Home /News /heatlh /

Fitness App | फिट राहायचं आहे? तर 'हे' ॲप्स मोबाईलमध्ये असायलाच हवेत!

Fitness App | फिट राहायचं आहे? तर 'हे' ॲप्स मोबाईलमध्ये असायलाच हवेत!

सध्याच्या धावपळीच्या युगात स्वतःला फिट ठेवणं एक दिव्य झालं आहे. मात्र, आता बाजारात काही फिटनेस अॅप्स (Fitness App) आले आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला फिट राहणं सोपं होणार आहे.

    मुंबई, 26 नोव्हेंबर: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला फिट (Fit) तर राहायचं असतं; पण त्यासाठी वेळ नसतो. आपण जे डाएट (Diet) घेतो किंवा व्यायाम करतो तो योग्य आहे का, तेही नीट समजत नाही. अनेकांना तर जिममध्ये जायलाही वेळ नसतो. अशा वेळेस फिटनेस ॲपचा उत्तम पर्याय समोर आला आहे. अनेकजण एखादं फिटनेस गोल (Fitness Goal) समोर ठेवतात आणि त्या दृष्टीने प्रयत्नही करतात. आपण करत असलेले प्रयत्न योग्य आहेत का? त्यांचा परिणाम काय होत आहे हे बघण्यासाठी या ॲप्सचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे अनेक जण या ॲप्सना पसंती देतात. गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि ॲपल (Apple) स्टोअरमध्ये अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काही ॲप्सबद्दल जाणून घेऊ या. स्टेप काउंटर (Step Counter) : तुम्हाला वजन कमी करायचं आहे? पण तुमच्या कामामुळे, व्यग्रतेमुळे वर्कआउट शक्य होत नाही? मग अशा व्यक्तींसाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त आहे. या ॲपच्या मदतीमुळे तुम्ही दिवसभरात किती चाललात (Step Count) ते तुम्ही मोजू शकता आणि तुम्हाला आणखी किती चालण्याची गरज आहे, तेही या ॲपमधून कळू शकतं. हे ॲप तुमचा कॅलरी काउंटही (Calories Count) दाखवतं. सर्दी-पडशाचे विषाणू कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवतात; नवीन संशोधनातील माहिती 7 मिनिट्स वर्कआउट (7 Minutes Workout) : हे ॲप तुम्हाला फक्त सात मिनिटांच्या वर्कआउटमधून (Workout) फिट आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी प्रोत्साहन देतं. यामध्ये तुम्ही करत असलेल्या एक्सरसाइजच्या (Exercise) माध्यमातून त्याच्याशी संबंधित ऑडिओ डिटेल्सही दिले जातात. यासाठी फक्त एक खुर्ची, एक भिंत आणि तुमची सात मिनिटं इतकंच आवश्यक असतं. वजन कमी करण्यासाठी या ॲपची मदत होतेच; पण हृदयाशी संबंधित तक्रारीही दूर व्हायला मदत होते. यामध्ये ॲब्स वर्कआउट फीचरही आहे. हे ॲप अँड्रॉइडच्या बरोबर iOS डिव्हाइसवरही उपलब्ध आहे. गुगल फिट : गुगल फिट हे एक लोकप्रिय फिटनेस ॲप आहे. गुगल प्ले स्टोअरमधून (Google Play Store) हे ॲप फ्री डाउनलोड (Free Download) करता येतं. गुगल फिटच्या (Google Fit) मदतीने तुम्ही तुमची प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुमच्या फोनवर ट्रॅक करू शकता. हे ॲप तुमच्या दिवसभरात खर्च होणाऱ्या कॅलरीजबद्दलही माहिती देतं. त्याचप्रमाणे अगदी जिने चढणं, चालणं अशा गोष्टींवरही प्रत्येक क्षणी लक्ष ठेवतं. सावधान! हिवाळ्यात 'या' व्यक्तींसाठी अधिकच वाढतो Heart Attack चा धोका; दैनंदिन जीवनात अशाप्रकारे करा बदल 8 फिट वर्कआउट आणि मिल प्लॅनर : हे एक वर्कआउट ॲप आहे. यामध्ये युझर्सना एक्सरसाइज चार्टसह डाएट ब्लॅन बनवण्याचीही सोय आहे. हे ॲप वजन कमी करणं आणि वजन वाढवणं या दोन्ही गोष्टींसाठी मदत करतं. या ॲपला Google Play Store वर 4.3 पॉइंटचं रेटिंग मिळालं आहे. या ॲपचा साइज 70 MB आहे. अर्थातच ही ॲप्स तुमच्या फोनवर उपलब्ध असली तरी तुमच्या फिटनेससाठी तुम्ही आधी एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे, तरच ॲपच्या माध्यमातून तुम्हाला मदत होईल.
    First published:

    Tags: Fitness, Fitness test, Health Tips

    पुढील बातम्या