मराठी बातम्या /बातम्या /heatlh /कॅप्सुल वेगवेगळ्या रंगांच्या का असतात? पोटात गेल्यावर वरच्या आवरणाचं काय होतं?

कॅप्सुल वेगवेगळ्या रंगांच्या का असतात? पोटात गेल्यावर वरच्या आवरणाचं काय होतं?

कॅप्सुल (Capsule) बघताना अनेकदा आपल्याला कुतूहलही वाटत असते की, इतर अनेक गोळ्या साध्या म्हणजे थेट औषधाच्या पावडरीपासून बनवलेल्या असताना कॅप्सुलमध्ये औषध देण्यामागे काय कारण असते? कॅप्सुल दोन रंगात का असते आणि मुख्य म्हणजे (Cover) ती प्लास्टिक सदृश्य दिसते. मग पोटात गेल्यावर आपल्याला त्याचा त्रास कसा होत नाही किंवा ते आरोग्यासाठी घातक तर नाही ना?

पुढे वाचा ...

    मुंबई, 21 डिसेंबर : आपण आजारी पडलो की डॉक्टर औषधं (Medicine) देतात. अनेकदा त्यात विविधरंगी कॅप्सुल (Capsule) असतात. कॅप्सुल म्हणजे प्लास्टिक सदृश्य आवरण असलेली एक लंबगोल आकारीचा गोळी असते, ज्याच्या आत औषधी पावडर किंवा अगदी बारीक गोळ्या असतात. बहुतांशवेळा ही कॅप्सुल दोन रंगात (Dual Color) असतात. या कॅप्सुल्स प्लास्टिक सदृष्य आवरणात असतात. पण, या कॅप्सुल विविध रंगात का असतात? आणि आपल्या पोटात गेल्यावर त्या विरघळतात कशा? वरील आवरणाचं काय होतं? चला सविस्तर माहिती घेऊ.

    आपल्याला दिलेल्या औषधांमध्ये कॅप्सुल असेल तर आपल्यालाही आनंद होतो कारण इतर गोळ्यांच्या तुलनेत कॅप्सुल घेणं सोपं असतं, कारण वरून आवरण असल्यानं ती तोंडात ठेवल्यावर कडू लागत नाही, तसंच तिचा रंगही सुखावणारा असतो. लहान मुलांच्या बाबतीतही हा अनुभव येतो. औषधांमध्ये रंगीत कॅप्सुल्स असतील तर मुलंदेखील आनंदाने घेतात. काही वेळा कॅप्सुलच्या आत काय आहे ते देखील दिसते. अनेकदा आतल्या भागात अगदी बारीक गोळ्या असल्याचे दिसते. त्यांचा रंगदेखील आकर्षक असतो. एकूणच कॅप्सुल आकर्षक असल्यानं ती घेताना फार त्रास होत नाही.

    अनेकदा उत्सुकता म्हणून आपण कॅप्सुल उघडूनही बघतो. तेव्हा लक्षात येते की ही कॅप्सुल दोन भागांची (Two Parts) बनलेली आहे. यातील एका लांबट भागाचे तोंड दुसऱ्या भागापेक्षा किंचित मोठे आहे. त्यामुळे एक भाग दुसऱ्या भागावर बरोबर बसते आणि दोन भागांची मिळून एक लांबट आकाराची अगदी छोटीशी डबी तयार होते, ज्यामध्ये औषध सुरक्षित राहू शकते. कॅप्सुलच्या एका भागात औषध असते आणि एक भाग रिकामा असतो. कॅप्सुलच्या ज्या भागात औषध असते त्या भागाला कंटेनर (Container) म्हणतात, तर रिकाम्या असणाऱ्या भागाला कॅप (Cap) म्हणतात. कॅपने कॅप्सुल बंद होते. कंटेनर आणि कॅप एकत्र होऊन कॅप्सुल बनते. या दोघांमध्ये फरक करण्यासाठी त्या दोन्ही भागांना वेगवेगळे रंग दिलेले असतात. ज्यामुळे कंटेनर कोणता आणि कॅप कोणती हे समजू शकेल. यामुळे औषध कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंटेनर कोणता आणि कॅप कोणती, हे पटकन ओळखता येते आणि औषध योग्य भागात भरलं जातं. तसंच यामुळे रुग्णांनाही फायदा होतो. कॅप्सुलच्या रंगामुळे रुग्णाला ते कोणते औषध आहे हे लक्षात ठेवणं सोपे जाते.

    अरे बापरे! Cancer treatment चा आता असाही परिणाम; डॉक्टरही झाले हैराण

    कॅप्सुलची कॅप आणि कंटेनर वेगवेगळ्या रंगांचे बनवण्यासाठी कंपन्यांना अधिक खर्च येतो; पण औषध तयार करताना कोणतीही अडचण येत नाही, त्यामुळे कंपन्या हीच पद्धत वापरतात. आता प्रश्न उरला तो याच्या सुरक्षिततेचा. कॅप्सुलचे आवरण साधारण प्लास्टिक सदृश्य दिसते त्यामुळे अनेकदा आपल्याला वाटते की आपल्या आरोग्यासाठी हे धोकादायक तर नाही ना? याचे उत्तर आहे नाही. कॅप्सुलचं आवरण हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक नसते. कॅप्सुल जिलेटिन आणि सेल्युलोज (Cellulose) दोन्हीपासून बनवता येते, परंतु अनेक देशांमध्ये जिलेटिनपासून (Gelatin)बनवलेल्या कॅप्सुलवर बंदी आहे. आपल्या देशातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कॅप्सुल बनवण्यासाठी जिलेटिनऐवजी सेल्युलोजचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Generic medicine, Medicine