मुंबई, 23 एप्रिल : देशभरात कोरोनाचं वाढतं संक्रमण डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाउनही करण्यात आला आहे. कोरोनापासून संरक्षणासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणं आणि वारंवार हात धुवण्यासं सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टींबरोबबर कपड्यांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कपडे सॅनिटायझ (Sanitiz) करणंही महत्वाचं आहे. खरंतर, कपड्यांमध्ये व्हायरस जास्त काळ राहू शकतो. कपडे निर्जंतुक (Sanitization Of Clothes)
करण्यासाठी अगदी सोप्या पद्धती उपयोगी ठरतात.
कपडे बास्केटमध्ये ठेवा
बाहेरुन घरी येताच कपडे काढून वेगळ्या बास्केटमध्ये किंवा एखाद्या बादलीत ठेवा किंवा पाण्यात एन्टिसेप्टिक लिक्वीड किंवा मल्टियूज हाईजीन लिक्वीड मिसळून त्यात कपडे भिजवावेत. आपल्या इतर कपड्यांबरोबर हे कपडे धुऊ नयेत. कपडे धुवण्यासाठी 50 ते 60 डिग्री गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्यात बॅक्टेरीया मरतो आणि कपडेही स्वच्छ होतात. काही वॉशिंग मशिनमध्ये वॉटर टेंपरेचर सिलेक्ट करण्याचाही ऑप्शन असतो. त्यामुळे मशिनमध्ये कपडे धुवत असाल तर, हे वापरता येतं.
केमिकल डिसइन्फेक्टर वापरा
कपडे धुताना त्यात केमिकल डिसइन्फेक्टर वापरा. क्लोरीनयुक्त ब्लिच कपड्यांसाठी चांगलं आहे. ब्लिच पाण्यात मिसळून वापरणंचं योग्य ठरतं. बादलीत कपडे धुवताना कपडे आधी घासुन स्वच्छ करा, विसळा आणि नंतर त्यात केमिकल डिसइनाफेक्टर वापरा. वॉशिंग मशीन डिसइन्फेक्ट करा. कपडे धुतल्यानंतर वॉशिग मशिन डिसइन्फेक्ट करावी. कपडे धुल्यानंतर, एक कपडा एन्टिसेप्टिक लिक्वीड किंवा केमिकल डिस्इन्फेक्टरमध्ये भिजवावा आणि मशिन पुसावी. त्यानंतर पाण्यानेही स्वच्छ पुसावी. कपडे धुवण्यासाठी वापरलेली बादलीही स्वच्छ करावी.
उन्हात कपडे चांगले वाळवा
कपडे कडक उन्हात वाळवावेत. कपडे कधीच दमट ठेऊ नयेत. मशीन ड्रायरचाही वापर करु शकता. किमान 2 मिनीटे मशीनमध्ये कपडे वाळावेत. त्यानंतर उन्हात वाळून ठेवावेत. वॉशिंग मशिन नसेल तर, हातांनी कपडे पिळून वाळवेत. ओले कपडे इतर कपड्यांमध्ये ठेऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.