नुंबई, 03 फेब्रुवारी : अनेक साप विषारी असतात. काही तर इतके विषारी असतात, की ते साप चावताक्षणीच माणूस मरतो. साप चावल्यावर डॉक्टरांकडे गेलं असता, डॉक्टर सर्वांत आधी सलाइन लावतात. साप चावलेला माणूस सलाइन दिल्यानं वाचल्याच्या अनेक घटना आहेत. अशा वेळी सलाइन का दिलं जातं असा प्रश्न अनेकांना पडतो. खान सरांनी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर सापाच्या विषामुळे नाही तर सलाइन वेळेत न दिल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा विषारी साप एखाद्या व्यक्तीला चावतो, तेव्हा माणसांप्रमाणेच त्याच्याही तोंडातून लाळ बाहेर निघते. पेरोटिड ग्रंथींमधून ती निर्माण होते. त्यांनाच विषाच्या ग्रंथीही म्हटलं जातं. सापाच्या दातांच्या वरच्या भागात या ग्रंथी असतात. जेव्हा साप चावतो, तेव्हा त्याचे दात माणसाच्या शरीरात घुसतात. तेव्हा या ग्रंथींमधून निघालेलं विष माणसाच्या रक्तात मिसळतं. त्यामुळे विष पसरायला सुरुवात होते. सापाच्या विषामुळे एक तर माणसाचं रक्त गोठायला लागतं किंवा मेंदूचं कार्य थांबतं. रक्त गोठलं तर त्याचं शरीरात वहन होत नाही. त्यामुळेच माणसाच्या तोंडातून फेस बाहेर यायला लागतो. शरीर झटके देऊ लागतं आणि 3 तासांच्या आत माणसाचा मृत्यू होतो. जे विष हिमोग्लोबीनला घट्ट करतं, त्याला वैज्ञानिक भाषेत हिमोटॉक्सिक असं म्हणतात. जे विष मेंदू किंवा न्यूरॉन्सचं कार्य थांबवतं, त्याला न्यूरोटॉक्सिक म्हणतात. वेगवेगळ्या सापांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं विष असतं. हिमोटॉक्सिक विषामुळे माणसाचा लगेच मृत्यू होत नाही, मात्र न्यूरोटॉक्सिक विष माणसाला लगेच संपवू शकतं. साप चावल्यावर डॉक्टरांनी सलाइन देण्यामागेही एक विशेष कारण आहे. यामुळे शरीरातलं रक्त गोठत नाही, तर ते पातळ राहतं. अनेक साप हिमोटॉक्सिक असतात. त्यामुळे सलाइन लावून डॉक्टरांना रुग्णाला इतर औषधं देण्यास थोडा अवधी मिळतो. त्या काळात अँटी व्हेनम इंजेक्शन दिल्यास रुग्णाला वाचवता येतं. प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अकॅडमी या अमेरिकन जर्नलमध्ये सापांबाबत एक अनोखं संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय. सापांमध्ये असलेल्या विषग्रंथी आणि माणसाच्या तोंडातल्या लाळग्रंथी यात खूप साम्य असतं. काही प्रयत्न केल्यास माणसांनाही सापासारखं विषारी बनवता येऊ शकतं. माणूसच नाही तर उंदरांमधल्या लाळग्रंथीही विषारी करता येऊ शकतात, असं हे संशोधन सांगतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







