जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Vitamin D3 आणि B12 च्या कमतरतेमुळे काय होतं? आताच जाणून घ्या धोका

Vitamin D3 आणि B12 च्या कमतरतेमुळे काय होतं? आताच जाणून घ्या धोका

Vitamin D3 आणि B12 च्या कमतरतेमुळे काय होतं? आताच जाणून घ्या धोका

निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी आपल्या शरीरात जीवनसत्त्वं (Vitamin) आणि खनिजं पुरेशा प्रमाणात असणं खूप आवश्यक आहे. हे आपल्याला माहीत असलं, तरी आपण आपल्या शरीरातल्या पोषक घटकांच्या पातळीकडे फारसं लक्ष देत नाही. परिणामी आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

    मुंबई, 29 जून : निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी आपल्या शरीरात जीवनसत्त्वं (Vitamin) आणि खनिजं पुरेशा प्रमाणात असणं खूप आवश्यक आहे. हे आपल्याला माहीत असलं, तरी आपण आपल्या शरीरातल्या पोषक घटकांच्या पातळीकडे फारसं लक्ष देत नाही. परिणामी आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अलीकडेच हॉलिस्टिक लाइफस्टाइल कोच (Holistic Lifestyle Coach) आणि लेखक ल्यूक कौटिन्हो यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून Silent Epidemic चा इशारा दिला आहे. व्हिटॅमिन D3 आणि B12 ची कमतरतेमुळे शरीराला अनेक प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो आणि तो सुप्तपणे होतो, सहज लक्षात येत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. ल्यूक कौटिन्हो म्हणाले, “जीवनशैलीशी संबंधित एकात्मिक थेरपीत (Integrative & Lifestyle Medicine) आम्ही प्रत्येक रोगामागचं मूळ कारण आणि त्याची लक्षणं ओळखण्यात वेळ घालवतो. या सर्वांमध्ये एकसारखंच कारण दिसून येतं, ते म्हणजे व्हिटॅमिन D3 आणि B12 ची कमतरता. हे एका सुप्त आजारासारखं असून, त्याचा प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात त्रास होतोय; पण ते इतकं सर्वसामान्य झालं आहे, की बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात.” ते पुढे म्हणतात, “खरं तर, आम्ही कन्सल्ट करत असलेल्या एकआड एक रुग्णामध्ये या दोन जीवनसत्त्वांची पातळी अत्यंत कमी असते. व्हिटॅमिनची पातळी 3, 5 किंवा 10 वर असणं खूप धोकादायक असून, त्यामुळे असंख्य समस्या उद्भवू शकतात.” व्हिटॅमिन D3 ची भूमिका काय? ‘सनशाइन व्हिटॅमिन’, तसंच व्हिटॅमिन D2 आणि D3 हे व्हिटॅमिन डीचे मुख्य प्रकार आहेत. सनशाइन व्हिटॅमिन आधीच नैसर्गिकरित्या काही वनस्पतींमध्ये आढळते, तर D2 व D3 हे नैसर्गिकरीत्या प्राण्यांमध्ये आढळते आणि जेव्हा ते सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात तेव्हा त्वचेमध्ये तयार होतं. कौटिन्हो यांच्या मते, “आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीवर, मेंदूपासून ते हाडांच्या पृष्ठभागावर व्हिटॅमिन डी3 रिसेप्टर्स असतात. ही जीवनसत्त्वं आपल्या शरीरातल्या अनेक जनुकांचं कार्य नियंत्रित करतात. त्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक लक्षणं दिसू शकतात. बऱ्याचदा आपल्याला बरं वाटण्यासाठी या दोन जीवनसत्त्वांची पातळी वाढवणं गरजेचं असतं.” व्हिटॅमिन D3 चे फायदे पांढऱ्या रक्त पेशींची (WBC) निर्मिती, T-cells साठी फायदेशीर, थायरॉइड आणि सेक्स हॉर्मोन्सचं उत्पादन करणं, मेंदूचं आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी फायदेशीर, हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी व्हिटॅमिन D3 उपयुक्त आहे. ‘व्हिटॅमिन डी3 हे केवळ एक जीवनसत्त्व नाही, तर ते हॉर्मोनसारखं काम करतं,’ असं कौटिन्हो यांनी पोस्टच्या एका स्लाइडमध्ये म्हटलंय. केवळ कौटिन्होच नाही, तर अनेक तज्ज्ञ असं म्हणतात. व्हिटॅमिन डी3 हे हे सूर्यप्रकाशात त्वचेमध्ये तयार होत असल्याने आणि विशिष्ट व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांमधूनही शोषलं जात असल्याने, हे हॉर्मोनदेखील असल्याचं म्हटलं जातं. बोस्टन विद्यापीठातल्या डॉ. मिशेल हॉलिक यांनी मेडपेज टुडेला सांगितलं, की माणूस सूर्यप्रकाशात गेल्यावर यकृत (Liver) आणि मूत्रपिंड (Kidneys) त्याच्या शरीरातल्या व्हिटॅमिन डी 3 चं संश्लेषण (Synthesis) सुरू करून देतात. हे क्रियाशील झालेलं व्हिटॅमिन डी 3 एखाद्या हॉर्मोनप्रमाणे काम करून कॅल्शियम मेटॅबॉलिझमवर नियंत्रण ठेवतं. व्हिटॅमिन बी 12 चा रोल काय? व्हिटॅमिन बी 12 हेदेखील आपल्या शरीराला आवश्यक असलेलं महत्त्वाचं पोषक तत्त्व आहे. ल्यूक कौटिन्हो यांच्या मते, ऊर्जानिर्मिती, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, आतड्यांचं आरोग्य, RBC प्रॉडक्शन, मेंदूचं आरोग्य, स्मरणशक्ती, तसंच मूड नियंत्रणासाठी व्हिटॅमिन बी 12 महत्त्वाची भूमिका बजावतात. व्हिटॅमिन डी 3 आणि बी 12 च्या कमतरतेची लक्षणं ल्यूक कौटिन्हो यांच्या मते, व्हिटॅमिन डी3 आणि बी12 च्या पातळीत घट झाल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये अंगदुखी, brain fog, थकवा, संप्रेरक असंतुलन, नखं ठिसूळ होणं आणि स्मरणशक्ती कमी होणं, ही महत्त्वाची लक्षणं आहेत. कौटिन्हो पोस्टमध्ये म्हणतात, आपल्या रोगप्रतिकारशक्तीपासून हॉर्मोनल चेंजेस आणि मेंदूच्या आरोग्यापर्यंत जवळजवळ प्रत्येक गोष्टीशी व्हिटॅमिन D3 आणि B12चा संबंध आहे. हे संबंध सिद्ध करणारे पुरेसे मेडिकल सायन्समध्ये असल्याचंही ते सांगतात. “PCOS, कॅन्सर (Cancer), अल्झायमर (Alzheimer), कमकुवत झालेली हाडं, कमी होणारी ऊर्जा पातळी किंवा अशी कोणतीही शारीरिक स्थिती उद्भवल्यास या दोन जीवनसत्त्वांच्या पुरेशा पातळीची आवश्यकता असते. त्यामुळे आधी या जीवनसत्त्वांच्या पातळीच्या तपासणीसाठी पैसे खर्च करून स्वतःची चाचणी करून घ्या,” असा सल्ला ते देतात. व्हिटॅमिन डी3 आणि बी12ची पातळी कमी होण्यासाठी कारणीभूत असणारे घटक अनेक कारणांमुळे शरीरात व्हिटॅमिन डी3 आणि बी12 ची पातळी कमी होऊ शकते, असं कौटिन्हो सांगतात. त्यामध्ये अँटासिड्स आणि इतर औषधांचा दीर्घ काळ वापर, केमोथेरपीसारखे (chemotherapy) जड उपचार, आतडी निरोगी नसणं, दीर्घ काळ ताण, पोटातल्या आम्लांचं कमी प्रमाण (low stomach acids), फॅड डाएट (fad diets) आणि पूर्णपणे चरबीमुक्त राहण्याचा प्रयत्न या बाबींमुळे या व्हिटॅमिनची कमतरता शरीरात उद्भवू शकते. किडनीचा आजार असल्‍यास व्हिटॅमिन डी आणि बी 12 ची कमतरता भासू शकते. व्हिटॅमिन डी 3 आणि बी 12 युक्त पदार्थ सूर्यप्रकाश (sunlight), अंडी (whole eggs), मश्रूम (mushrooms) आणि फॅटी फिश (fatty fish) यांचा D3 च्या नैसर्गिक स्रोतांमध्ये समावेश होतो. आंबवलेले पदार्थ (fermented foods), ऑर्गन मीट (organ meat), ब्रूअरचे यीस्ट, सोर्स्ड डेअरी प्रॉडक्ट्स हे व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात असलेले पदार्थ आहेत, असं कौटिन्हो सांगतात. सप्लिमेंटेशनबद्दलची माहिती व्हिटॅमिन डी3 आणि बी12 ची अत्यंत कमी पातळी असणारी व्यक्ती पूरक आहार घेऊ शकते, असा सल्ला कौटिन्हो देतात. त्यासाठी संबंधित व्यक्तीने डॉक्टरांशी बोलून योग्य त्या पूरक आहाराबद्दल माहिती घ्यावी, असं ते सुचवतात. तसंच, ते ‘व्हिटॅमिन टॉक्सिसिटी’ म्हणजेच या व्हिटॅमिनचं अधिक प्रमाणात सेवन न करण्याचा इशारा देतात. व्हिटॅमिन कमी असून चालत नाहीत, त्याप्रमाणे ती जास्तही असू नयेत, असा सल्ला कौटिन्हो देतात. महत्त्वाचे मुद्दे मानवी शरीर क्रियाशील राहण्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वं म्हणजे व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्सचा मुख्य स्रोत आपलं अन्न हा असतो. अनेकदा काही जणांच्या शरीराला आवश्यक असलेली व्हिटॅमिन्स त्यांना त्यांच्या आहारातून मिळत नाहीत. जेव्हा आहारव्यतिरिक्त व्हिटॅमिन्सची गरज भागवायची गरज भासते तेव्हा सप्लिमेंट्स घेतल्या जातात. सप्लिमेंट्स घेताना त्याचा जास्त प्रमाणात डोस घेऊ नका. कारण त्यामुळे खूप मोठा धोका नसला, तरीही तो शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिने चांगला नाही. अशा रीतीने व्हिटॅमिन डी 3 आणि बी 12 युक्त पदार्थांचे सेवन करून त्याचं शरीरातील प्रमाण योग्य ठेवणं आवश्यक आहे, असा सल्ला कौटिन्हो देतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात