यास टाइट जीन्स घालणे हा चांगला पर्याय आहे. परंतु, असे अनेक संशोधन अहवाल आले आहेत, ज्यात लोकांना टाईट फिटिंग जीन्स घातल्यानंतर लोकांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

फॅशनसह स्वतःला अपडेट ठेवणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, यासाठी आरोग्याकडं दुर्लक्ष करणं योग्य नाही. घट्ट बसणाऱ्या जीन्स तुम्हाला सुंदर लुक देऊ शकतात. परंतु, ते हानिकारक आहे. टाईट फिटींग कपड्यांमुळं आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. तर, काही वेळा अशा समस्यांची माहिती असतानाही स्टाईल स्टेटमेंटच्या नादात तरुणांकडून त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. याचे भविष्यात गंभीर परिणाम होतात.

पाठदुखी : आजच्या काळात बहुतेक मुला-मुलींना लो-वेस्ट जीन्स घालायला आवडतं. टाईट आणि लो-वेस्ट जीन्स पाठीच्या स्नायूंवर दबाव निर्माण करते आणि हिप बोनच्या हालचालींना अडथळा आणते. यामुळं पाठीचा कणा, स्नायूंवर दबाव येतो आणि वेदना होतात.

पोटदुखी : जेव्हा आपण घट्ट कपडे घालतो तेव्हा आपल्या पोटावर कापड चिकटतं. यामुळं पोटावर दाब येतो. घट्ट जीन्स घातल्यानंतर खाण्या-पिण्यातही अडचण येते. एवढेच नव्हे तर, घट्ट जीन्स पचनक्रियही असंतुलित करते. यामुळे अ‌ॅसिडिटी आणि चिडचिड होते.

बेशुद्ध होणं : नेहमी घट्ट आणि टाईट फिटींगचे कपडे घालण्यामुळं गुदमरल्यासारखं होऊन श्वासोच्छवासात अडथळा येतो. यामुळं चक्कर येणं किंवा बेशुद्ध होण्यासारखे गंभीर परिणाम होतात.

यीस्ट इन्फेक्शन : घट्ट जीन्स घातल्याने शरीराच्या आजूबाजूला हवा खेळती राहू शकत नाही. यामुळं शरीरावर यीस्ट तयार होऊ लागतं. जिथं जास्त घाम येतो, तिथं खाज, जळजळ आणि वेदना होतात.

शरीरात वेदना : घट्ट जीन्समुळे मांडीच्या नसा आकुंचित होतात. यामुळे मुंग्या येणं, सुन्नपणा (बधीरपणा) आणि जळजळ जाणवते. यामुळं डोकेदुखी, अंगदुखीसारख्या समस्या उद्भवतात. शिवाय, टाईट जीन्स घातल्यानं उठणं-बसणंही कठीण होतं.

हे वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरण: पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, उपचारादरम्यान मुंबईतील ‘निर्भया’चा मृत्यू

थकल्यासारखं वाटणं : घट्ट जीन्स घालण्यानं विविध शारीरिक क्रिया आणि नैसर्गिक हालचालींमध्ये अडथळा येतो. अशामुळं खूप लवकर थकवा येतो.  यामुळं कामावर आणि कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.

बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य संसर्गाचा धोका : घट्ट जीन्समुळं बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य संसर्गाचा धोका वाढतो. यामुळं त्वचेवर लाल पुरळ आणि रॅशेस येतात.

प्रजननक्षमतेवर परिणाम : पुरुष आणि मुलांनी घट्ट जीन्स घातल्यानं त्यांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. घट्ट कपड्यांमुळं मांडीभोवती जास्त दाब आणि उष्णता निर्माण होते. यामुळं रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो आणि प्रजनन क्षमता कमी होऊ लागते.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Wearing short clothes