Home /News /heatlh /

या 4 तेलांमुळे हाडं होतील मजबूत, आजच वापरायला सुरूवात करा!

या 4 तेलांमुळे हाडं होतील मजबूत, आजच वापरायला सुरूवात करा!

गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, मर्यादित शारीरिक हालचाली यासह विविध कारणांमुळे हाडांच्या विकाराचे (Bone Disease) रुग्ण वाढताना दिसत आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्याने हाडं ठिसूळ होणं, गुडघेदुखी, मानदुखी आदी समस्या निर्माण होताना दिसत आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 9 मे : गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव, मर्यादित शारीरिक हालचाली यासह विविध कारणांमुळे हाडांच्या विकाराचे (Bone Disease) रुग्ण वाढताना दिसत आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्याने हाडं ठिसूळ होणं, गुडघेदुखी, मानदुखी आदी समस्या निर्माण होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे तरुणांनादेखील या समस्यांचा सामना करावा लागत आहे. बंद खोलीत एकाच जागी दीर्घकाळ बसून काम करण्याच्या सवयीमुळे शारीरिक हालचाली मर्यादित होतात. पुरेसा व्यायाम न करणं आणि सूर्य प्रकाशाअभावी हाडांची दुखणी सुरू होतात. अशा समस्या जाणवू लागताच तातडीनं वैद्यकीय तपासणी आणि त्यावर आधारित उपचार महत्त्वाचे असतात. या समस्या दूर होण्यासाठी पोषक पदार्थांचा आहारात समावेश करणं देखील गरजेचं असतं. हाडांच्या समस्येवर तसेच अंगदुखीवर काही घरगुती उपचार (Home Remedies) देखील उपयुक्त ठरतात. या उपचारांमध्ये प्रामु्ख्याने चार प्रकारच्या तेलांचा (Oil) वापर केला जातो. यामुळे हाडं मजबूत होतात आणि दुखणं दूर होतं. हाडं कमकुवत होणं ही एक सामान्य समस्या आहे. शरीराला आवश्यक पोषक घटक न मिळाल्याने हाडांच्या समस्या जाणवू शकतात. मात्र, घरगुती उपचारांच्या मदतीने हाडांचं दुखणं दूर करता येऊ शकतं. ऑलिव्ह ऑईल (Olive Oil) हे हाडांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. हे तेल वापरल्यास हाडं त्यासोबतच संपूर्ण शरीरातील वेदना दूर होतात. या तेलानं तुम्ही संपूर्ण शरीराला मालिश करू शकता. योग्य पद्धतीनं मालिश केल्यास वेदना दूर होऊन आराम मिळू शकतो. हाडं मजबूत होण्यासाठी मोहरीचं तेल (Mustard Oil) खूप फायदेशीर मानलं जातं. शरीर मजबूतीसोबतच सांधेदुखीवरही हे तेल खूप फायदेशीर आहे. या तेलानं तुम्ही संपूर्ण शरीराला मालिश करू शकता. हे तेल वापरल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. हाडांच्या दुखण्यावर बदामाचं तेल (Almond Oil) हा सर्वोत्तम उपाय आहे. या तेलाच्या वापरानं हाडं मजबूत होतात. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई मुबलक असतं. अतिनील किरणांपासून त्वचेचं रक्षण व्हावं, यासाठीदेखील हे तेल वापरतात. या तेलानं संपूर्ण शरीराला मसाज करता येतो. हाडांच्या कोणत्याही विकारावर तिळाचं तेल (Sesame oil) फायदेशीर ठरतं. या तेलानं संपूर्ण शरीराला मालिश केल्यास निश्चितच आराम मिळतो. तसंच या तेलाचे इतरही अनेक फायदे आहेत. या तेलाचा नियमित वापर केल्यास शरीराचं सौंदर्य वाढतं. अंगदुखी, हाडांमधल्या वेदना दूर करण्यासाठी तिळाच्या तेलानं मालिश करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे ही तेलं वापरून तुम्ही तुमची हाडं बळकट करू शकता. त्यांचा वापर करून प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता.
First published:

पुढील बातम्या