नवी दिल्ली, 03 एप्रिल : बरेच आई-वडील सांगतात की, त्यांचं मूल दूध पिण्यास टाळाटाळ करतं. अनेक मुलांना दूध पिणं आवडत नसल्याचं त्यांचे पालक सांगतात. आपल्या मुलांना कशा प्रकारे दूध पिण्याची सवय लावायची, ही त्यांच्यासमोर खूप मोठी समस्या असते. वास्तविक, मुलांच्या विकासासाठी दूध हे अत्यंत महत्वाचे अन्न आहे. त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची गरज पूर्ण करण्याचा हा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मुलांच्या हाडांना बळकटी देण्याबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासासाठीही दूध खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पालकाला आपलं मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आणि निरोगी असावं असं वाटतं. यासाठी आपण वेगळे काही उपाय करू शकतो, ज्यामुळं मुलं दूधाकडे पाहून नाक (Tasty And Healthy Milk Shakes) मुरडणार नाहीत.
मुलांसाठी मिल्कशेकचा पर्याय चांगला असू शकतो. यामुळं मुलांच्या पोटात दुधासह फळंही जातील. असे मिल्कशेक चांगल्या चवीमुळं मुलं आवडीनं पितात. त्यातून त्यांना अतिरिक्त पोषणमूल्यंही मिळतात.
- स्ट्रॉबेरी मिल्कशेक (Strawberry Milkshake) बनेल तुमच्या मुलांची पहिली पसंती
स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवणे अगदी सोपं आहे. शिवाय, तो मुलांच्या आरोग्यासाठीही चांगला आहे. हा बनवण्यासाठी फार मेहनत करण्याची गरजही पडणार नाही. तुमची मूलं तो आवडीनं पितीलच; शिवाय, आणखी मिल्कशेकची मागणीही करतील. हा बनवण्यासाठी आपल्याला एक कप पाणी, 1 कप दूध, व्हॅनिला आइस्क्रीम, 6 -7 स्ट्रॉबेरी आणि साखर लागेल. ते तयार करण्यासाठी, पाणी, दूध, साखर आणि स्ट्रॉबेरी मिक्सर ब्लेंडर जारमध्ये घालून ब्लेंड करा. आता त्यात व्हॅनिला आइस्क्रीम, बर्फाचे तुकडे आणि स्ट्रॉबेरी घालून पुन्हा मिक्स करा. इतक्या सोप्या पद्धतीनं स्ट्रॉबेरी मिल्क शेक तयार होईल. तुम्हाला त्यात आइस्क्रीम नको असल्यास ते न घालताही हा शेक बनवता येईल. एका काचेच्या सुंदर ग्लासमध्ये स्ट्रॉसह हा मिल्कशेक सर्व्ह करा. तुमची मुलं आनंदानं तो पितील.
- ओरिओ मिल्क शेक (oreo milk shake)
हा शेक बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज पडणार नाही. सर्वप्रथम एका बाउलमध्ये ओरिओ बिस्किटे घालून ती फोडा. आता त्यात एक ग्लास दूध, दोन चमचे आइस्क्रीम आणि चॉकलेट सिरप घालून ते ब्लेंडरमध्ये चांगले मिक्स करा. आता ते एका सुंदर काचेच्या ग्लासमध्ये ओता आणि चॉकलेट सिरपने सजवा. त्यात एक चमचा ठेवून मुलांना द्या. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओरिओ कुकीज घालून हा मिल्कशेक सजवू शकता. हा शेक घरातील मोठे लोकही आनंदानं पितील.
हे वाचा -
दातांचे प्रॉब्लेम्स सुरू झाल्यानंतर वेळ गेलेली असते, अगोदरपासूनच अशी घ्या काळजी
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.