मुंबई, 13 जून : सध्या हवामानात सतत होणारे बदल तब्बेतीसाठी त्रासदायक ठरु शकतात. संसर्गामुळे पसरत जाणाऱ्या आजारांपासून बचाव करायचा असेल तर, सर्दी-खोकला, तापापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींचा आहारात समावेश करा (Health Tips) आणि प्रतिकारशक्ती वाढवा. काही विषाणूंच्या संसर्गामुळे श्वसनयंत्रणेवरही परिणाम होतो. फुफ्फुसं, सर्दी होणं, थंडी वाजणं यासारखे त्रास संभवू शकतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी काही गोष्टींचा समावेश करणं फायदेशीर आहे. या गोष्टी नक्की करा जिरं- जिऱ्यात लोहं असतं, शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य राखण्यासाठी, ऑक्सिजनवहनासाठी, चयापचय आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जिरं उपयुक्त आहे. हळद- विषाणूंना रोखण्यासाठी, एक उत्तम रोधक म्हणून हळदीचा वापर होतो. त्यामुळे हळदीचं सेवन खाण्यात जरुर करा. काळी मिरी- काळ्या मिरीतही विषाणू रोखण्याची क्षमता आहे. यातल्या सी व्हिटामिनचा त्वचेसाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो. लवंग- कफ कमी करण्यासाठी, फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. श्वसनयंत्रणेच्या आजारांना रोखण्यासाठी लवंग खावी. लवंग घालून केलेला चहाही उपयुक्त ठरतो. ओवा- थंडीपासून बचाव करण्यासाठी, श्वसनयंत्रणांमधले आजार, आणि पोटासंबंधित आजार दूर करण्यासाठी ओवा उपयुक्त ठरतो. एक चमचा ओवा दोन कप पाण्यात घालून उकळा, पाणी एक कप होईपर्यंत उकळल्यानंतर मध घालून प्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.