जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच शेवग्याचे आरोग्यासाठी असलेले इतके फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल

प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच शेवग्याचे आरोग्यासाठी असलेले इतके फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल

प्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच शेवग्याचे आरोग्यासाठी असलेले इतके फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल

शेवग्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि इतर अनेक घटक आढळतात. शेवगा शरीराला घातक जीवाणूंपासून वाचवतो. त्याच्यामुळं यकृताचे कार्य सुधारते आणि हाडे मजबूत होतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 मार्च : कोरोना महामारीनंतर लोक वेगवगळ्याप्रकारे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच बहुतेक लोकांनी त्यांच्या आहारात वनस्पती-आधारित आहाराचा समावेश करणे सुरू केले आहे. वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्नामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. शेवगा वनस्पती ही अनेक पोषक तत्वांचा (Health benefits of Drumstick) खजिना आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात, आयुर्वेदिक डॉक्टर अभिषेक कुमार यांनी सांगितलं की, कोरोना महामारीच्या काळात शेवगा पोषक आणि प्रतिकारशक्तीसाठी उत्तम उपाय आहे. शेवग्याला आपण अँटिऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हणू शकतो. म्हणूनच शेवगा वनस्पती (Drumstick tree) एक चमत्कारिक वनस्पती मानली जाते. शेवग्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि इतर अनेक घटक आढळतात. शेवगा शरीराला घातक जीवाणूंपासून वाचवतो. त्याच्यामुळं यकृताचे कार्य सुधारते आणि हाडेदेखील मजबूत होतात. शेवग्याच्या झाडाच्या सर्व भागांचा उपयोग शेवग्याच्या झाडाच्या सर्व भागांचा वापर होतो. काहीजण त्याची पाने सुकवतात आणि शिजवून खातात, तर त्याच्या बिया आणि सालीची देखील बारीक पावडर बनविली जाते. त्याच्या लाकडापासून कागद बनवला जातो. टॅब्लेटच्या स्वरुपात बाजारात विकले जाते. दुसरीकडे, या वनस्पतीच्या सालीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. त्याची साल मॅट बनवण्यासाठीही वापरली जाते. दक्षिण भारतातील खाद्य संबल, करी, लोणचे इत्यादींमध्ये शेवग्याचा खूप वापर केला जातो. शेवग्याचे फायदे डॉ. अभिषेक कुमार यांच्या मते, दुधापेक्षा शेवग्यामध्ये 17 पट जास्त कॅल्शियम आढळते, तर गाजरपेक्षा 10 पट जास्त व्हिटॅमिन ए आढळते. त्याचप्रमाणे, संत्र्यापेक्षा 7 पट अधिक व्हिटॅमिन सी आणि पालकापेक्षा 25 पट जास्त लोह आढळते. म्हणूनच कुपोषण कमी करण्यासाठी शेवगा हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे वाचा -  साधा चहा नकोच, Diabetes कंट्रोलसाठी हे स्पेशल चहा घ्यायला सुरुवात करा त्वचा आणि केसांसाठी शेवगा खूप फायदेशीर आहे. शेवग्यामध्ये शरीरात गेलेले विषारी घटक काढून टाकण्याची क्षमता आहे. केसाच्या आरोग्यासाठी देखील याचा फायदा आहे. शेवग्यामुळे चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारचे डाग पूर्णपणे दूर होऊ शकतो. शेवग्याची पाने अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये वापरली जातात. हे वाचा -  शरीरातील नसांचं कार्य सुरळीत ठेवतात या 5 गोष्टी; आहारात घ्यायला विसरू नका शेवगा मेंदूला निरोगी बनवतो आणि स्मरणशक्ती वाढवते. यात ट्रिप्टोफॅन नावाचा एक प्रकारचा प्रोटीन असतो, जो मेंदूतील मेमरी टिश्यू सक्रिय करतो. हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देखील कमी करते. लठ्ठपणाची समस्याही कमी होऊ शकते. शेवग्यात फार कमी कोलेस्टेरॉल आढळते. हे शरीरातील ऊर्जा कमी न करता वजन कमी करण्यास मदत करते. शेवग्याचे सेवन केल्याने व्यक्ती आनंदी आणि ताजी राहते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात