मुंबई, 09 जुलै : शारीरिक संबंधाशी निगडित अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतात. पुरेशा माहितीचा अभाव हे यामागचं प्रमुख कारण असतं. फिजिकल रिलेशननंतर मूत्रविसर्जन (Peeing) करणं आवश्यक आहे की नाही, हा त्यापैकीच एक प्रश्न नेहमीच चर्चिला जातो. काही लोकांना शारीरिक संबंधांनंतर लघवी केल्याने प्रेग्नन्सी टाळता येते, असं वाटतं. पण खरंच असं होतं का? शारीरिक संबंधांनंतर लघवी करणं गरेजचं आहे का? याचा काही फायदा आहे का? आणि हो तर नेमका काय फायदा होतो? हे आपण जाणून घेऊयात.
युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन अर्थात मूत्रमार्गाचा संसर्ग (Urinary Tract Infection) टाळण्यासाठी ही बाब आवश्यक असते, असं काही जण म्हणतात. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ही सर्वसामान्य समस्या असली तरी गंभीर होऊ शकते. त्यामुळे बॅक्टेरिया (Bacteria) शरीरातून बाहेर पडण्यासाठी सेक्सनंतर युरिन पास करणं गरजेचं आहे, असं मत व्यक्त केलं जातं. काही अंशी ही बाब योग्य असली, तरी त्याबाबत अनेक मतमतांतरं आहेत.
शारीरिक संबंधानंतर युरिन पास केली नाही, तर त्यामुळे तसं नुकसान होत नाही. पण तसं केल्यास त्याचा फायदा मात्र नक्कीच होतो. सेक्सनंतर किंवा अन्य कोणत्याही वेळी युरिनला जाणं टाळलं तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा (UTI) धोका वाढतो. पण सेक्सनंतर युरिन पास केल्यास युरिन इन्फेक्शनचा (Urine Infection) धोका कमी होतो.
हे वाचा - अविवाहित लोकांमध्ये जास्त असतो 'या' भयानक आजाराचा धोका; संशोधकांचा दावा
बॅक्टेरिया जेव्हा मूत्रमार्गातून ब्लॅडर (Bladder) अर्थात मूत्राशयात पोहोचतात, तेव्हा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं. महिलांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांचा युरेथ्रा (Urethra) खूप लहान असतो. त्यामुळे बॅक्टेरिया मूत्राशयात अगदी सहज पोहोचतात. सेक्सनंतर युरिन पास केल्यानं सर्व बॅक्टेरिया शरीराबाहेर पडतात. सर्वसाधारणपणे, सेक्सनंतर 30 मिनिटांच्या आत युरिन पास केल्यास यूटीआयचा धोका टाळता येतो.
परंतु असं केल्यानं यूटीआय होणार नाही, असं ठोसपणे सांगता येत नाही. तसंच यामुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस अर्थात एसआयटीचा (STI) धोका दूर होत नाही. एसआयटीशी संबंधित जीवाणू शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करतात. एसआयटीपासून बचाव करण्यासाठी सेक्सदरम्यान कंडोमचा वापर करावा. सेक्सनंतर युरिन पास करण्याचा कोणताही फायदा पुरुषांना होत नाही. कारण पुरुषांची मूत्रनलिका खूप लांब असते. त्यामुळे त्यांना युरिनरी इन्फेक्शनचा धोकाही नगण्य असतो.
हे वाचा - अनियमित मासिक पाळीचा त्रास आहे? असू शकते 'चॉकलेट सिस्ट'चे लक्षण, अशी घ्या काळजी
सेक्सनंतर युरिन पास केल्यानं गर्भधारणा रोखता येते, असा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. योनी (Vagina) आणि मूत्रमार्ग हे दोन्ही भिन्न आहेत. युरिन मूत्रमार्गातून बाहेर येते. या क्रियेत मूत्रमार्गातून युरिन बाहेर पडत असताना योनीवर कोणाताही परिणाम होत नाही. सेक्सवेळी एकदा शुक्राणू योनीत पोहोचले की ते परत बाहेर येत नाहीत. योनीमध्ये प्रवेश करताच शुक्राणू (Sperm) एग्ज फर्टिलाइज करण्याचं काम सुरू करतात. त्यामुळे सेक्सनंतर लगेच युरिन पास केल्याने गर्भधारणेवर कोणताही परिणाम होत नाही, असं तज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Pregnancy, Pregnant woman, Sexual wellness