ही वेळ आहे आपल्या डॉक्टर्सचे आभार मानण्याची

ही वेळ आहे आपल्या डॉक्टर्सचे आभार मानण्याची

डॉक्टर्सनी आपल्या परीने, गरजवंतांची सेवा करून आणि या सर्व अडचणींवर मात करण्याची आपली क्षमता दाखवून व्यापक आदर आणि प्रशंसा संपादन केली आहे.

  • Share this:

1 जुलै रोजी भारतामध्ये आपले जीवन वाचवणाऱ्या आणि समुदायाला रोगमुक्त करण्यासाठी झटणाऱ्या पुरुष आणि स्त्रियांच्या सन्मानार्थ नॅशनल डॉक्टर्स डे साजरा केला जातो. महान डॉक्टर आणि स्वातंत्र्यसैनिक, डॉ. बिधान चंद्र राय यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. आणि कोविड-19 महामारीच्या संकटामुळे देशातील वैद्यकीय संसाधनांवर अमर्याद ताण असलेल्या वर्षामध्ये याला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉक्टरांसह भारतातील वैद्यकीय बांधवांच्या धाडस आणि निर्धाराला हा आमचा प्रतिसाद आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या मते 1492 डॉक्टर्स बळी पडले असले तरीही या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक असलेला आत्मत्यागाचा आदर्शवाद त्यांच्यामध्ये वाढत आहे.

या थोड्या लोकांनी अनेकांना वाचवले

ही महामारी उद्भवण्याआधी, भारतीय डॉक्टर्सनी संसाधनांच्या तुटवडा असलेली एक गंभीर परिस्थिती अनुभवली आहे. जरी काही वर्षांपूर्वी WHO ने सुचवलेल्या 1:1000 या डॉक्टर्सच्या लोकसंख्येशी गुणोत्तरापेक्षा भारतातील प्रमाण अधिक असले तरीही आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हे गुणोत्तर पुन्हा एकदा मर्यादेपेक्षा कमी झाल्याचे लक्षात आले आहे. सद्यस्थितीमध्ये भारतातील 28 राज्यांपैकी केवळ 11 राजांमध्ये WHO ने सुचवलेल्या डॉक्टर्सच्या गुणोत्तराइतके प्रमाण आहे. सार्वजनिक आरोग्य विभागात ही स्थिती आणखी गंभीर आहे, यामध्ये हे गुणोत्तर 1000 लोकांमागे केवळ 0.08 डॉक्टर्स इतके आहे. म्हणजेच भारताच्या विराट लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य सेवांची गरज भागत नाही.

डॉक्टर्सनी आपल्या परीने, गरजवंतांची सेवा करून आणि या सर्व अडचणींवर मात करण्याची आपली क्षमता दाखवून व्यापक आदर आणि प्रशंसा संपादन केली आहे. कोविड-19 च्या संकटकाळात, हे राष्ट्र संसर्गाचा धोका पत्करणाऱ्या आणि आपला जीव धोक्यात घालणाऱ्या डॉक्टर्सच्या निःस्वार्थ, अथक सेवेच्या कथांचे साक्षीदार बनले आहे. त्यांनी कोविड-19 चे धोके आणि त्यापासून आपला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींचा बचाव कसा करावा, याविषयी लोकांना जागृत करण्यामध्येही सहभाग घेतला. कधी कधी, गेल्या वर्षी व्हायरल झालेल्या मुंबईतील डॉ. तृप्ती गिलाडी यांच्या सर्वांना प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्यासाठी केलेल्या साश्रुपूर्ण आवाहनासारखा एखादा व्हिडीओ पाहून भावना अनावर होतात.

आपण कृतज्ञ आहोत का?

जरी आपण नॅशनल डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टर्सच्या भरीव योगदानाचे स्मरण करत असलो तरीही, त्याचबरोबर त्यांचे जीवनमान आणि कामकाजाच्या परिस्थिती सुधारण्यासाठी उपक्रम हाती घेतले पाहिजेत. जणू काही त्यांची अत्यावश्यक उपकरणांच्या तुटवड्यावर मात करण्याची नेहमीची धडपड पुरेशी नव्हती, म्हणून की काय अलिकडेच डॉक्टर्सविरोधात हिंसेच्या काही घटना घडल्या आहेत. यामध्ये आसाममधील एका कोविड-19 सुविधा केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या एक डॉक्टरवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्याच्या एका ताज्या प्रकरणाचाही समावेश आहे. अशा घटनांमुळे डॉक्टर्सचे खच्चीकरण होते आणि हुशार युवक वैद्यकीय व्यवसाय निवडण्यापासून परावृत्त होतात.


अशा परिस्थितीवरील उपायाची पहिली पायरी म्हणजे या नॅशनल डॉक्टर्स डेपासून डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांप्रती कृतज्ञतेचा एक संस्कार रुजवणे ही आहे. यामुळे डॉक्टर्सविरोधातील हिंसेच्या घटनांवर उपाय तर मिळेलच पण वैद्यकीय सेवांचा अनुनय आणि मान्यता यांमध्येही सुधारणा होईल. डॉक्टर्सना अधिक चांगली वागणूक आणि त्यांच्यासमोरील आव्हानांची जाणीव यांमुळे त्यानंतर डॉक्टर्सची संख्या आणि भारतीयांचे आरोग्य सुधारण्यासाठी ज्ञानाधिष्ठीत धोरण आखण्यासाठी मार्ग मोकळा होईल अशी आशा वाटते.

Federal Bank Ltd च्या Network18 Sanjeevani – A Shot Of Life या CSR उपक्रमांतर्गत, भारतातील सर्वांत मोठ्या कोविड-19 लसीकरणाविषयीच्या जनजागृती मोहिमेचा एक भाग बनून आम्हीही आरोग्य आणि कल्याणासाठी खारीचा वाटा उचलत आहोत. आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठीच्या या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी Sanjeevani ला भेट द्या.

First published: July 1, 2021, 8:21 PM IST
Tags: Sanjeevani

ताज्या बातम्या