मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

डॉक्टर ब्रेन सर्जरी करत होते, रुग्ण गायत्री मंत्र म्हणत होता; आणखी एक awake surgery यशस्वी

डॉक्टर ब्रेन सर्जरी करत होते, रुग्ण गायत्री मंत्र म्हणत होता; आणखी एक awake surgery यशस्वी

 रुग्णाच्या मेंदूत झालेली गाठ (brain tumor) काढण्यासाठी केलेल्या ऑपरेशनदरम्यान (operation) पूर्णपणे शुद्धीत असलेला रुग्ण गायत्री मंत्र (Gayatri Mantra) म्हणत होता.

  • Published by:  desk news

जयपूर, 11 ऑगस्ट : रुग्णाच्या मेंदूत झालेली गाठ (brain tumor) काढण्यासाठी केलेल्या ऑपरेशनदरम्यान (operation) पूर्णपणे शुद्धीत असलेला रुग्ण गायत्री मंत्र (Gayatri Mantra) म्हणत होता. रुग्णाला बेशुद्ध न करता ही शस्त्रक्रिया (surgery) करण्यात आली आणि ती यशस्वी ठरली. रुग्णाच्या मेंदूतील ट्यूमर बाहेर काढताना आवाजाचं नियंत्रण करणाऱ्या भागाला इजा पोहोचू नये, यासाठी डॉक्टरांनी या रुग्णाची awake surgery करण्याचा निर्णय घेतला.

गुंतागुंतीचं ऑपरेशन

जयपूरमधील रिढमल राम या 57 वर्षीय रुग्णाला सतत चक्कर येत असे. या काळात त्याचा आवाजदेखील बंद होत असे. याबाबत वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्याच्या मेंदूत गाठ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. ही गाठ आवाजाचे नियंत्रण करणाऱ्या भागाच्या अगदी जवळ होती. या भागात थोडी जरी इजा झाली असती, तरी या व्यक्तीची बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमताच निघून गेली असती. त्यासाठी ऑपरेशन सुरु असतानाही तो रुग्ण सगळं नीट बोलत आहे आणि त्याला सर्व नीट ऐकू येत आहे, याची खातरजमा करत राहणं डॉक्टरांसाठी गरजेचं होतं.

जयपूरमधील खासगीर रुग्णालयात तब्बल 4 तास चाललेल्या या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी रुग्णाला गायत्रीमंत्र म्हणायला सांगितला, अशी बातमी 'दैनिक भास्कर'नं दिली आहे. अधूनमधून डॉक्टर त्याला वेगवेगळ्या फळांची नावं विचारत होते. जेव्हा डॉक्टरांना स्वतः बोलणं शक्य नसायचं, तेव्हा ते त्याला गायत्री मंत्र म्हणायला सांगायचे आणि अधूनमधून काही प्रश्न विचारायचे.

हे वाचा -तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, Suicide Note मधून समोर आलं धक्कादायक कारण

रुग्णाशी गप्पा कशासाठी?

मेंदूची बहुतांश ऑपरेशन्स ही रुग्णाला पूर्ण भूल देऊन करण्यात येतात. मात्र काही ऑपरेशन्स अशी असतात ज्यात मेंदूतील इतर भागांना धक्का पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णावर काही विपरित परिणाम तर होत नाही ना, हे तपासत तपासत काही शस्त्रक्रिया केल्या जातात. अशा ऑपरेशन्सला awake surgery असं म्हटलं जातं.

First published:

Tags: Brain, Operation