मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

SANJEEVANI च्या अभिमानास्पद कथा

SANJEEVANI च्या अभिमानास्पद कथा

नाशिकमधील अश्फाक शेख यांचे उदाहरण घ्या. महाराष्ट्रातील या रोगाची सर्वाधिक लागण झालेल्या जिल्ह्यातील त्याच्या गावी जेव्हा Sanjeevani मोहीम पोहचली, तेव्हा अश्फाकने आधीपासूनच ‘108 हेल्पलाईन असिस्टन्स’ अशी उपाधी मिळवली होती.

नाशिकमधील अश्फाक शेख यांचे उदाहरण घ्या. महाराष्ट्रातील या रोगाची सर्वाधिक लागण झालेल्या जिल्ह्यातील त्याच्या गावी जेव्हा Sanjeevani मोहीम पोहचली, तेव्हा अश्फाकने आधीपासूनच ‘108 हेल्पलाईन असिस्टन्स’ अशी उपाधी मिळवली होती.

नाशिकमधील अश्फाक शेख यांचे उदाहरण घ्या. महाराष्ट्रातील या रोगाची सर्वाधिक लागण झालेल्या जिल्ह्यातील त्याच्या गावी जेव्हा Sanjeevani मोहीम पोहचली, तेव्हा अश्फाकने आधीपासूनच ‘108 हेल्पलाईन असिस्टन्स’ अशी उपाधी मिळवली होती.

असं म्हणतात, की अंधाऱ्या रात्री तारे आणखी प्रकाशमान दिसतात. कोविड-19 च्या वारंवार येणाऱ्या लाटांमुळे देशातील अर्थव्यवस्था आणि भावनिकतेवर खोलवर परिणाम झाला असला तरीही दया आणि लवचिकतेची आपली अफाट क्षमता आपल्याला कळून चुकली आहे. Federal Bank Ltd च्या व्यावसायिक सामाजिक उपक्रमांतर्गत Network18 Sanjeevani – A Shot Of Life (अ शॉट ऑफ लाईफ) या लसीकरणाविषयीच्या भव्य जनजागृती मोहिमेमध्ये याला मूर्त स्वरूप आले आहे. ही मोहीम म्हणजेच आरोग्य आणि प्रतिकारशक्ती, आणि सामान्य भारतीयांना त्यांच्या समुदायांना बरे करण्यासाठी त्यांच्या कल्पनांपलीकडे जाऊन सक्षम करण्यासाठीची एक राष्ट्रीय चळवळ यशस्वीरीत्या राबवली आहे.

आव्हानांसाठी सिद्ध

नाशिकमधील अश्फाक शेख यांचे उदाहरण घ्या. महाराष्ट्रातील या रोगाची सर्वाधिक लागण झालेल्या जिल्ह्यातील त्याच्या गावी जेव्हा Sanjeevani मोहीम पोहचली, तेव्हा अश्फाकने आधीपासूनच ‘108 हेल्पलाईन असिस्टन्स’ अशी उपाधी मिळवली होती. त्यांनी आपल्या मदत करण्याच्या इच्छेपायी, दुसऱ्या लाटेचा उद्रेक झालेला असतानाही 300 रुग्णांना बेड्स मिळवण्यास मदत केली. Sanjeevani च्या प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या टीमच्या मदतीने ते आता त्यांचा समाज सुरक्षित ठेवण्यासाठी, लोकांना लसीकरणाविषयी सुशिक्षित करून आणि लसींसाठी त्यांची नोंदणी करून अधिक जोमाने पावले उचलली आहेत.

अर्थात, सर्रासपणे चुकीची माहिती आणि अविश्वास पसरलेला असताना, योग्य मार्गाचा अवलंब करणे हेसुद्धा एक धाडसाचे काम ठरू शकते. सामाजिक कलंक ठरलेल्या आणि बहिष्कारावर मात करून स्वतःला व तिच्या आईला लास टोचून घेणाऱ्या अमृतसर जिल्ह्यातील बल्लारवाल गावातल्या जसकरणला विचारा. Sanjeevani टीमच्या प्रत्यक्ष उपस्थितीने तिच्या आरोग्य आणि प्रतिकारशक्ती-साठीच्या मागणीला अधिक महत्त्व दिले - अगदी एकेकाळी संशय घेणाऱ्या तिच्या शेजार्‍यांनाही लसीकरणाची संधी मिळवून दिली गेली.

आम्हाला गरज आहे मदत करणाऱ्या लोकांची

देशातील अधिक सुसज्ज भागांमध्ये असे सक्षम निर्णय घेणे सहज शक्य असू शकते. पण आपल्या आरोग्य सेवेच्या विळख्यात विस्मृतीत गेलेल्या लोकांचे काय? दक्षिण कन्नडच्या ग्रामीण भागातील मनोहर आणि त्याच्या कुटुंबाची कहाणी विशेषत: या संकट काळी ते करत असलेल्या संघर्षाला उजाळा देणारी आहे. राज्यात टाळेबंदी लागू झाल्याने आणि आजूबाजूच्या परिसरातील आरोग्य सुविधांच्या अभावामुळे आपल्या वृद्ध आई-वडिलांना लसी देण्याची त्यांची योजना फसली. त्यांचे लसीकरण चुकेल असे वाटत असतानाच संजीवनी मोहीम मदतीला धावून आली आणि कुटुंबाला लसींविषयी माहिती देऊन लसीकरण केंद्रापर्यंत त्यांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली.

त्याचप्रमाणे, गुंटूरमधील कावूरू गावामधील रामदूला Sanjeevani Gaadi तिच्या समाजापर्यंत पोहचेस्तोवर कोविड-19 विषयी फारशी माहिती नव्हती. व्हॅनच्या बाजूवरून प्रसारित होणाऱ्या माहितीपर व्हिडीओच्या माध्यमातून तिला कोविड सुसंगत वर्तन आणि लसीकरणाचे महत्त्व समजले. इंदौरमधील सावेर येथील प्रतिभा भदौरिया यांच्यासारखे सजग असलेले लोकही कधी कधी स्वतःहून आरोग्य आणि कल्याणाचा संदेश प्रसृत करतात. ASHA या प्रसिद्ध NGO शी जोडल्या गेलेल्या कार्यकर्त्या, प्रतिभा यांनी कोविड-19 विषयी जनजागृती करण्यासाठी आणि लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केले. Sanjeevani मोहिमेने आपला समाज वाचवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पुढे चालना दिली.

यातील प्रत्येक कहाणी एक यशोगाथा सांगते, जी सक्रियतेची ताकद दाखवून भविष्य उजळ करण्याचा मार्ग सुकर करते. सर्व Network18 TV आणि डिजिटल वाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या विशेष सहभागांद्वारे, जीवनात Sanjeevani आल्याच्या या कथांचे आपणही साक्षीदार बनू शकता. नक्की त्या पहा आणि भारताच्या आरोग्य आणि कल्याणासाठीच्या प्रयत्नांमध्ये आपणही मदतीचा हात द्या.

First published:

Tags: Sanjeevani