मुंबई 21सप्टेंबर : पोट साफ न होणं, पोटात दुखणं, पोट फुगणं अशा समस्यांना अनेकांना तोंड द्यावं लागतं. पोट साफ असल्यास आरोग्याच्या निम्म्याहून अधिक तक्रारी दूर होतात असं डॉक्टर्स म्हणतात. पचनशक्ती कमकुवत असल्यास पोट साफ न होण्याची समस्या उद्भवू शकते. यासाठीच अनेकजण डॉक्टरकडे जातात, कधी औषधं घेतात, जेवणानंतर चालण्यासारख्या अनेक गोष्टी करतात. काही जण पोट साफ राहण्यासाठी रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी गरम पाणी पितात. गरम पाणी पिण्याची सवय चांगली असली, तरी काही जण अति गरम पाणी पितात आणि जास्त वेळा पितात. ते धोकादायक ठरू शकतं. त्याबद्दल जाणून घेऊ या. याबद्दलची माहिती देणारं वृत्त ‘इंडिया डॉट कॉम’ने दिलं आहे. पोट साफ न झाल्यास सतत तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याची सवय असते; पण पोट साफ करण्यासाठीचा हा उपाय करताना अनेक जण कडकडीत गरम पाणी पितात. यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अति गरम किंवा कडकडीत गरम पाणी पिणं (Avoid drinking Hot Water) हानिकारक कसं ठरतं याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. अति गरम पाणी पिण्याचे दुष्परिणाम : 1. कोणतीही व्यक्ती अति गरम किंवा कडकडीत गरम पाणी पिते, तेव्हा त्याचा थेट परिणाम झोपेवर होऊ शकतो. यामुळे झोप उडू शकते किंवा झोपेचं प्रमाण कमी होऊ शकतं. सतत लघवीला जावं लागणं आणि पर्यायाने अनिद्रेची उद्भवते. यासाठी झोपेपूर्वी किंवा एकंदर दिवभरात गरम पाणी आवश्यक तितकंच प्यावं आणि ते जास्त गरम असणार नाही, याची काळजी घ्यावी. 2. अतिगरम पाणी प्यायल्याने शरीरातल्या नाजूक अवयवांना इजा होऊ शकते. ज्या व्यक्ती आतड्याचे आजार किंवा तत्सम समस्यांना तोंड देत आहेत, त्यांनी अतिगरम पाणी पिणं धोकादायक ठरू शकतं. 3. उकळतं गरम पाणी प्यायल्यास हीटस्ट्रोक होण्याची शक्यता वाढते. उन्हाच्या वेळेत घरातून बाहेर पडताना गरम पाणी पिऊ नये. अशा वेळी न तापवलेलं किंवा साधं पाणी(lukewarm water) प्यावं. 4. अतिगरम पाणी प्यायल्यास जिभेला चटका बसू शकतो. जीभ भाजली जाण्याची शक्यता वाढते. तसंच घसा खवखवणं, ओठ आणि इतर अंतर्गत अवयवांना (Adverse effects on Internal Organs) हानी पोहोचण्याची दाट शक्यता असते. यासाठी कोमट पाणी पिणं उपयुक्त ठरू शकतं. 5. दररोज नियमितपणे गरम पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास किडनीशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. शरीरातील अंतर्गत अवयवांच्या वाहिन्यांना सूज (Internal Swelling) येण्याची समस्यादेखील उद्भवू शकते. पाणी हे शरीराला आवश्यक आहेच; पण आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात आणि जास्त गरम पाणी पिणं हानिकारक ठरतं. आपापल्या प्रकृतीनुसार प्रत्येकाने तज्ज्ञांचा सल्ला घेऊन याबद्दल योग्य त्या प्रमाणात पाणी प्यावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.